21/03/2026
‘शिवाजी महाराजांची तलवार’ पुस्तकाच्या ९७ व्या वर्षपुर्तीनिमीत्त पुनःप्रकाशन! 🙏🏻✨
इ.स. १९२९ साली बोमोनजी पुदुमजी या इतिहासात रस असणाऱ्या व्यावसायिकाने इंग्रजीत एक पुस्तक छापलं! ‘Notes on the Subjects of Shivaji’s Sword’ असं त्याचं नाव. या बरोबरच अजुन दोन विषयांना या लेखकाने हात घातला, एक तर शिवाजी महाराजांचे चित्र आणि दुसरे सिंहगडावरील ‘जवाहीरखाना’ नावाने ओळखले जाणारे ठीकाण.
आज बघत असताना कदाचित हे पुस्तक आपल्याला फार रिलिव्हंट वाटणार नाही, किंवा ऐतिहासिकदृष्ट्या बाद आहे असं वाटेल. पण इतिहासाचा विद्यार्थी म्हणून विचार केल्यास या पुस्तकाचे असलेले अपार महत्व आपल्याला कळेल. यातील काही संदर्भ आज बाद आहेत मान्य! पण १९२९ साली एक व्यक्ती उत्सुकतेने त्याला मिळालेल्या तलवारीवर संशोधन करुन पुस्तक छापू इच्छितो हे थोर आहे.
हे पुस्तक मी वाचलं आणि मला वाटलं की हे सर्वांपुढे आणलं पाहिजे. १९२९ साली बरोबर आजच्या दिवशी म्हणजे २१ मार्च ला हे प्रकाशित झालं होतं आणि आज ९७ वर्षांनंतर या पुस्तकाचं पुनःप्रकाशन करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आज हे पुस्तक पुनःप्रकाशित झालं असं इथे जाहिर करतो.
हे पुस्तक आपल्यापर्यंत पोहोचवू शकलो याचा आम्हाला आनंद आहे. येत्या काळात अनेक असे ग्रंथ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे.
या पुस्तकाला आपण जो उदंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल मनःपूर्वक आभार!
- आख्यान प्रकाशन