31/10/2025
'भी स्वतःच माझा खून करून घेईन. तुम्हाला महेश गायकवाड, महेश पाटील यांचे समर्थन आहे का,' अशी बेताल वक्तव्य करत उल्हासनगर मधील एका मद्यधुंद ४० वर्षाच्या टेम्पो चालकाने गुरूवारी रात्री कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथील कोळसेवाडी वाहतूक पोलिसांच्या चौकीत धिंगाणा घालून वाहतूक पोलिसांना शिवीगाळ, दमदाटी, अरेरावी आणि धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणला.
या मद्यपी चालकाच्या विरूध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश मल्हारी साळुंखे (४०) असे मद्यधुंद टेम्पो चालकाचे नाव आहे. तो उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक मधील भीमनगरमध्ये शंकर किराणा स्टोअर्स भागात राहतो. कोळसेवाडी वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंदराव हनुमंतराव थोरात (४९) यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.