Moral Maharashtra

  • Home
  • Moral Maharashtra
समृद्धीच्या सावंगी टोलनाक्यावर मध्यरात्री गोळीबार; एक जण गंभीरमॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर - फुलंब्री ...
12/07/2025

समृद्धीच्या सावंगी टोलनाक्यावर मध्यरात्री गोळीबार; एक जण गंभीर

मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर - फुलंब्री तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर रात्री दोन कर्मचाऱ्यांच्या झटापटीत अचानक पिस्तूलमधून गोळीबार होऊन थेट एका कर्मचाऱ्याच्या पोटात गोळी घुसली. गोळीबारात भरत घाटगे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबारानंतर दुसरा कर्मचारी फरार झाला. दोघांमध्ये वाद का झाला आणि त्यातून गोळीबार का करण्यात आला हे अजून स्पष्ट झालं नाही.

नेमकं काय घडलं?
फुलंब्री तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर मंगळवारी रात्री एक गंभीर घटना घडली. दोन कर्मचाऱ्यांमध्ये वादाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या झटापटीत अचानक पिस्तूलमधून गोळी सुटली, आणि ती थेट एका कर्मचाऱ्याच्या पोटात घुसली. या गोळीबारात भरत घाटगे हे कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना काल (शुक्रवारी, ता-11) रोजी उशिरा रात्री समृद्धी महामार्गावरील सावंगी टोलनाक्यावर घडली. प्राथमिक माहितीनुसार, भरत घाटगे आणि दुसरा कर्मचारी यांच्यात काही कारणावरून वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की त्यामध्ये हाणामारीची वेळ आली. त्या झटापटीदरम्यान दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे असलेले पिस्तूल अचानक भरत घाटगे यांच्या दिशेने सुटलं, आणि गोळी थेट त्यांच्या पोटात घुसली. घटनेनंतर पिस्तूलधारी कर्मचारी घटनास्थळावरून पलायन करण्यात यशस्वी झाला. यामुळे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी 'समृद्धी'च्या अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांना पिस्तूल देण्यात आले नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे हे पिस्तूल दोन कर्मचाऱ्यांकडे कुठून आले, यासंदर्भात चौकशी सुरू आहे...................................................

मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU

वादग्रस्त विद्यदीप बालगृहावर गुन्हा दाखल; चार सिस्टरच्या छळाची व्यथा मुलींनी मांडलीमॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्कछत्रपती ...
10/07/2025

वादग्रस्त विद्यदीप बालगृहावर गुन्हा दाखल; चार सिस्टरच्या छळाची व्यथा मुलींनी मांडली

मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर - विद्यादीप बालगृहातील अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आल्याने, या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालगृहातील नऊ मुलींनी अत्याचार, शिक्षणावर बंदी आणि अमानुष वागणुकीच्या आरोपांसह बालगृहातून पलायन केले होते. हा प्रकार समोर आल्यानंतरही गुन्हा नोंदवण्यात विलंब का झाला, असा सवाल औरंगाबाद खंडपीठाने उपस्थित केला होता.

यानंतर बुधवारी (९ जुलै) छावणी पोलिस ठाण्यात संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये नर्स चिता भास्कर गायकवाड (५६), केअरटेकर अलका फकिर साळुंके (४६), सहायक अधीक्षिका अन्वेली भगवान जोसेफ (३१) आणि कमल डेव्हिड गिऱ्हे (४८) यांच्या विरोधात बालिकांच्या फिर्यादीवरून कारवाई झाली आहे.

फिर्यादीत मुलींनी गंभीर आरोप करत सांगितले, की बालगृह प्रशासनाने त्यांच्या शिक्षणास प्रतिबंध केला. बाल कल्याण समिती येणाऱ्या वेळी मुलींना खोलीत बंद केले जायचे. पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नव्हती; बाथरूममधील नळाचे पाणी प्यावे लागायचे. अन्नही अपुरे दिले जायचे. दोन खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते, ज्यामुळे कपडे बदलताना लज्जास्पद स्थिती निर्माण होत होती. एकदा कॅमेऱ्याची दिशा बदलल्यावर सिस्टरने रागाने दरवाजा बंद केला. मुलींनी दार उघडले नाही, तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रकरण शांत केले.

त्यानंतर एका मुलीच्या दातात खिळ बसल्यानंतर उपचाराऐवजी सिस्टरने पवित्र पाणी शिंपडल्याने संताप वाढला. दुसऱ्या दिवशी मुलींनी समितीला भेट देण्याची मागणी केली. मात्र समिती न आल्याने त्यांनी निषेध म्हणून कॅमेरा फोडला आणि गेट तोडून गच्चीवरून उडी घेत बाहेर पळ काढली. शेवटी कोर्ट परिसरात ‘दामिनी पथकाने’ त्या मुलींना ताब्यात घेतले, असेही फिर्यादीत नमूद आहे...................................................

मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU

अट्टल घरफोड्यांच्या मुलांची गुन्हेगारीत एन्ट्री; सात दुचाकींसह दोघांना अटकमॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर...
09/07/2025

अट्टल घरफोड्यांच्या मुलांची गुन्हेगारीत एन्ट्री; सात दुचाकींसह दोघांना अटक

मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नामांकित गुन्हेगारांच्या मुलांनीही आता गुन्हेगारी क्षेत्रात पाय ठेवला आहे. अट्टल घरफोडी प्रकरणांमध्ये नाव असलेल्या सुरेश उघडे व गंमतीदास काळे यांची मुले – सुमित सुरेश उघडे (१९) आणि राज गंमतीदास काळे (२०), रा. राजनगर, मुकुंदवाडी – यांना दुचाकी चोरीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून २ लाख ९५ हजार रुपये किंमतीच्या सात दुचाकी जप्त केल्या आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी दिली.

मुकुंदवाडी परिसरात अलीकडच्या काळात दुचाकी चोरीचे प्रकार वाढले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता आरोपींचा माग काढण्यात यश आले. अटक केल्यानंतर सुमित आणि राज यांनी चोरीची कबुली दिली. दोघांचे वडील पूर्वीपासून घरफोड्यांमध्ये गुंतलेले असून, ही दुसरी पिढी लहानपणापासूनच मोबाइल व दुचाकी चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय होती. आता ते वयाने सज्ञान झाल्याने त्यांच्या नावावर प्रथमच अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे यांनी दिली. या कारवाईत सहाय्यक फौजदार नरसिंग पवार, अंमलदार बाबासाहेब कांबळे व गणेश वैराळकर यांनी सहभाग घेतला...................................................

मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU

भाजपला रोखण्यासाठी एमआयएम महाविकास आघाडीत जाण्यासाठी तयारमॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर : महापालिका निवड...
09/07/2025

भाजपला रोखण्यासाठी एमआयएम महाविकास आघाडीत जाण्यासाठी तयार

मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीत भारतीय‎ जनता पक्षाला रोखण्यासाठी‎ महाविकास आघाडीला आॅल इंडिया ‎‎इत्तेहादूल मुस्लिमिन’ (एमाआयएम) ‎‎‎पक्ष आघाडीचा ‎‎‎प्रस्ताव देणार‎‎आहे.‎‎त्याचबरोबर ‎‎‎राज्यातील सर्व ‎‎‎महापालिका, ‎‎‎जिल्हा परिषद, ‎‎नगरपालिका, पंचायत समितीच्या ‎‎निवडणुका पक्ष लढणार असल्याचे ‎‎एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज ‎‎जलील यांनी सांगितले.

एमआयएमने २०१२ मध्ये नांदेड मनपा‎ निवडणुकीत ११ जागा जिंकल्या‎ होत्या. त्यानंतर संभाजीनगरमध्ये २६,‎अमरावतीत १२, बीडमध्ये ९‎ नगरसेवक विजयी झाले होते. पक्षाने‎छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आणि नंतर लोकसभा मतदारसंघाची‎ जागा जिंकून राज्यात स्थान निर्माण‎ केले होते. सध्या पक्षाचे नेते खासदार‎ असदुद्दीन ओवेसी राज्यात सभा घेत‎आहेत. मनपा निवडणुकीसाठी‎ पक्षाकडून प्रचार करण्यात येत आहे.‎

एमआयएमने यापूर्वी नांदेड, छत्रपती‎संभाजीनगर, अमरावती, मुंबई, पुणे,‎जळगाव, मालेगाव, बीड आदी‎स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका‎ लढवल्या आहेत. पक्षाचे सुमारे १२५‎नगरसेवक होते. भाजपला सत्तेपासून‎ दूर ठेवण्यासाठी महाविकास‎ आघाडीला स्थानिक स्वराज्य‎ संस्थेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा‎प्रस्ताव दिला जाईल. यापूर्वीचा‎ अनुभव पाहता तो मंजूर होईल की‎ नाही याची शाश्वती नाही, असे‎ इम्तियाज जलील यांनी सांगितले.‎..................................................

मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU

जायकवाडी धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली; आज सकाळी .....मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर : नाशिक जिल्ह्या...
08/07/2025

जायकवाडी धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली; आज सकाळी .....

मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : नाशिक जिल्ह्यासह पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. सध्या ४२ हजार ८२२ क्युसेक वेगाने पाणी धरणात प्रवेश करत असून, यामुळे आज, ८ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत धरणाचा पाणीसाठा ५७.२९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

गत काही दिवसांपासून पाणलोट भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येत असून, धरणात येणाऱ्या पाण्याच्या वेगात मोठी वाढ झाली आहे. प्रशासन सातत्याने पाणीपातळीवर लक्ष ठेवून असून, आवश्यकतेनुसार पुढील उपाययोजना आखण्यात येणार आहेत. धरण परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
..................................................

मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU

वाळूज पंढरपुरात ३१ जणींचे दागिने लंपास; मोबाईलचा हिशोब जुळेनामॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर : आषाढी एकाद...
07/07/2025

वाळूज पंढरपुरात ३१ जणींचे दागिने लंपास; मोबाईलचा हिशोब जुळेना

मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीनिमित्त धाकट्या पंढरपूरमध्ये लाखो भाविकांची मांदियाळी जमली होती. सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा बंदोबस्त असतानाही गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत तब्बल ३१ महिलांची मंगळसूत्रे लंपास केली. तर किती मोबाईल गेले याचा अंदाज आणि हिशोब पोलिस कर्मचाऱ्यांना लागत नाहीये. चोरट्यांच्या हातसफाईचा जबर फटका बसल्याने महिला भाविकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. रविवारी आषाढी यात्रेनिमित्त प्रति पंढरपूर येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही मोठी गर्दी होती. या साठी एक पोलीस उपायक्त ( डीसीपी ), एक सहायक पोलीस आयुक्त (एसीपी), २४ एपीआय/पीएसआय, १९० अंमलदार, ३३ होमगार्ड आणि ३५० स्वयंसेवक असा जबरदस्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात पोलिसांची उपस्थिती फक्त मंदिर परिसर आणि काही मुख्य प्रवेशद्वारांपुरती मर्यादित होती. यामुळे गर्दीच्या मुख्य 'मार्गावर चोरटयांना मोकळे रान मिळाले. प्रशासनाचा पोलीस बंदोबस्तव मंदिर समितीच्यावतीने करण्यात आलेली स्वयंसेवकांची यंत्रणा चोरट्यांवर वॉच ठेवण्याच्या कामात कुचकामी ठरली. दरम्यान, पोलिसांनी२५ संशयित 'महिला व पुरुषाना ताब्यात घेतले असून, त्यामध्ये १४ते ४० वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे...................................................

मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU

04/07/2025

काळा गणपती मंदिरासमोर भीषण अपघात; दोन ठार, चार जखमी – छत्रपती संभाजीनगर हादरलं

मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : शहरातील काळा गणपती मंदिर परिसर आज सकाळी एका भीषण अपघातामुळे हादरला. भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने मंदिरासमोर उभ्या असलेल्या भाविकांच्या गर्दीत अचानक घुसून अनेकांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर काही क्षणांत परिसरात एकच गोंधळ उडाला.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, चारचाकीचा वेग खूपच जास्त होता आणि वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट मंदिरासमोरील गर्दीत गाडी घुसली. यामुळे रस्त्यावर रक्ताचे थारोळे साचले होते. घबरलेले भाविक आणि नागरिक आरडाओरड करत धावपळ करत होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व जखमींना रुग्णवाहिकेमधून जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

दुर्घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. अनेकांनी प्रशासनाच्या हलगर्जीवर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, वाहनचालकाला पोलिसांनी पकडले की तो पळून गेला, यासंदर्भात अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही. अपघाताची नोंद घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला असून चालक नशेत होता का याचीही चौकशी सुरू आहे. शहरात शांतता असली तरी अपघाताच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरलेला आहे. यापुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी वाहतूक नियंत्रण व मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे...................................................

मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU

मुकुंदवाडी, पैठण रोड नंतर आज पडेगाव रोडवर पाडापाडी  सत्रमॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर: रस्ता रुंदीकरण म...
03/07/2025

मुकुंदवाडी, पैठण रोड नंतर आज पडेगाव रोडवर पाडापाडी सत्र

मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर: रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत गुरुवार, दि. ३ जुलै रोजी महापालिकेने पढेगाव ते दौलताबाद टी-पॉइंटदरम्यान पाडापाडी कारवाईला सकाळी ८ वाजल्यापासूनच सुरुवात केली. महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक, नगररचना विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते. बुधवारी दिवसभर नगररचना विभागाने बाधित मालमत्तांवर मार्किंग केले होते आणि बहुतांश मालमत्ताधारकांनी स्वतःहून अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात केली होती.

शहर विकास आराखड्यानुसार पडेगाव ते दौलताबाद टी-पॉइंट दरम्यानचा रस्ता ६० मीटर म्हणजेच १९६ फूट रुंद प्रस्तावित आहे. या रस्त्यावर ढाबे, हॉटेल्स, नाष्टा केंद्रे, चहा स्टॉल, किराणा व इतर दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. निवासी मालमत्ता तुलनेत फारच कमी असून, बऱ्याच मालमत्ताधारकांकडे जमिनीचे मालकी हक्काचे दस्तऐवज आहेत. त्यामुळे बाधित भागाचा मोबदला टीडीआरच्या स्वरूपात द्यावा, अशी मागणी संबंधितांनी केली आहे.

महापालिकेने मंगळवारपासून या भागात भोंग्याद्वारे जनजागृती करत पूर्वसूचना दिली होती. स्मशानभूमीपासून सुरू झालेल्या मोजणीच्या प्रक्रियेत आतापर्यंत सुमारे ३ किमी अंतरापर्यंत मार्किंग पूर्ण झाले असून, उर्वरित अंतराचे मार्किंग गुरुवारी पूर्ण करण्यात आले. सकाळपासून सुरू झालेल्या कारवाईत अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात येत असून, शहरातील वाहतूक व्यवस्था सुलभ करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे...................................................

मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU

किर्तनकार संगीताताई पवार हत्या प्रकरणाचा उलगडा; दोन आरोपी जेरबंदमॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर – वैजापूर...
03/07/2025

किर्तनकार संगीताताई पवार हत्या प्रकरणाचा उलगडा; दोन आरोपी जेरबंद

मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर – वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील आश्रमात महिला किर्तनकार ह.भ.प. संगीताताई अण्णासाहेब पवार महाराज यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. अखेर पोलिसांनी या प्रकरणातील दोघा आरोपींना अटक करून खळबळजनक तपशील उघड केला आहे.

ही घटना २७ जून रोजी घडली होती. चोरटे मंदिरात चोरीच्या उद्देशाने शिरले होते. त्यांनी मंदिराचे कुलूप तोडून दानपेटी, मूर्त्या आणि इतर साहित्य चोरले. त्यानंतर मंदिराबाहेर झोपलेल्या संगीताताई पवार यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. त्यांच्या भावाच्या फिर्यादीवरून विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, महालगाव शिवारात एका संशयिताची हालचाल आहे. पोलीस पथकाने तेथे धाव घेऊन संतोष उर्फ भायला चौहान (रा. मध्यप्रदेश, सध्या वैजापूर) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याचा साथीदार अनिल उर्फ हाबडा विलाला हा मध्यप्रदेशात पळाल्याचे सांगितले. पोलिसांनी मध्यप्रदेशमध्ये शिरपूर येथे धाड टाकून अनिललाही अटक केली.

दोन्ही आरोपींनी चोरीच्या उद्देशाने गुन्हा केल्याची कबुली दिली असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना विरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे किर्तनकार संगीताताई पवार यांच्या हत्येचा तपास वेगाने पुढे सरसावला असून संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे...................................................

मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU

मोमोज खायला थांबला अन् कारमधील २० लाखांची बॅग लंपासमॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर - हडको कॉर्नर येथील डी...
30/06/2025

मोमोज खायला थांबला अन् कारमधील २० लाखांची बॅग लंपास

मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर - हडको कॉर्नर येथील डीमार्टसमोर गुरुवारी (२६ जून) सायंकाळी सुमारे पाच वाजता कारमधून २० लाखांची रोख रक्कम चोरीला गेली. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे अकाउंटंट वऱ्हलबाबु सत्यम कुरपूरोल (वय २७, रा. दुग्गड, जि. अनकापल्ली) हे रक्कम जालना येथील कार्यालयात नेण्यासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत कर्मचारी राजारेड्डी, मल्लेश्वरराव आणि बोलेरो गाडीचा चालक किरण चव्हाण (एमएच-२०-ईई-९८८८) होते.

प्रथम पैठण गेट येथे रेनकोट खरेदीसाठी गाडी थांबवण्यात आली. पुढे दिल्ली गेट मार्गे जाताना डीमार्टजवळ भूक लागल्याने चौघांनी मोमोज खाण्यासाठी गाडी लावली. यावेळी कार लॉक करण्याचा विसर पडल्याने चोरट्याने संधी साधत गाडीतून २० लाखांची बॅग चोरली. परत आल्यावर चोरी लक्षात येताच त्यांनी चौकशी केली असता, मोमोज विक्रेत्याने पांढरा शर्ट व टोपी घातलेल्या व्यक्तीला गाडी उघडताना पाहिल्याचे सांगितले. मात्र त्याच्या ओळखीबद्दल माहिती देऊ शकला नाही.

दरम्यान, डीमार्टसमोर हा प्रकार घडल्याने सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु डीमार्ट प्रशासनाने सीसीटिव्ही फुटेज देण्यास नकार दिला. अखेर फिर्यादीने व्यवस्थापक इंगळे यांच्या मदतीने सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी करीत आहेत...................................................

मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU

बनावट वेबसाईटवरून स्टील खरेदीचा गंडा; एक लाख रुपयांची फसवणूकमॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर : बांधकामासाठ...
28/06/2025

बनावट वेबसाईटवरून स्टील खरेदीचा गंडा; एक लाख रुपयांची फसवणूक

मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : बांधकामासाठी आवश्यक असलेले स्टील खरेदी करण्यासाठी ऑनलाईन शोध घेत असताना एका बनावट वेबसाईटच्या जाळ्यात अडकून कंपनीच्या व्यवस्थापकाची तब्बल एक लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सीटीआर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत १६ ते २३ एप्रिल २०२४ या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी उत्तरप्रदेशातील शिवम मिश्रा याच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिलकुमार श्रीलालकुमार वर्मा, जे या कंपनीत वरिष्ठ फायनान्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत, यांनी १६ एप्रिल रोजी स्टीलसाठी इंटरनेटवर शोध घेतला. त्यावेळी 'श्री सिद्धेश्वर इंडस्ट्री' या नावाच्या स्टील पुरवठादार कंपनीचा संदर्भ मिळाला. त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर स्वत:ला टाटा स्टीलचा वितरक असल्याचे सांगण्यात आले. पुढे १५ लाख १५ हजार रुपयांच्या स्टीलसाठी बील पाठवण्यात आले आणि एक लाख रुपये अ‍ॅडव्हान्स मागण्यात आले. वर्मा यांनी २३ एप्रिल रोजी कॅनरा बँकेच्या एका खात्यात एक लाख रुपये पाठवले. मात्र, नंतर स्टीलची कोणतीही डिलिव्हरी आली नाही. आरोपीकडून वारंवार संपर्क करण्याचे प्रयत्न केले, तरी प्रतिसाद मिळाला नाही.

खरेदी खात्याच्या तपासात फसवणुकीचा उलगडा

माल पोहोचत नसल्याने वर्मा यांनी प्रत्यक्ष कंपनीशी संपर्क साधला. त्यावेळी खरेदी विभागप्रमुख उन्नी कृष्णन यांनी कोणतीही रक्कम घेतली नसल्याचे सांगितले आणि दिलेले बँक खाते देखील त्यांच्या नावावर नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे हा संपूर्ण बनावट व्यवहार उघडकीस आला. सध्या पोलिसांनी बँक खात्याचा तपशील मिळवून आरोपीचा शोध सुरू केला आहे...................................................

मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU

दुचाकींवर टोल? गडकरींचं स्पष्ट स्पष्टीकरण; अफवांना मिळाला पूर्णविराममॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्कनवी दिल्ली – "दुचाकी वा...
26/06/2025

दुचाकींवर टोल? गडकरींचं स्पष्ट स्पष्टीकरण; अफवांना मिळाला पूर्णविराम

मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – "दुचाकी वाहनांवर टोल आकारला जाणार" अशा बातम्यांनी देशभरात खळबळ उडवली असतानाच, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांनी या बातम्या पूर्णपणे खोट्या व दिशाभूल करणाऱ्या असल्याचं जाहीर करत दुचाकीस्वारांना दिलासा दिला आहे.

गडकरी यांनी त्यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर पोस्ट करत म्हटले आहे की, “काही मीडिया हाऊस दुचाकी वाहनांवर टोल लावण्यासंदर्भात खोट्या बातम्या पसरवत आहेत. असा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही. दुचाकींना टोल सवलत यापुढेही कायम राहील. अशा प्रकारच्या अपुऱ्या माहितीच्या आधारे बातम्या प्रसिद्ध करणे ही निरोगी पत्रकारितेची ओळख नाही. मी अशा वृत्तांचा निषेध करतो.”

यासोबतच, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने देखील यावर अधिकृत निवेदन जारी करून या अफवांना पूर्णविराम दिला आहे. NHAI ने स्पष्ट केले की, “दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याची कोणतीही योजना नाही आणि सध्या तरी असा कोणताही प्रस्ताव विचाराधीनही नाही.”

दरम्यान, काही माध्यमांमध्ये अशी चुकीची माहिती पसरवण्यात आली होती की, १५ जुलै २०२५ पासून सर्व राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकींवर टोल वसूल केला जाणार आहे. परंतु आता अधिकृतरित्या हे स्पष्ट झाले आहे की, दुचाकीस्वारांसाठी टोलमुक्त सुविधा पूर्ववतच राहणार आहे.

दुचाकी वापरकर्त्यांना कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही, कारण सरकारने स्पष्ट केले आहे की, टोल सवलत कायम राहणार आहे...................................................

मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU

Address

AK

Alerts

Be the first to know and let us send you an email when Moral Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Moral Maharashtra:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share