29/09/2023
Biological powder : जळगावच्या शेतकरी पुत्राची कमाल; पेरणी केल्यानंतर शेतीला दोन महिने पाण्याची गरज भासणार नाही? कसे ते पहा*
Biological powder : जळगाव जिल्ह्यातील शेतकरी पुत्र व मेकॅनिकल इंजिनिअर (Mechanical Engineer) असलेल्या सुनील पवार या तरुणाने शेती क्षेत्रात अत्यंत प्रभावी असे संशोधन केले असून, त्याने एक विशिष्ट जैविक पावडर (Biological powder) उत्पादित केली आहे. ही जैविक पावडरचे शेतामध्ये पेरणीच्या वेळी बियाण्यासोबत मिश्रण केल्यानंतर संबंधित पिकाला किमान दीड ते दोन महिने पाण्याची गरज लागत नाही. शेतकरी पुत्र सुनील पवार याने हा दावा केला असून, या पावडरचे पेटंट देखील सुनील पवार याने नोंद केले आहेत.