Metro Media -Lifeline Of Your City

Metro Media -Lifeline Of Your City Media आजूबाजूच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक तसेच सर्व क्षेत्रातील बातम्या, घडामोडी all about maharashtra

🌟 विशेष निमंत्रण! 🌟🙏 चला संत कवी महिपती महाराज दिंडी सोहळा २०२५ पालखीचे दर्शन घेऊया!📺 चौपाटी कारंजा मित्र मंडळ ट्रस्ट  ल...
25/06/2025

🌟 विशेष निमंत्रण! 🌟
🙏 चला संत कवी महिपती महाराज दिंडी सोहळा २०२५ पालखीचे दर्शन घेऊया!
📺 चौपाटी कारंजा मित्र मंडळ ट्रस्ट लाईव्ह प्रोग्राम
👉 थेट मेट्रो न्यूज यूट्यूब वर पाहण्यासाठी क्लिक करा:
🔗 https://www.youtube.com/live/TXeiuygnKIs?si=66VDvIwOPNOemu3k

📌 स्थळ: चौपाटी कारंजा मित्र मंडळ, अहिल्यानगर
📌 संपर्क: आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा!

🎉 पाहायला विसरू नका आणि भाविकांना शेअर करा! 🎉 #रामकृष्णहरी
#
#चौपाटीकारंजामित्रमंडळ

चितळे रोड, अहिल्यानगर Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क...

24/06/2025

🏛️ अहिल्यानगर महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांची वाटचाल : प्रारूप प्रभाग रचना ३ सप्टेंबरला, निवडणुका डिसेंबरमध्ये अपेक्षित!

📌 नगरविकास विभागाने सुधारीत प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
➡ ३ सप्टेंबरला अहिल्यानगर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध होईल.
➡ १८ ऑगस्टला जिल्ह्यातील ११ नगरपालिका व १ नगरपंचायतीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होईल.
➡ हरकती व सुनावणी झाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना:
👉 महापालिका – ९ ते १३ ऑक्टोबर
👉 नगरपालिका – २६ ते ३० सप्टेंबर

📌 महापालिकेच्या प्रभाग रचनेचा तपशील वेळापत्रक:

प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध : ३ सप्टेंबर

हरकती सादर करण्याची अंतिम तारीख : ८ सप्टेंबर

हरकतींवर सुनावणी : १ ते १८ सप्टेंबर

अंतिम प्रभाग रचना : ९ ते १३ ऑक्टोबर

📌 नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा तपशील वेळापत्रक:

प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध : १८ ऑगस्ट

हरकती सादर करण्याची अंतिम तारीख : २१ ऑगस्ट

हरकतींवर सुनावणी : २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर

अंतिम प्रभाग रचना : २६ ते ३० सप्टेंबर

🌟 महत्त्वाचे मुद्दे:
✅ महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष — अद्याप कोणतीही आरक्षण सोडत प्रक्रिया झाली नाही.
✅ प्रभागातील आरक्षणाचे निर्देश अद्याप शासनाकडून आलेले नाहीत.
✅ प्रभाग रचनेत फारसे बदल न होता किरकोळ फेरबदल होण्याची शक्यता; मात्र काही प्रभागांमध्ये मोठ्या बदलांची शक्यता वर्तवली जात आहे.

🏙️ कोणकोणत्या ठिकाणी निवडणुका?
➡ अहिल्यानगर महापालिका
➡ नेवासे नगरपंचायत
➡ कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, शिर्डी, देवळाली प्रवरा, राहुरी, पाथर्डी, श्रीगोंदे, शेवगाव, जामखेड या नगरपालिका

🎯 डिसेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता!
सुधारीत वेळापत्रकामुळे निवडणुका सुमारे महिनाभर लांबणीवर गेल्या असून दिवाळीनंतर निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना अपेक्षित आहे.

17/06/2025

K G Munot College Admissions Open















  | पहलगाम हल्ल्यावर काँग्रेसचा जोरदार विरोध – "पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांचा कायमचा बिमोड करा!"📍 मुंबई | २३ एप्रिल २०...
25/04/2025

| पहलगाम हल्ल्यावर काँग्रेसचा जोरदार विरोध – "पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांचा कायमचा बिमोड करा!"

📍 मुंबई | २३ एप्रिल २०२५

जम्मू-काश्मीरमधल्या पहलगाममध्ये जे झालं, ते अक्षरशः हादरवून टाकणारं आहे. निरपराध पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात काँग्रेसनं दादरमध्ये निषेध मोर्चा काढला आणि सरकारला थेट संदेश दिला – "दहशतवाद संपवायचाच!"

🎙️ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले:

"हे पाकपुरस्कृत अतिरेकी आहेत. एकदाच ठरवा आणि कायमचा बिमोड करा. आता पुरे झालंय!"

मोर्च्याची सुरुवात टिळक भवनपासून झाली. तिथे सर्वांनी हल्ल्यातील बळींसाठी २ मिनिटं शांतता पाळली आणि नंतर घोषणा सुरू –
"पाकिस्तान मुर्दाबाद! भारत माता की जय!"

📢 विजय वडेट्टीवार (काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते) यांचा थेट सवाल:

"२६ लोक गेलं! गुप्तचर यंत्रणेला काही कळालं नाही का? सिक्युरिटी कुठं होती? सरकार जबाबदार आहे!"

👥 मोर्चात सामील प्रमुख चेहरे:
हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, हुसेन दलवाई, भानुदास माळी, रमेश शेट्टी, झिशान अहमद, आनंद सिंह, धनराज राठोड आणि मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते.

🔴 Bottomline:
देशात अशा हल्ल्यांचं अजिबात सहनशीलता नाही! दहशतवाद्यांना कडक उत्तर द्या – आता 'कायमचा Full Stop' हवा!

25/04/2025

देश शोकसागरात, पण भाजप नेते सेलिब्रेशन मोडमध्ये? - अतुल लोंढे यांचा सवाल

मुंबई | २५ एप्रिल २०२५ – जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केली आणि त्यामुळे सगळा देश शोकमग्न आहे. या घटनेनं देश हदरला आहे आणि लोकांच्या मनात जबरदस्त संताप आहे. पण दुसरीकडे, भाजप नेते मात्र सेल्फी मोडमध्ये आहेत – सत्कार सोहळे, स्टेजवर हार-तुरे, फोटोशूट – आणि हे सगळं चालू आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी जोरदार टीका केली आहे.

"शोक काळात सत्कार? Seriously?"

अतुल लोंढे म्हणाले, "अमरावतीत २६ एप्रिलला भाजप नेत्यांचा ग्रँड नागरी सत्कार होतोय – तेही अशा वेळी, जेव्हा पहलगाममधल्या हल्ल्यात महाराष्ट्राचे ६ नागरिक दगावले आहेत. त्यांच्या घरात अजूनही शोककळा आहे. आणि हे नेते मात्र स्टेजवर फुलं घेतायत. हीच भाजपची 'संस्कृती' का?"

"राम शिंदे संवैधानिक पदावर आहेत – पण जबाबदारी कुठे?"

या सोहळ्यात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री दत्ता भरणे, आमदार गोपीचंद पडळकर आणि इतर नेते सहभागी आहेत. यावर लोंढे म्हणाले, "राज्यघटनेचं भान तरी ठेवा! छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, पण त्यांचं तत्वज्ञान विसरता?"

"दुसऱ्याचं दु:ख दिसत नाही का?"

"लोक दु:खात आहेत, राख अजून विझलेली नाही आणि हे लोक हार-पगडी घेऊन नाचतायत? थोडं तरी भान बाळगा! जनतेच्या भावना ही तुमच्या PR शोपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत," असा सडेतोड सवाल लोंढे यांनी केला.

06/04/2025

अहिल्यानगर - माजी आमदार अरुणकाका जगतापांची तब्येत स्थिर - संपत बारस्कर यांची माहिती

28/03/2025

अमरावती विमानतळाला मिळाला ' आय ए टी ए' कोड

28/03/2025

नियमित वर्गात उपस्थित न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेल फटका

28/03/2025

आगडगाव देवस्थानात रविवारी होणार महाप्रसादात आमरसाची मेजवानी

Address

Ahmednagar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Metro Media -Lifeline Of Your City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Metro Media -Lifeline Of Your City:

Share

Category