19/09/2025
फोटो मध्ये जो मुलगा दिसतोय ना त्याच्या एका हातात लघवीची पिशवी आहे आणि दुसर्या हातात बिस्किटाचा पुडा आहे. तो त्याच्या 'डायलिसिस' ची वाट पाहत उभा आहे...
त्याच्या दुसर्या बाजुला आणखी एका ७ वर्षाच्या मुलाला ज्युवेनाईल डायबिटीज आहे, त्याला दिवसातून ३ वेळा इन्सुलिन घ्यावी लागते....
या दोन्ही खर्या गोष्टी आहेत,वस्तुस्थिती आहे...
जगात असे अनेक लोक आहेत जे आपल्या जगण्याची लढाई रोजच लढत आहेत. ज्या गोष्टी आपल्याला सहज शक्य होतात त्या गोष्टींसाठी कित्येक लोकांना संघर्ष करावा लागतो.आपण छोट्या छोट्या समस्यांना घाबरून जातो.
नको त्या गोष्टीचं टेन्शन घेऊन बसतो.
आपण आयुष्यात बरेचसे क्षण खोट्या अभिमानात आणि कडवटपणात वाया घालवतो.
कित्येक लोकं आपल्या जिवन मरणाची लढाई रोजच लढत असतात.आणि आपण आयुष्यातल्या छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टींसाठी रडत बसतो...
राई एवढ्या गोष्टींना पर्वताचं रुप देतो...