Daily Lok Parishad News

Daily Lok Parishad News Daily Lok Parishad is a Newspaper & Online News Channel. it's been published in Multi Languages: Marathi, Hindi & English

02/09/2024
29/08/2024

उप्र के फ़र्रूख़ाबाद में जन्माष्टमी उत्सव देखने निकली दो बच्चियों की लाशें पेड़ पर लटकी मिलना, एक बेहद संवेदनशील घटना है।

भाजपा सरकार इस मामले में तत्काल निष्पक्ष जाँच करे और हत्या के इस संदिग्ध मामले में अपनी आख्या प्रस्तुत करे। ऐसी घटनाओं से समाज में एक भयावह वातावरण बनता है, जो नारी समाज को मानसिक रूप से बहुत गहरा आघात पहुँचाता है।

‘महिला सुरक्षा’ को राजनीति से ऊपर उठकर एक गंभीर मुद्दे के रूप में उठाने का अपरिहार्य समय आ गया है।

22/08/2024

'मी आता माझ्या मुलीजवळ मिरची पावडर आणि स्प्रे देऊन ठेवणार आहे'
"मी स्वतः बदलापूरमध्ये लहानाची मोठे झाले. मी इथंच शिकले. पण कधीही इतकी भीती वाटली नाही. या घटनेनंतर आता भयंकर काळजी वाटायला लागली आहे. मुलांना शाळेत पाठवायचं की नाही, असा विचार डोक्यात येतो.

"शाळेत मावशी असल्या तरी त्या मुलांना कुठपर्यंत सांभाळतील. हा माणूस वाईट, तो माणूस वाईट, किती वाईट शिकवायचं मुलांना? आता असं वाटतं ऑनलाइन शिक्षणच बरं होतं. निदान आपली मुलं आपल्या डोळ्यासमोर शिकत होती.

"मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटतेय. आजकाल माणसांवर विश्वासच राहिला नाही. मी आता माझ्या मुलीजवळ मिरची पावडर आणि स्प्रे देऊन ठेवणार आहे."

लाडकी बहीण योजनेसाठी निवडणूक लांबणीवर? विधानसभा निवडणुका कधी होणार?गेल्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत केंद...
21/08/2024

लाडकी बहीण योजनेसाठी निवडणूक लांबणीवर? विधानसभा निवडणुका कधी होणार?
गेल्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात गरज भासल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत दिले होते.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर घेतली जाईल, असे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले असले तरी, प्रत्यक्षात ही निवडणूक विधानसभेची मुदत संपल्यानंतर, म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण' योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडली असल्याचे मानले जाऊ लागले आहे. योजनेचे दोन हप्ते एकत्रितपणे काही दिवसांपूर्वी लाभार्थींच्या खात्यांत जमा करण्यात आले. मात्र, विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांची अधिकाधिक मते मिळवायची असतील, तर योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

तसेच, योजेनेचे आणखी किमान दोन-तीन हप्ते तरी महिलांच्या बँक खात्यात जमा होणे आवश्यक आहे. त्याआधीच आचारसंहिता लागू झाली तर मोठा खोळंबा होण्याची शक्यता असल्याने निवडणुकीची घोषणा विलंबाने केली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अनेक महिलांनी योजनेमध्ये अर्ज केले असले तरी त्यातील अनेक अपात्र ठरण्याची शक्यता आहे. अपात्र अर्जांची छाननी करण्याचे काम सरकारने सुरू केले आहे. शिवाय, ही योजना व्यापक करण्यासाठी नवे अर्जही भरून घेतले जाणार आहेत. या दोन्ही कामांसाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ‘लाडकी बहीण' योजनेची योग्य व लाभदायी अंमलबजावणी करण्यासाठी महायुतीला पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने विधानसभेची निवडणूक डिसेंबरमध्ये, झारखंडबरोबर घेतली जाणार असल्याचे समजते.

DoPT Minister writes to Chairman UPSC, cancelling lateral entry advertisement on PM Modi's directions.
21/08/2024

DoPT Minister writes to Chairman UPSC, cancelling lateral entry advertisement on PM Modi's directions.

‘मग हे बुलडोजर बदलापूरला का नाही गेले?’, संजय राऊत यांचा नाव न घेता कोणावर निशाणा?देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन केली ...
21/08/2024

‘मग हे बुलडोजर बदलापूरला का नाही गेले?’, संजय राऊत यांचा नाव न घेता कोणावर निशाणा?
देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन केली आहे. त्याची गरज काय? आरोपी पकडलेला आहे. पोलिसांकडून तपासही सुरु आहे. SIT हा शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाही. ठाकरे सरकारने अनेक गुन्ह्यात ज्या SIT स्थापन केल्या होत्या, त्या गृहमंत्री झाल्यावर पहिल्या २४ तासात फडणवीसांनी रद्द केल्या. उद्धव ठाकरेंनी स्थापन केलेल्या SIT फार गंभीर गुन्ह्यातील होत्या, असेही संजय राऊतांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपूर्वी मधल्या काळात योगींचं जे बुलडोझर राज्य सुरु आहे. तसे काही ठिकाणी बुलडोझर चालवण्याचे काम शिंदे सरकारकडून केले जात आहे. हे बुलडोझर बदलापूरला का गेले नाही? असा थेट सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. याआधी अशाप्रकारच्या गुन्ह्यात जरब बसावी म्हणून बुलडोझर चालवण्यात आले आहेत. जनतेचा काल उद्रेक पाहायला मिळाला. याला कायदेशीर भाषेत पब्लिक क्राय असं म्हटलं जातं. जेव्हा जेव्हा अशाप्रकारे पब्लिक क्राय होतो, तेव्हा न्यायालयाने या घटनांची दखल घेतली आहे. मग कालच्या पब्लिक क्रायची दखल सर्वोच्च न्यायालयाने का घेतली नाही? असा सवाल करत संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला. कोलकात्यामध्ये घडलेल्या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालय घेतं, कारण तिथे ममता बॅनर्जींचं सरकार आहे, बदलापुरात कोलकत्यापेक्षा जास्त पब्लिक क्राय होता पण तरीही चिमुकल्यांचा आक्रोश न्यायालयाच्या कानाचे पडदे फाडू शकला नाही, असा आरोपही संजय राऊतांनी केला.

आंखों में आंसू, घुटनों पर पुतिन, 20 साल पहले रूस को मिला था गहरा जख्म, फिर खाई बदले की कसम:रूस को 20 साल पहले मिले एक जख...
21/08/2024

आंखों में आंसू, घुटनों पर पुतिन, 20 साल पहले रूस को मिला था गहरा जख्म, फिर खाई बदले की कसम:
रूस को 20 साल पहले मिले एक जख्म की टीस राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन के दिल में अब भी ताजा है. मंगलवार 20 अगस्त को वह बेसलान शहर में एक स्मारक पर पहुंचे थे, जहां उन्होंने घुटनों के बल बैठकर बदले की कसम खाई. तो चलिये हम यहां आपको बताते हैं उस घटना के बारे...
रूस को 20 साल पहले ऐसा जख्म मिला था, जिसकी टीस राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन के दिल में अब भी ताजा है. पुतिन 20 अगस्त को बेसलान शहर में एक स्मारक पर पहुंचे. इस दौरान उनकी आंखों में आंसू साफ दिख रहे थे. वह यहां स्मारक के सामने घुटनों के बल और फिर मुठ्ठी बांधकर बदले की कसम खाई. दरअसल यह स्मारक उन 333 लोगों की याद में बना गया था, जिनकी बेसलान शहर में एक स्कूल पर हुए आतंकी हमले में मौत हो गई थी.

“माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था तातडीने काढा…”, सुप्रिया सुळेंनी गृहमंत्र्यांकडे केली मोठी विनंती, कारण…बदलापूर या घटनेचे प...
21/08/2024

“माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था तातडीने काढा…”, सुप्रिया सुळेंनी गृहमंत्र्यांकडे केली मोठी विनंती, कारण…

बदलापूर या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. आता या प्रकरणावरुन सुप्रिया सुळे यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी गृहमंत्र्यांकडे एक मोठी विनंती केली आहे.
“राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडत चालली आहे. पोलिसांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था तातडीने काढा”, अशी विनंती राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. आता या प्रकरणावरुन सुप्रिया सुळे यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी गृहमंत्र्यांकडे एक मोठी विनंती केली आहे.

अक्षय शिंदेच्या जागी अकबर शेख, खान असता, तर….सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?"ज्या पालकांनी न्याय मागितला, त्यांच्यावर ...
21/08/2024

अक्षय शिंदेच्या जागी अकबर शेख, खान असता, तर….सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?
"ज्या पालकांनी न्याय मागितला, त्यांच्यावर गुन्हा दाखल करता आणि जो वामन म्हात्रे घाणेरडी टिप्पणी करतो, त्याला सोडून देता आणि अपेक्षा करता लोकांनी शांत बसलं पाहिजे" अशा शब्दात सुषमा अंधारेंनी संताप व्यक्त केला.
“एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना विषय हाताळता येत नाही. त्यामुळे त्यांना हिमालयात पाठवा. गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री करा. गिरीश महाजन एवढे शहाणे, गुणी असतील तर त्यांना मुख्यमंत्री करा” अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी महिला अत्याचाराच्या विषयावर श्वेतपत्रिका काढली पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे मागच्या 10 वर्षात साडेसात वर्ष गृहमंत्री आहेत” असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. काल पोलिसांनी लाठीचार्ज केला. पालक जखमी झालेत. काहींना अटक झाली. या प्रश्नावर सुषमा अंधारे म्हणाल्या की, “ज्या पालकांनी न्याय मागितला, त्यांच्यावर गुन्हा दाखल करता आणि जो वामन म्हात्रे घाणेरडी टिप्पणी करतो, त्याला सोडून देता आणि अपेक्षा करता लोकांनी शांत बसलं पाहिजे”

Address

N-9 A, Shop No. 6, Shivneri Colony, Cidco
Aurangabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Daily Lok Parishad News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share