12/12/2022
#पोस्ट_ऑफिस_२९९_आणि_३९९_रुपयांचा_विमा_8योजना #
संपूर्ण माहिती.....
भारतीय डाक विभागाच्या वतीने २९९ आणि ३९९ रुपयांमध्ये ही नवीन विमा योजना सुरू केलेली आहे. ही योजना Department of Post च्या वतीने आपल्या भारत देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. या India Post Accident Insurance Scheme अंतर्गत विमा धारकास दहा लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच हे प्रदान करण्यात येत आहे. या विमा योजना अंतर्गत तुम्हाला विम्याची रक्कम ही वार्षिक भरायची आहे. म्हणजेच 299 किंवा 399 रुपयात तुम्हाला वर्ष भराकरिता सुरक्षा कवच प्रदान करण्यात येत आहे.
➡️ पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना वयोमर्यादा:-
पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना (Post Office Accident Insurance Scheme) वयोमर्यादा ही वय वर्ष 18 ते 65 आहे. त्यामुळे या इंडिया पोस्ट ऑफिस अंतर्गत तुम्हाला अपघात विमा काढायचा असल्यास वरील प्रमाणे वय असल्यास तुम्ही विमा काढू शकतात.
➡️ पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना अंतर्गत मिळणाऱ्या सोयी सुविधा खालील प्रमाणे :-
या पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना(Post Office Apghat Vima Yojana) अंतर्गत २९९ किवा ३९९ रुपयांच्या हप्तामध्ये १० लाख रुपयांपर्यंतचा विमा सुरक्षा कवच हे विमा धारकास प्रदान करण्यात येत आहे. कोणत्याही कारणाने अपघातात विमा धारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी ५ हजार रुपये व या पोस्ट ऑफिस विमा योजना अंतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे.
➡️ पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना तपशील:-
1. विमा धरकाचा अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये प्रदान करण्यात येतात.
2. विमा धारकास कायमचे अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये प्रदान करण्यात येतात.
3. विमा योजना दवाखान्याचा खर्च करण्याकरिता 60 हज़ार रुपये प्रदान करण्यात येतात.
4. या पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना अंतर्गत विमा धारकाच्या मुलाच्या शिक्षणाकरिता 1 लाख रुपये प्रदान करण्यात येतात. ( जास्तीत जास्त 2 मुलाना )
5. जर विमा धारक हा हॉस्पिटल मध्ये अड्मिट असेल तर तो अड्मिट असेपर्यंत दररोज़ 1 हजार रुपये प्रति दिवस असे दहा दिवस पर्यंत देण्यात येतात.
6. विमा धारकास OPD खर्च हा 30000 रुपये प्रदान करण्यात येतो.
7. जर विमा धारकास पॅरालीसीस झाल्यास त्यास १० लाख रुपये प्रदान करण्यात येतात.
8. विमा धारक व्यक्तीचा कुटुंबास दवाखानात प्रवास करिता प्रवास खर्च म्हणून 25 हजार रुपये प्रदान करण्यात येतात.
➡️ पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेचा कालावधी किती?
पोस्ट विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रुपये 299 आणि 399 अपघात विमा योजना मध्ये तुम्हाला एक वर्षाकरिता रक्कम भरायची आहे. (India Post Office 299rs And 399rs Accident Insurance) एक वर्ष संपल्यानंतर तुम्हाला पुढील वर्षाकरिता योजना चालू करण्याकरिता जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन नूतनीकरण करायचे आहे. त्यानंतर पुन्हा एक वर्षाकरिता अपघात विमा संरक्षण प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे वार्षिक प्रीमियम हा 299 रुपये किंवा 399 रुपये इतका आहे.
➡️ पोस्ट ऑफिस २९९ आणि ३९९ रुपयांचा विमा योजना अर्ज प्रक्रिया :-
पोस्ट ऑफिस २९९ आणि ३९९ रुपयांचा विमा योजना लाभ घ्यायचा असल्यास अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भारतीय डाक विभागात जाऊन करायचा आहे. विमा योजना लाभ घेण्याकरिता तुमच्या कडे इंडिया पोस्ट पेमेंट बँक असावे लागते. नसल्यास पोस्टातून ते काढून मिळेल. पोस्ट ऑफिस विमा योजना लाभ घेण्याकरिता तुम्हाला पोस्टमन तसेच पोस्ट विभागाचे कर्मचारी मदत करतील.
➡️पोस्ट ऑफिस २९९ व ३९९ च्या पॉलिसीमधील फरक :-
पोस्ट ऑफिस(India Post Insurance Scheme) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या २९९ व ३९९ च्या अपघात विमा योजना ह्या सारख्याच आहे. ३९९ च्या योजनेत विमाधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर दोन मुलांना १ लाखांपर्यंतची मदतही शिक्षणासाठी मिळू शकते तर ही मदत 299 च्या अपघात विमा योजनेत मिळणार नाही. त्याच प्रमाणे 399 योजनेत अंत्यसंस्कार खर्च, वाहतूक खर्च,शिक्षण खर्च देण्यात येतो. हा खर्च 299 योजनेत मिळत नाही.
भारतीय डाक विभाग अपघात विमा योजना संपर्क
भारतीय डाक विभाग(Post Office Apghat Vima Yojana) अपघात विमा योजना अंतर्गत जर तुम्हाला हा विमा काढायचा असेल तर,
तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये भेट देऊ शकतात.
योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या परिवाराला सुरक्षित करा.
____________________________________________