कृषीरंग

  • Home
  • कृषीरंग

कृषीरंग Book Publisher | Content Creator

कृषीरंग हे अहमदनगर येथून नियमित प्रकाशित होणारे पोर्टल आहे. दि. १ मे, २०१७ अर्थात कामगार दिवस आणि महाराष्ट्र दिन यांच्या पार्शवभूमीवर सुरू झालेली ही संस्था सर्वसामान्यांच्या विकासाबद्दल आग्रहाने मत मांडणारे व्यासपीठ आहे.

उद्योगीनामा या व्यवसाय मार्गदर्शन पुस्तकातून वाचकांना पुढील दशसूत्री मिळते : १. नवीन व्यवसाय कसा निवडावा, त्याचा अभ्यास ...
25/06/2025

उद्योगीनामा या व्यवसाय मार्गदर्शन पुस्तकातून वाचकांना पुढील दशसूत्री मिळते :
१. नवीन व्यवसाय कसा निवडावा, त्याचा अभ्यास कसा करावा?
२. आपला मित्र-नातेवाइक यशस्वी झाला म्हणजे मीही त्यासारख्याच त्या किंवा दुसऱ्याही व्यवसायात यशस्वी झालोच पाहिजे, अशी आकांक्षा धरू नये.
३. व्यवसायातील गुंतवणूकदार व अर्थसहाय्य करणारे यातील फरक कसा ओळखावा?
४. वेळेचे नियोजन कसे करावे, त्याचे महत्त्व काय आहे?
५. व्यवसाय करताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन कसा बाळगावा?
६. सोशल मीडियाचा वापर कसा करावा; त्याचे महत्त्व, फायदे-तोटे कसे आहेत?
७. इमेज कशी निर्माण करावी व ती टिकविण्यासाठी काय आणि कशी काळजी घ्यावी?
८. व्यवसायात टीम निवड कशी करावी व कौशल्याला किती महत्त्वाचे स्थान आहे?
९. व्यवसायात धैर्य आणि संयम किती महत्त्वाचा आहे?
१०. व्यवसायात यश मिळवण्याचे मार्गदर्शन तसेच यश टिकवून ठेवण्याचे मुद्दे नेमके कोणते?

- सीए राजेंद्र (ज्ञानेश्वर) काळे, अहिल्यानगर

“उद्योगीनामा.. म्हणजे युवकांसह विद्यार्थी आणि पालकांना एक स्पष्ट दिशा दाखवणारे पुस्तक. यातून व्यवहारिक आणि वास्तवदर्शी भ...
24/06/2025

“उद्योगीनामा.. म्हणजे युवकांसह विद्यार्थी आणि पालकांना एक स्पष्ट दिशा दाखवणारे पुस्तक. यातून व्यवहारिक आणि वास्तवदर्शी भान मिळते. लेखकाच्या अनुभवाबरोबरच जगभरातील शेकडो उद्योग-व्यावसायिकतेची उदाहरणे यात आहेत. त्यामुळेच स्टार्टअप्ससाठी हे एक दिशादर्शक असे पुस्तक आहे.”
- सीए राजेंद्र (ज्ञानेश्वर) काळे
अहिल्यानगर, महाराष्ट्र

पुस्तक परीक्षण करा..चित्र रंगवा व व्हीडिओ करा..आणि मस्त बक्षीस जिंका..बालमित्र-मैत्रिणींसाठी खास संधीटग्या-टिगीच्या कराम...
24/05/2025

पुस्तक परीक्षण करा..
चित्र रंगवा व व्हीडिओ करा..
आणि मस्त बक्षीस जिंका..

बालमित्र-मैत्रिणींसाठी खास संधी

टग्या-टिगीच्या करामती भाग १ व २ या बालकथासंग्रहाचे वाचन करून पुस्तक परीक्षण करणाऱ्या मित्र-मैत्रिणींसाठी ही एक खास स्पर्धा ज्ञानकौशल्य ट्रस्ट व कृषीरंग यांनी आयोजित केली आहे

दोन्ही भागाचे वाचन करून कोणताही ५ ते १५ वयोगटातील वाचक यात सहभागी होऊ शकतो

बालमित्र-मैत्रिणींनी त्यांचे परीक्षण लिखित किंवा व्हिडिओ स्वरूपात आम्हाला दिनांक ३० जून २०२५ पर्यंत पाठवायचे आहे.

बक्षिसाचे स्वरूप (रोख रक्कम व प्रमाणपत्र)
पहिले बक्षीस : ₹ ५०१/-
दुसरे बक्षीस : ₹ ३०१/-
तिसरे बक्षीस : ₹ २५१/-
उत्तेजनार्थ बक्षीस (एकूण ५) : ₹१०१/-

बक्षीस गट
- परीक्षण लेखन
- ⁠परीक्षण व्हिडिओ
- ⁠चित्र रंगवणे

आपण आपले पुस्तक परीक्षण / व्हिडिओ / रंगवलेले चित्र आम्हाला ०७७७००२०२० या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचे आहे

दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रकाशक कृषीरंग व लेखक सचिन मोहन चोभे यांच्या फेसबुक पेजवर या स्पर्धेचा निकाल जाहीर होईल

पुस्तक वाचा..परीक्षण करा..चित्र रंगवा..बक्षीस मिळवा..!टग्या-टिगी यांच्या करामती आणि दुनियादारी या दोन्ही पुस्तकाच्या प्र...
24/05/2025

पुस्तक वाचा..
परीक्षण करा..
चित्र रंगवा..
बक्षीस मिळवा..!

टग्या-टिगी यांच्या करामती आणि दुनियादारी या दोन्ही पुस्तकाच्या प्रत मागवून त्यामधील चित्र रंगवून आणि परीक्षण लिहून व व्हिडिओ करून पाठवण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी

पुस्तक संच किंमत ₹ २५०/-
(मोफत घरपोहोच डिलिव्हरीसह)

प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख : ३० जून २०२५

अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप नंबर ०७७७००१२०२०

खुशखबर.. खुशखबर.. खुशखबर..भेटीला येत आहे “टग्या-टिगीची दुनियादारी..”आपलेही पुस्तक असावे यापासून सुरू झालेला प्रवास आता आ...
20/05/2025

खुशखबर.. खुशखबर.. खुशखबर..
भेटीला येत आहे “टग्या-टिगीची दुनियादारी..”

आपलेही पुस्तक असावे यापासून सुरू झालेला प्रवास आता आपलेही पुस्तकाचे दालन असावे इथपर्यंत आलाय. कारण लिहायला काहीतरी सुचत आहे आणि वेळही मिळत आहे. बरेच खर्डे तयार करूनही कोणते अगोदर करावे आणि कोणते नंतर हेही आता ठरवावे लागत आहे. पण पहिला टप्पा बालसाहित्य असावा असेच वाटत राहिले. टग्या-टिगी यांनी हे स्वप्न पूर्ण केले. उद्योगीनामा या पुस्तकाने जरा सीरियस बिझनेसमन म्हणूनही उपदेशाचे डोस पाजणे शक्य झाले आहे.

आता त्यात भर पडत आहे. पुस्तकाचे नाव आहे “टग्या-टिगीची दुनियादारी”. होय, पुण्यात होत असलेल्या बाल पुस्तक जत्रा यात हे नवेकोरे पुस्तक तुम्हा सर्वांच्या हातात पडणार आहे. त्यासाठी मी आणि अर्थातच माझी अर्धांगिनी Madhuri Sachin Chobhe असे दोघेही गणेश कला क्रीडा केंद्रात सलग चार दिवस पुस्तकाच्या स्टॉलवर असणार आहोत. येथेच आम्ही पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व प्रती वाचकांना फक्त ₹ १००/- यातच उपलब्ध करणार आहोत.

कृषीरंगच्या ४७ नंबर स्टॉलवर यावे आणि पुस्तकाची प्रत घ्यावी यासाठी आम्ही तुमची वाट पाहत आहोत. नेशनल बुक ट्रस्ट, संवाद पुणे आणि पुणे महानगरपालिका यांनी यंदा पुणे बाल पुस्तक जत्रा २०२५ याचे आयोजन केले आहे. ही संधी साधून आम्ही दोन्ही बाल कथासंग्रह फक्त २०० रुपयांत (एकूण किंमत ३७५ रुपये) उपलब्ध करून देत आहोत.

तर मग येताय ना आमच्या आणि पुस्तकांच्या भेटीला? आम्ही टीम कृषीरंग तुमची वाट पाहतोय. कारण तुम्हा वाचकांच्यासाठीच तर हा सगळा अट्टाहास सुरू आहे. कारण वाचक आहेत तरच लेखकांना किंमत आहे. नाही तर लेखक उरतो फक्त एक कॉमन मॅन..

वाचक भेटतात.. लेखक समृद्ध होतो..वाचक मित्र व कोल्हापूरचे उद्योजक सद्दाम तांबोळी काही सोशल मीडिया वापरत नाहीत. त्यामुळे त...
22/04/2025

वाचक भेटतात.. लेखक समृद्ध होतो..

वाचक मित्र व कोल्हापूरचे उद्योजक सद्दाम तांबोळी काही सोशल मीडिया वापरत नाहीत. त्यामुळे त्यांना टॅग करणे शक्य नाही. पण त्यांच्या आजच्या या अभिप्रायामुळे उद्योगीनामा पुस्तक लिहिले आणि प्रसिद्ध करताना जो विचार देण्याचा प्रयत्न होता तो पूर्ण झाल्याची अनुभूती मिळाली.

अगोदरच्या टग्या-टिगीच्या करामती आबालवृद्धांना आवडल्या. अनेक प्रतिक्रिया आणि सूचना बालकथाकार म्हणून समृद्ध करणाऱ्या होत्या. आताही प्रकाशनाच्या कार्यक्रमात उद्योजक Deepak Landge यांच्याकडून पुस्तकाचे कौतुक झाले. मस्त फील होता तो. आताही सद्दामभाई यांनी पुस्तक मागवून वाचून दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची वाटते. फक्त लेखक म्हणूनच नाही तर आपल्यापेक्षा जास्त प्रयत्नवादी आणि यशस्वी मंडळींना जेंव्हा हे पुस्तक आवडते आणि त्यांना त्याची जगजाहीर वाच्यता करावी वाटते हेही माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.

लेखक, व्यावसायिक आणि एकूणच माणूस म्हणून मला आणखी सकारात्मक गोष्टी करण्याची प्रेरणा यातूनच मिळत आहे. तुम्हा सर्वांना पुस्तक फक्त आवडले नाही तर भावले. आणि मुख्य म्हणजे त्यातून स्टार्टअप करण्यासाठी म्हणून तरुण, तरुणांना प्रेरणा मिळते हे पाहून भरून पावलो..

धन्यवाद सर्वांचे..

‘उद्योगीनामा’ म्हणजे नवउद्योजकांचा वाटाड्या- सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे, माजी अध्यक्ष, सीए शाखा, अहिल्यानगरThanks...
20/04/2025

‘उद्योगीनामा’ म्हणजे नवउद्योजकांचा वाटाड्या

- सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे, माजी अध्यक्ष, सीए शाखा, अहिल्यानगर

Thanks Team Lokmat and Sudhir Lanke Sir

प्रत्येक माणसाच्या आतमध्ये आणखी एक धडपडा माणूस असतो आणि तो त्याला स्वस्थ बसू देत नसतो. या आतल्या धडपड्या माणसाकडून अनेक जणांना नवा व्यवसाय-उद्योग करण्यासाठी सतत टोचण मिळत असते. मात्र, आयुष्यातील एखाद-दुसऱ्या अनुभवाला आपण चिकटून बसतो आणि हा विचार मनामध्ये मरतो. पण, या अनुभवातून धडा गिरवून स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज असणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे पुस्तक म्हणजे सचिन मोहन चोभे यांचे ‘उद्योगीनामा’.

मला काही दिवसांपूर्वी छोट्याशा आजारपणामुळे विश्रांती घ्यावी लागली. या काळात माझ्या हातामध्ये हे पुस्तक आले आणि ते मनाला खूप भावले. यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखक ग्रामीण भागातून आला आहे आणि त्याच्या लेखणीला ग्रामीण बाज आहे. सचिन चोभे यांनी स्वतः रोजगार हमी योजनेच्या कामापासून सुरुवात केलेली असल्यामुळे त्यांना वास्तवातील परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे, शहरांच्या चकचकीत कार्यालयात बसणाऱ्यांपासून माळरानावर काम करत असणाऱ्या प्रत्येकाला समजेल अशी अत्यंत साधी, सोपी, सरळ व कुठेही जड शब्दांचा वापर नसलेली भाषा या पुस्तकात आहे. हीच गोष्ट प्रत्येकाला पुस्तक आपलेसे करून टाकते. ग्रामीण भागातील अनेक तरुणांप्रमाणे त्यांनाही एमपीएससी-यूपीएससी करायची, अधिकारी व्हायचे, ते झालेच नाही तरी सरकारी नोकरी करायची, असे त्यांचेही स्वप्न होते. काहीच झाले नाही, तर शेतीला जोडून व्यवसाय करायचा, हा विचारही त्यांच्या मनामध्ये होता. स्पर्धा परीक्षा आणि प्रशासकीय जीवन या गोष्टींपेक्षा आपल्या मनाला उद्योग करणे जास्त भावते हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आयुष्यात अनेक प्रयत्न केले. बऱ्याच अपयशानंतर आता कुठेतरी व्यवसायात स्थिरस्थावर झाले असे वाटते.

जीवनाच्या या चढउताराच्या काळात अपयश आले म्हणून लेखक शांत बसलेला नाही. कुठलाही नकारात्मक विचार केलेला नाही, जवळचे मित्र त्यांना आपल्या व्यवसायात भागीदार म्हणून घेतले. परंतु लेखकावर आलेल्या घरगुती संकटात हे मित्र-भागीदार फसवून निघून गेले, तरीही लेखकाने जिद्द सोडलेली नाही हे फार महत्त्वाचे आहे. त्यांचे हे अनुभव मुळातून वाचण्यासारखे आहेत.
एकूण १८१ पानांचे हे पुस्तक १६ वेगवेगळ्या प्रकरणात विभागले आहे. एखाद्या तरुण उद्योजकाला नवीन व्यवसाय उभा करताना काय अडचणी येऊ शकतात, त्यावर कशी मात करता येऊ शकते याचा मुद्देसूद; परंतु व्यावहारिक उदाहरणे देऊन विस्तृत स्वरुपात विवेचन या पुस्तकात आहे. ही उदाहरणे इतकी अस्सल आणि आपल्या मातीतील आहेत, की या घटना आपल्याच बाबतीत घडत आहेत किंवा घडून गेल्या आहेत, असेच वाटत राहते.

यश मिळवलेल्या लोकांची, उद्योजकांची आत्मचरित्रपर पुस्तके वाचून त्यांचे जीवन आपल्याला कळते. मात्र, बऱ्याच वेळा अपयशी झालेल्या परंतु तरीही न थांबलेल्या आणि नंतर यशस्वी झालेले उद्योजक खूप प्रेरणादायी असतात, ही गोष्ट लेखक आवर्जून सांगतात .
या पुस्तकात अहिल्यानगर, पुणे, मुंबई, नाशिक आणि महाराष्ट्रातील अनेक यशस्वी-अयशस्वी उद्योजकांचे दाखले दिले आहेत. तसेच जगप्रसिद्ध उद्योजक टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी, केएफसी, थॉमस एडीसन, ॲपल, एचएमटी, नोकिया, मोटोरोला, ब्लॅकबेरी यांच्या यश-अपयशाचा पूर्ण अभ्यास करून विस्तृत विवेचन केले आहे. या अभ्यासामुळे नवीन उद्योजकाला त्याचा फायदाच होणार आहे. व्यवसाय करतांना जगप्रसिद्ध अशी SWOT थिअरीचा कसा वापर केला पाहिजे, मॅनेजमेंट थिअरी काय आहे, बॉस, लीडर कसा नसावा याचेही उत्तम उदाहरण त्यात दिलेले आहेत.

या पुस्तकातून वाचकांना पुढील दशसूत्री मिळते, असे मला वाटते.
१. नवीन व्यवसाय कसा निवडावा, त्याचा अभ्यास कसा करावा?
२. मित्र, नातेवाइक यशस्वी झाला म्हणजे मी ही त्यासारख्याच व्यवसायात यशस्वी झालोच पाहिजे, अशी आकांक्षा धरू नये.
३. व्यवसायातील गुंतवणूकदार व अर्थसहाय्य करणारे यातील फरक कसा ओळखावा?
४. वेळेचे नियोजन कसे करावे, त्याचे महत्त्व काय आहे?
५. व्यवसाय करताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन कसा बाळगावा?
६. सोशल मीडियाचा वापर कसा करावा, त्याचे महत्त्व, फायदे-तोटे कसे आहेत?
७. इमेज कशी निर्माण करावी व ती टिकविण्यासाठी काय आणि कशी काळजी घ्यावी?
८. व्यवसायात टीम निवड कशी करावी व कौशल्याला किती महत्त्वाचे स्थान आहे?
९. व्यवसायात धैर्य आणि संयम किती महत्त्वाचा आहे?
१०. वाचनाचे व अनुभवाचे महत्त्व.

अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद या ग्रामीण भागातील तरुण लेखक सचिन मोहन चोभे यांचे उद्योगीनामा हे दुसरे पुस्तक. हे पुस्तक ॲमेझॉनवर अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. नवीन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुण उद्योजकांनी हे पुस्तक नक्की वाचावे, त्यांना यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रेरणादायी होईल, यात कुठलीही शंका नाही.

📕 पुस्तकाचे नाव : उद्योगीनामा ✍️ लेखक : सचिन मोहन चोभे  ⭕ प्रकाशक : कृषीरंग, अहिल्यानगर   🔢 पृष्ठसंख्या : 188💸 किंमत : 2...
09/04/2025

📕 पुस्तकाचे नाव : उद्योगीनामा
✍️ लेखक : सचिन मोहन चोभे
⭕ प्रकाशक : कृषीरंग, अहिल्यानगर
🔢 पृष्ठसंख्या : 188
💸 किंमत : 250/-

📚 ऑर्डर करण्यासाठी खालील खालील व्हाटसअप नंबरवर मेसेज करा
📲 9422215658
🤑 GPay 09422215658

| Udyoginama | उद्योगीनामा | Mararthi Business Book |

सुमारे दोन तपाचे ‘उद्योगी’ व ‘निरुद्योगी’ अनुभव आणि त्यातून सुचलेले विचार शेअर करण्याचा प्रयत्न ‘उद्योगीनामा’मध्ये केला आहे.

बीव्हीजी इंडिया आणि एव्हीजीसी ग्रुप यांच्याकडे सल्लागार म्हणून काम केलेले लेखक सचिन मोहन चोभे सांगतात की, “अज्ञान आणि गरिबी मिरवायची नसते, तर संपवायची असते. शिक्षणाने अज्ञान व गरिबीवर मात करण्याचा विचार रुजतो. त्यासाठी शिक्षण घेताना नोकरी पटकावण्याचा नाही, तर ज्ञानार्जन करण्याचा आणि माणूस म्हणून तयार होण्याचा विचार ठेवा. त्याला व्यावहारिकतेची जोड द्या. मग कुठे यशाकडे मार्गस्थ होण्याचा विचार मनात रुजेल..”

📕 पुस्तकाचे नाव : उद्योगीनामा ✍️ लेखक : सचिन मोहन चोभे  ⭕ प्रकाशक : कृषीरंग, अहिल्यानगर   🔢 पृष्ठसंख्या : 188💸 किंमत : 2...
05/04/2025

📕 पुस्तकाचे नाव : उद्योगीनामा
✍️ लेखक : सचिन मोहन चोभे
⭕ प्रकाशक : कृषीरंग, अहिल्यानगर
🔢 पृष्ठसंख्या : 188
💸 किंमत : 250/-

📚 ऑर्डर करण्यासाठी खालील खालील व्हाटसअप नंबरवर मेसेज करा
📲 9422462003
🤑 PhonePay 094224 62003

| Udyoginama | उद्योगीनामा | Mararthi Business Book |

वीस वर्षांहून अधिक काळ व्यावसायिक जगामध्ये धडपड केल्यानंतर, यश-अपयशाचे अनेक अनुभव लेखकाकडे जमा झाले. त्यातून यश मिळविण्याचा किंवा अपयश पदरी पडण्याचा असा कोणता नियम नाही, हे त्यांना समजले. अपयशाने निराश न होता आणि यशाने हुरळून न जाता आपले काम आणि प्रयत्न करत राहणे, हाच नियम अखेर मनाशी पक्का केल्यावर त्यांना कुठे व्यावसायिक यश मिळण्यास सुरुवात झाली.

अगदी रोजगार हमी योजनेवरील मजुरापासून छोटेखानी व्यावसायिक होण्यापर्यंतचा हा प्रवास आणि त्यानिमित्ताने आलेले अनुभव पुस्तकात मांडलेले आहेत. व्यावसायिक सल्लागार म्हणून आणि व्यवसायात केलेले प्रयोग याबद्दल मुक्तचिंतन त्यांनी मांडले आहे. या अनुभवांसह वयाची चाळिशी गाठल्यानंतर आता कुठे व्यावहारिक जीवनाची अक्कल दाढ उगवायला सुरुवात झाली आहे, असेच त्यांना वाटते.

असेच सुमारे दोन तपाचे ‘उद्योगी’ व ‘निरुद्योगी’ अनुभव आणि त्यातून सुचलेले विचार शेअर करण्याचा प्रयत्न ‘उद्योगीनामा’मध्ये केला आहे.

बीव्हीजी इंडिया आणि एव्हीजीसी ग्रुप यांच्याकडे सल्लागार म्हणून काम केलेले लेखक सचिन मोहन चोभे सांगतात की, “अज्ञान आणि गरिबी मिरवायची नसते, तर संपवायची असते. शिक्षणाने अज्ञान व गरिबीवर मात करण्याचा विचार रुजतो. त्यासाठी शिक्षण घेताना नोकरी पटकावण्याचा नाही, तर ज्ञानार्जन करण्याचा आणि माणूस म्हणून तयार होण्याचा विचार ठेवा. त्याला व्यावहारिकतेची जोड द्या. मग कुठे यशाकडे मार्गस्थ होण्याचा विचार मनात रुजेल..”

Biggest Announcement..Udyoginama is available on Granthpremi.com!!! #उद्योगीनामा
28/03/2025

Biggest Announcement..
Udyoginama is available on Granthpremi.com!!!

#उद्योगीनामा

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when कृषीरंग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to कृषीरंग:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share