16/04/2026
रौद्र रूप धारण करणाऱ्या पाण्याची स्थिरता पाहून थोडा थांबलो. उगाचच पाण्याच्या खोलीचा अंदाज मनाशी बांधू लागलो. त्याचा तळ माझ्या मनाशी काही लागता लागेना. त्याचा तळ शोधता शोधता मी मनाचा तळ कधी शोधू लागलो हे मलाच कळाले नाही. मनात विचारांचा गोंधळ निर्माण झालेला असताना ते पाणी पाहून अचानक तो सर्व गोंधळ थांबला आणि मनाचा स्थिरतेच्या दिशेने प्रवास चालू झाला. या पात्राच्या काठी वसलेली लोकवस्ती किती भाग्यवान आहे नाही का मनाला वाटेल तेव्हा ते त्याच्या काठी जाऊन स्थिर होण्यासाठी बसु शकतात.