13/10/2025
रोज शेतकरी आपलं जीवन संपवून घेत असताना ज्याला घरात बसवेल तो शिवरायांचा मावळा कसा असू शकतो?
कोकणातील एका गावातून या ७५ वर्षांच्या आजीबाई रत्नागिरीत शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार यांच्यासाठी बच्चूभाऊंनी काढलेल्या हक्कयात्रेला आल्या होत्या. एकच पाय असणाऱ्या आणि काठीचा आधार घेत चालणाऱ्या या आजीबाई एवढं अंतर चालत, जीवाला त्रास करून घेत कशासाठी आल्या असतील असा प्रश्न पाहणाऱ्याला पडेल. मात्र राज्यात रोज शेतकरी आपलं जीवन संपवून घेत असताना ज्याला घरात बसवेल तो शिवरायांचा मावळा कसा असू शकतो असं म्हणत या आजीबाई खास बच्चूभाऊंना भेटायला आल्या.
दिवसरात्र शेतात राबून रक्ताचं पाणी करून शेतमाल पिकवणाऱ्या शेतकऱ्याला हमीभाव मिळत नसल्याने तो कर्जबाजारी होतोय..कर्जाचा डोंगर वाढून झाडाला लटकून मरण्याशिवाय त्याच्या हातात काही राहत नाही. तेव्हा बळीराजाला वाचवायचं असेल तर आता त्याच्यासाठी रस्त्यावर उतरून लढावं लागेल हे या आजीबाईंनी जाणलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा कायम शेतकरी भिमुख धोरण राबवत बळीराजाच्या कष्टाची जाण ठेवली होती. आज मात्र या सरकारला महाराजांच्या रयत भिमुख धोरणांचा विसर पडलेला आहे. अशात रायगडाच्या पायथ्याला राहणाऱ्या या आज्जी मी महाएल्गार आंदोलनाला नागपूरला येणारंच असं बच्चूभाऊंना म्हणाल्या तेव्हा क्षणभर असं वाटलं कि छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाच बोलतोय.