08/01/2024
भिंगार पोलीस ''त्या'' बनावट प्रमाणपत्र व बनावट शिक्क्यांची चौकशी कधी करणार? नागरदेवळे ग्रामपंचायतने पोलीस अधीक्षकांना एक महिन्यापूर्वी दिले होते चौकशीचे पत्र
अहमदनगर - अहमदनगर शहरातील नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयाला तब्बल एक महिन्यापूर्वी बनावट ग्रामपंचायतचे बांधकाम परवाना प्रमाणपत्र तसेच बनावट शिक्क्यांसंदर्भात चौकशी करण्याची मागणी अर्जाद्वारे करण्यात आली होती या अर्ज मागणीला एक महिना उलटला तरी पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचं सांगण्यात आले आहे
खरंतर नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आलमगीर या परिसरामधील सर्व्ह नंबर २४२/१ मधील प्लॉट नंबर ५ व ६ मध्ये संबंधितांच्या नावाने ग्रामपंचायत कार्यलयात कुठल्याही प्रकारची मिळकत नोंद नाही तसेच २०२१ – २०२२ च्या जावक रजिस्टर मध्ये जावक क्रमांक ७८७६ यावर देखील कुठल्याही प्रकारची जावक नोंद आढळून येत नाही तसेच सर्व्हे नंबर ७०५०/२१ यावर देखील कुठल्याही प्रकारची बांधकाम परवानगी दिलेली नसताना देखील बनावट बांधकाम परवाना, बनावट शिक्के आणि बनावट जावक क्रमांक टाकण्यात आल्याचे ग्रामपंचायत नागरदेवळे यांच्या प्रथमदर्शनी निदर्शनास आलेले असून संबंधित प्रकरणाची चौकशी व्हावी या मागणीचे अर्ज पोलीस अधीक्षक कार्यलायाला देण्यात आले होते मात्र पोलीस अधीक्षक असो अन्यथा भिंगार कँम्प पोलीस ठाणे यांच्याकडून कोणत्याही प्रकारची दखल मागील एक महिन्यात घेण्यात आली नाही.
त्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच भिंगार पोलीस ठाणे हे संबंधित बनावट प्रमाणपत्र तसेच बनावट शिक्के बनवणाऱ्या टोळीला पाठीशी तर घालत नाही ना? हाच प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून दिलेल्या अर्जाला दाखविण्यात आलेल्या केराच्या टोपलीतून अर्ज काढत लवकरात लवकर चौकशी करण्याची अपेक्षा आता नागरदेवळे ग्रामपंचायत कार्यालयाकडून होत आहे. खरंतर भिंगार कँम्प पोलीस ठाणे हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था तसेच अवैध धंद्याचा बोजवारा उडाला आहे. भिंगार कँम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसापूर्वी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली या हाणामारीमध्ये ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र आरोपी अद्यापही फरारच एवढेच नव्हे तर अवैध धंद्याचा देखील बोजवारा उडाला आहे, पत्त्याचे क्लब, बिंगो, देशी दारू, मटका, जुगार या सारखे अवैध धंदे खुलेआम पणे सुरु असून यांना पाठीशी घालण्याची जबाबदारी त्या जोडीवर असल्याने ? अवैध धंद्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही अशातच पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आलेल्या अर्जावर मागील एक महिन्यापासून चौकशी करण्यात आलेली नाही. किंवा याबाबत कोणतहि माहिती संबंधित ग्रामपंचायतला देण्यात आलेली नाही हि शोकांतिकाच म्हणावी लागेल, त्यामुळे मेहरबान साहेबांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बदल्याच्या आधी या बनावट प्रमाणपत्र तसेच बनावट शिक्क्याची चौकशी करावी हीच अपेक्षा