Press Club Of Badlapur

  • Home
  • Press Club Of Badlapur

Press Club Of Badlapur सामान्य बदलापूरकरांच्या समस्यांचा आवाज

बदलापुरात उलगडला १३ दिवसांचा शिवराज्याभिषेक सोहळाछत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा शुक्रवारी विविध कार्यक्रमां...
07/06/2025

बदलापुरात उलगडला १३ दिवसांचा शिवराज्याभिषेक सोहळा

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा शुक्रवारी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संपन्न झाला. त्यानिमित्त प्रेस क्लब ऑफ बदलापूर आणि संवेग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेकाची गाथा या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. यावेळी शिवछत्रपतींनी लिहलेल्या मुळ पत्रांचेही प्रदर्शन मांडले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला माजी उपनगराध्यक्ष आणि संवेग फाऊंडेशनचे सर्वेसर्वा श्रीधर पाटील यांच्या पाटील बॅन्वेट सभागृहात बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राचे अनावरण करण्यात आले. सुप्रसिद्ध चित्रकार सचिन जुवाटकर यांनी हे चित्र रेखाटले आहे. त्यानंतर कौस्तुभ कस्तुरे यांनी राज्याभेषिकाच्या १३ दिवसांच्या सोहळ्याचा वृत्तांत उपस्थित श्रोतांसमोर सांगितला.
प्रेस क्लब ऑफ बदलापूरतर्फे सुप्रसिद्ध चित्रकार सचिन जुवाटकर यांचा आणि संवेग फाऊंडेशनचे प्रमुख श्रीधर पाटील यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार वासुदेव बोंद्रे यांनी चितारलेले विशेष चित्र प्रेस क्लब ऑफ बदलापूरततर्फे लेखक कौस्तुभ कस्तुरे यांना देण्यात आले.

शिवराज्याभिषेकाचा सोहळा सभासदांसह त्यावेळी उपस्थित असलेल्या अनेक जणांनी याबाबत लिहून ठेवल्याची माहिती यावेळी कौस्तुभ कस्तुरे यांनी दिली. त्या नोंदी परदेशी व्यक्तींनीही केल्या होत्या. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळा विविध विधी आणि कार्यक्रमांनी भरलेला होता. तीन टप्प्यात हा सोहळा पूर्ण झाला. राज्याभिषेक, राज्यारोहण आणि राज्यदर्शन असे तीन सोहळे त्यात होते. मुख्य सोहळ्याच्या दहा दिवस आधी विधी सुरू झाले होते. पहिल्या दिवशी महाराजांची मुंज झाली मग नियोजीत धार्मिक पद्धतीने राणी सोयराबाई यांच्याशी विवाह, त्यानतंर महाराजांची विविध प्रकारची तुला झाली. इंद्री शांती, विष्णू याग असे विधीही झाले. राज्याभिषेकाच्या दिवशी देशभरातील नद्यांतून आणलेल्या पाण्याने, तेलाने स्नान अशा अनेक गोष्टी त्यावेळी होत्या, असे कौस्तुभ कस्तुरे यांनी सांगितले.
राज्याभिषेकाच्या दिवशी गडावरील वातावरण वेगळेच होते. शिवाजी महाराज्यांचे भोवती सोन्याचा कळस, मोहरा असलेले कळस, छत्र घेऊन, ध्वज घेऊन अनेक जण महाराजांच्या भोवती उभे होते. महाराजांच्या हातात धनुष्य, एका हातात मुर्ती होती. उपस्थितांच्या हाती विविध गोष्टी होत्या. कुणी लाह्या, कुणी फुले उधळत होते. उपस्थित कुणी नाचत होते, कुणी जयघोष करत होते, कुणी नाचत होते, असे सांगत कस्तुरे यांनी राज्याभिषेकाचा क्षण श्रोत्यांपुढे उभा केला. सिंहासनावर बसल्यानंतर महाराजांची सुरूवातीला घोडा आणि नंतर हत्तीवरून रायगडावर मिरवणुक काढण्यात आली. हा राज्यदर्शन सोहळा होत असताना कवी भुषण यांनी त्यावर काव्यही केले, त्यातून या सोहळ्याची महती कळते, असे कस्तुरे म्हणाले.
राज्याभिषेक सोहळा महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा ठरला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्वीजय केला. त्यानंतर दक्षिणेत मराठा साम्राज्याचे वर्चस्व वाढले. राज्यांच्या कारभारात एक आदर्शपणा होता. आज्य जे फुकट वाटण्याचा प्रकार सुरू आहे तो शिवारायांच्या काळात नव्हता. शेतकऱ्याला शिवाजी महाराजांनी वेळोवेळी मदत केली. जनावरे नसतील तर जनावरे, शेतीसाठी हत्यारे, वेळप्रसंगी मजुरही देऊ केले. मात्र काही वर्षांनंतर त्याची भांडवली रक्कम सरकार दरबारी जमा करावी अशा महाराजांच्या सूचना होत्या. शेतकऱ्यांसह सर्वांनाच पायावर उभे करण्याचे बळ देण्याचा विचार महाराजांचा होता, असेही कस्तुरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. महाराजांनी गोव्यातील धर्मांतर रोखले, पाद्रींनी वेळेप्रसंगी कठोर शिक्षा दिली. धर्मांतरण करणाऱ्या पाद्रींनाही धर्मांतराचा प्रस्ताव महाराजांनी दिला होता, त्याचे पुरावे आहेत असेही यावेळी कस्तुरे म्हणाले.

समष्ठीसाठी प्रयत्नाची गरज
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संवेग फाऊंडेशनचे प्रमुख श्रीधर पाटील यांनी आपल्या सर्वांना समष्टीसाठी प्रयत्नशील राहायला हवे असे आवाहन केले. आपल्या मुलांची वाढ कोणत्या वातावरणात होते हे महत्वाचे आहे. त्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवे. आपल्या घराबाहेर, रस्त्यावर, चौकात सुरू असलेल्या चुकीच्या प्रकारांना विरोध करायला हवा. ही समष्ठी त्यांच्या भविष्यासाठी महत्वाची आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले. संवेग फाऊंडेशनच्या माध्यमातून यावेळी गुणवंत विद्यार्थांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रेस क्लब ऑफ बदलापुरचे सचिव संजय साळूंके, सदस्य, सचिन जुवाटकर, स्वप्ना पाटील यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या संकेत सबनीस यांनी केले.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रेस क्लब ऑफ बदलापूरचे उपाध्यक्ष प्रशांत मोरे, सचिव संजय साळुंके, खजिनदार सागर नरेकर, सदस्य गिरीश त्रिवेदी, रविंद्र थोरात, महेश मोरे, दर्शन सोनावणे त्याचबरोबर एबीसीचे पत्रकार अजय जोशी, एकमत न्यूजचे सिद्धेश आदी उपस्थित होते.

04/06/2025

मग तुम्ही पण येतात ना शिवराज्याभिषेक सोहळ्याची गाथा ऐकायला?
प्रेस क्लब ऑफ बदलापूर आणि संवेग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष व्याख्यान आणि शिवकालीन पत्रांचे प्रदर्शन' आयोजित करण्यात आले आहे.

विषय:- शिवराज्याभिषेकाची गाथा
- उलगडणार १३ दिवसांचा शिवराज्याभिषेक सोहळा

व्याख्याते:- कौस्तुभ कस्तुरे, इतिहास अभ्यासक

येत्या ६ जून २०२५ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता पाटील बॅंक्वेट, गणेश चौक, बदलापूर (प.) येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आपल्या सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.

प्रेस क्लब ऑफ बदलापूर आणि संवेग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष व्याख्यान आणि शिवका...
30/05/2025

प्रेस क्लब ऑफ बदलापूर आणि संवेग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष व्याख्यान आणि शिवकालीन पत्रांचे प्रदर्शन' आयोजित करण्यात आले आहे.
विषय:- शिवराज्याभिषेकाची गाथा
- उलगडणार १३ दिवसांचा शिवराज्याभिषेक सोहळा
व्याख्याते:- कौस्तुभ कस्तुरे, इतिहास अभ्यासक

येत्या ६ जून २०२५ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता पाटील बॅंक्वेट, गणेश चौक, बदलापूर (प.) येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आपल्या सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.

दत्त चौकातील वड कायम राहणारकुळगाव बदलापूर नगर परिषदेकडून शहरात सिग्नल यंत्रणा बसवली जाते आहे. त्यासाठी चौकांची स्वच्छता ...
23/05/2025

दत्त चौकातील वड कायम राहणार

कुळगाव बदलापूर नगर परिषदेकडून शहरात सिग्नल यंत्रणा बसवली जाते आहे. त्यासाठी चौकांची स्वच्छता आणि जागा उपलब्धत करण्यासाठी मोहिम सुरू आहे. या मोहिमेत बदलापूर पश्चिमेतील दत्त चौकात असलेल्या सुमारे १०० वर्षे जुन्या वडाच्या झाडालाही धक्का बसणार होता. हे झाडही हटवण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली होती. याबाबतची सूचना आणि हरकती मांडण्याची नोटीस कुळगाव बदलापूर नगर परिषदेने एका वृत्तपत्रात प्रसिद्ध केली. दत्त चौकातील वडाचे झाड ही या परिसराची ओळख आहे. अनेक पिढ्यांना या वडाने सावली दिली आहे. त्यामुळे या वडाच्या झाडाशी सर्वांचे भावनिक नाते जुळले आहे. विकासाच्या नावाखाली अनेकदा या वडाला पाडण्याचा, हटवण्याचा प्रयत्न झाला. मात्र स्थानिक बदलापूरकर, सुजाण पत्रकार आणि प्रेस क्लब ऑफ बदलापूरच्या वतीने कायमच याला विधोर झाला. आजही असाच प्रकार सुरू होता. मात्र प्रेस क्लब ऑफ बदलापूरच्या वतीने तातडीने या विषयाला हरकत घेण्यात आली. तसे निवेदन मुख्याधिकारी मारूत गायकवाड साहेबांना देण्यात आले. त्यांनीही या हरकतीला गांभीर्याने घेत दत्त चौकातील जुने वडाचे झाड न हटवण्याचा निर्णय घेतला. तशी माहिती त्यांनी प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या सदस्यांना फोनद्वारे दिली.

या झाडाच्या संगोपनासाठी प्रयत्न करू, त्यासाठी योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासनही यावेळी मारूती गायकवाड साहेबांनी दिले. तसेच रस्ता वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अन्य पर्यायांचा विचार करू असेही गायकवाड यांनी सांगितले. प्रेस क्लब ऑफ बदलापुरही पालिका प्रशासनाच्या विकास धोरणात त्यांच्या पाठीशी आहे. फक्त पालिकेने शहराची ओळख कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.

प्रेस क्लब ऑफ बदलापूर

आज जागतिक मुद्रण दिन!जर्मनीत जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला आणि एका नव्या क्रांतीने संपूर्ण जगाला आपल्या...
23/02/2025

आज जागतिक मुद्रण दिन!

जर्मनीत जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला आणि एका नव्या क्रांतीने संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले. या यंत्राचा शोध लागण्यापूर्वी ग्रंथ परंपरा अस्तित्वात होती. मात्र, या छपाई यंत्राच्या संरचेनत अनेक बदल झाले आणि वेगवेगळ्या आकारातलं छापिल साहित्य उपलब्ध होऊ लागलं. यातीलच एक म्हणजे वृत्तपत्र. आज आघाडीची माध्यमे म्हणून या वृत्तपत्रांकडे पाहिलं जातं. वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करणाऱ्या आमच्या सारख्या पत्रकार मंडळींसाठी आजच्या जागतिक मुद्रण दिनाचं विशेष महत्त्व आहे. तसेच छपाई यंत्राचा शोध लावणाऱ्या जोहान्स गुटेनबर्ग यांचं स्मरण देखील आज आपण करणं महत्त्वाचं आहे.

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती. त्यांनी मराठी पत्रकारितेचा पाया भक्कम...
20/02/2025

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती. त्यांनी मराठी पत्रकारितेचा पाया भक्कम करण्यासाठी मोलाचे कार्य केले. त्यांच्या जयंतीनिमित्त 'प्रेस क्लब ऑफ बदलापूर'तर्फे त्रिवार अभिवादन!

प्रेस क्लब ऑफ बदलापूरतर्फे आयोजित मूकनायक दिन-२०२५ ला लाभला भरघोस प्रतिसादप्रेस क्लब ऑफ बदलापूरतर्फे मूकनायक दिन-२०२५ या...
03/02/2025

प्रेस क्लब ऑफ बदलापूरतर्फे आयोजित मूकनायक दिन-२०२५ ला लाभला भरघोस प्रतिसाद

प्रेस क्लब ऑफ बदलापूरतर्फे मूकनायक दिन-२०२५ या कार्यक्रमाचे आयोजन आज आदर्श कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय इथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तब्बल ४०० हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांसह बदलापूर - अंबरनाथ शहरातील अनेक मान्यवर तसेच तालुक्यातील बहुतांश पत्रकार मित्र या कार्यक्रमाला उपस्थित होते. माध्यम तज्ज्ञ कौस्तुभ शेज्वलकर यांचे फेक न्यूज आणि फॅक्ट चेक या विषयावरील व्याख्यान तसेच, अ‍ॅड. सुधा जोशी, अ‍ॅड. आकाश वाघोले यांचे महिलांचे कायदे, अधिकार आणि कर्तव्ये या विषयांवरचे मार्गदर्शन सर्वोत्तम ठरले. कार्यक्रमाला व्यासपीठावर अंबरनाथ तालुक्याचे तहसिलदार अमित पुरी, आदर्श विद्या प्रसारक संस्थेचे राम पातकर, लोकप्रतिनिधी संभाजी शिंदे, आदर्श महाविद्यालयाचे प्रा. मंदार ठाकूर, प्रा. संदिप भेले, प्रेस क्लब ऑफ बदलापूरचे अध्यक्ष विजय पंचमुख, सचिव संजय साळुंके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार प्रशांत मोरे यांनी केले. तर, आभार प्रदर्शन सकाळच्या पत्रकार मोहिनी जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला ज्यांचे सहकार्य लाभले अशा प्रत्येकाचे आम्ही प्रेस क्लब ऑफ बदलापूरच्यावतीने आभार मानतो. या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे आपल्या सगळ्यांसाठी देत आहोत.

वृतपत्र विक्रेत्यांच्या पाठीशी प्रेस क्लब ऑफ बदलापूर तत्पर!कुळगाव - बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेचा फटका श...
02/02/2025

वृतपत्र विक्रेत्यांच्या पाठीशी प्रेस क्लब ऑफ बदलापूर तत्पर!

कुळगाव - बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेचा फटका शहरातील जुन्या जाणत्या वृत्तपत्र विक्रेत्यांनाही बसला. याची नोंद घेत प्रेस क्लब ऑफ बदलापूरच्या सदस्यांनी मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांची भेट घेत त्यांना या कारवाईची माहिती दिली. याची दखल घेत मारूती गायकवाड यांनीही इथून पुढे वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई करणार नसल्याचे आश्वासन दिले. प्रेस क्लब ऑफ बदलापूर सामान्य वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाठीशी कायम उभा राहील.

Address


421 503

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Press Club Of Badlapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share