
12/08/2025
“कोळंबी खा, उद्योगाला आधार द्या”
अमेरिकेने भारतातून जाणाऱ्या कोळंबीवरचा कर १६% वरून थेट ६०% केला आहे. त्यामुळे निर्यात मोठ्या अडचणीत येणार आहे. पण यावर चिंता करण्याऐवजी महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी एक वेगळाच उपाय सुचवला, “भारतीयांनीच जास्त कोळंबी खायला सुरुवात करावी.”
राणे म्हणाले, “आता कर एवढा वाढल्याने परदेशी विक्री कमी होईल. पण जर आपण देशातच जास्त कोळंबी खाल्ली, तर आपल्या मत्स्य उद्योगाला आधार मिळेल. किंमतही टिकून राहील आणि मच्छीमारांचं नुकसान होणार नाही.”
अर्थतज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या या निर्णयामुळे २०२५-२६ या आर्थिक वर्षात कोळंबी निर्यात ७% ते ९% ने कमी होऊ शकते. त्यामुळे निर्यातीसोबतच घरगुती मागणी वाढवणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नितेश राणे यांच्या या वक्तव्यावर आपल्याला काय वाटते?