05/06/2026
अविकसित कान्हदेशना विकासमा पयला अडथळा – व्यक्तीपूजा की व्यवस्थानी उपेक्षा ?
(सामाजिक शे बर जय कान्हदेश 🚩 )
हम है यहा के बादशाह चल हवा येऊ दे . म्हणजे स्वागताच्या बुकेतून सुरू होणारी प्रभाव टाकण्याची संस्कृती थांबली पाहिजे.
लोकशाही व्यवस्थेत सरकारी अधिकारी आणि कर्मचारी हे कोणत्याही राजकीय पक्षाचे, संघटनेचे किंवा गटाचे नसतात. ते संविधान, कायदा आणि जनतेच्या हितासाठी काम करणारे सार्वजनिक सेवक असतात. मात्र आपल्या समाजात एक वेगळीच परंपरा रुजताना दिसते. एखादा नवीन अधिकारी रुजू झाला की विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि स्थानिक गट त्याचा सत्कार करण्यासाठी बुके, शाल, फेटे घेऊन रांगा लावतात.
वरवर पाहता हा सन्मानाचा भाग वाटत असला तरी अनेकदा त्यामागे "ओळख निर्माण करणे", "संबंध जुळवणे" किंवा "आपले काम सोपे व्हावे" अशी मानसिकता दडलेली असते. अधिकारी रुजू झाल्याच्या पहिल्याच दिवशी त्याला कोणाचा प्रभाव जास्त आहे हे दाखवण्याची एक प्रकारची स्पर्धाच सुरू होते.
खरं तर एखाद्या अधिकाऱ्याचे स्वागत त्याच्या कामावरून व्हायला हवे, रुजू झाल्याबरोबर नव्हे. जनतेसाठी पारदर्शक, प्रामाणिक आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा गौरव झाला तर त्याला अर्थ आहे. पण काम सुरू होण्यापूर्वीच बुके, सत्कार आणि फोटोसेशनचा भडीमार करणे ही निरोगी लोकशाहीची लक्षणे नाहीत.
यामुळे समाजातही चुकीचा संदेश जातो. सामान्य नागरिकाला असे वाटू लागते की, ज्यांची राजकीय ओळख मजबूत आहे त्यांच्याच कामांना प्राधान्य मिळते. प्रशासनाबद्दलचा विश्वास कमी होतो आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
आज गरज आहे ती स्वागत संस्कृतीपेक्षा उत्तरदायित्वाच्या संस्कृतीची. अधिकारी कोणत्याही पक्षाचा नसून जनतेचा आहे, ही भावना समाजाने जपली पाहिजे. राजकीय पक्ष आणि संघटनांनीही बुके देण्याऐवजी आपल्या भागातील प्रश्न, विकासाच्या गरजा आणि लोकांच्या अपेक्षा अधिकाऱ्यांसमोर मांडाव्यात.
सरकारी अधिकारी मोठा नसतो, त्याचे काम मोठे असते.
आणि लोकशाहीत कोणत्याही अधिकाऱ्याला आपल्या बाजूने वळवण्यापेक्षा त्याला निष्पक्ष राहू देणे हेच समाजाच्या हिताचे आहे.
– तुषार रवंदळे पाटील
बोलता खान्देश 🎙️
▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱
*आमनां युट्यूब चॅनेलले आतेच जॉइन व्हा!..*
https://youtube.com/?si=AVUQgIQ8qomK_a1t
*इंस्टाग्राम पेजले जॉइन व्हा!..*
https://www.instagram.com/boltakhandeshofficial?igsh=eXd6azgyaDgyazRt
*फेसबुक पानले जॉइन व्हा!..*
https://www.facebook.com/share/1ArPJuhVmS/
▰▱▰▱▰▱▰▱▰
◆◇◆◇👑 *जय कान्हदेश* 🚩◇◆◇◆
#सरकारी_अधिकारी_की_पक्षांचे_कार्यकर्ते
#बोलता_खान्देश
#जनतेचा_अधिकारी
#निष्पक्ष_प्रशासन
#लोकशाही_मजबूत_करा
#सुशासन
#विकसित_खान्देश
#सामाजिक_जागरूकता
#उत्तरदायित्वाची_संस्कृती
#खान्देश_बदलेल