10/10/2024
लेट पांडुरंग पाटील नर्सिंग कॉलेज मध्ये "सक्षम विद्यार्थी" सुरक्षा व सुरक्षात्मक कायदेविषयक कार्यशाळा संपन्न
मुकुंद एजुकेशन सोसाइटी वाशीमद्व्यारा संचालित लेट पांडुरंग पाटील नर्सिंग कॉलेज कान्हेरी सरप, अकोला येथे दिनांक ०७/१०/२०२४ रोजी सायबर सुरक्षा काळाची गरज या संकल्पनेतून "सक्षम विद्यार्थी" सुरक्षा व सुरक्षात्मक कायदेविषयक या कार्यशाळांचे अकोला पोलीस दल (सक्षम टीम) याच्या समन्व्याने आयोजित करण्यात आले होते.
मा. श्री. बच्चन सिंह (IPS) पोलीस अधीक्षक, अकोला यांच्या संकल्पनेतून "सक्षम विद्यार्थी" सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजना या उपक्रमा अंतर्गत स्व. पांडुरंग पाटील नर्सिंग कॉलेज व सन्मती परामेडिकल कॉलेज कान्हेरी सरप, येथे विद्यार्थी आणी शिक्षक यांच्या सोबत संवाद साधून Good touch, Bad touch सायबर हेल्पलाईन नंबर या विषयावर मार्गदर्शन केले या कार्यशाळेत २४५ विद्यार्थी उपस्थित होते.
अकोला पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारी व आजचा तरुण या विषयावर मार्गदर्शन करुन सोशल मीडियाचा वापर करताना कशी काळजी घ्यावी, याबाबत सविस्तर माहिती देउन विद्यार्थ्यांना शंकाचे निरसन केले तसेच श्री गोपाल मुकुंदे यांनी सदयस्थिती अत्यंत ज्वलत अशा बालकांची/महिला सुरक्षा या विषयावर विनोदी पद्धतीने गंभीर विषय आपल्या विशेष शैलीतून मुलांचा सक्षम मांडला.
या कार्यशाळेला मुकुंद एजुकेशन सोसायटीच्या सचिव वैशाली वालचाळे मॅडम तसेच संचालिका सौ. वसुधा गडेकर मॅडम होत्या. तसेच प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. बच्चन सिंह मा. श्री. प्रकाश तंदूलवार (ठाणेदार बार्शीटाकळी), श्री गोपाल मुकुंदे (समुपदेशक सक्षम टीम) तसेच सक्षम टीम यांची उपस्थिती लाभली.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक वैशाली निस्ताने यांनी केले, हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता अकोला पोलीस दल सक्षम टीम व कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षेकत्तर कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग दर्शविला.
कार्यशाळेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.