Thalak Batmya ठळक बातम्या

Thalak Batmya ठळक बातम्या ठळक,सत्य अन बेधडक बातम्या

अनोखा उपक्रम
07/04/2025

अनोखा उपक्रम

इब्राहिम शेख यांची मागणी
06/04/2025

इब्राहिम शेख यांची मागणी

१० मे.......
06/04/2025

१० मे.......

 #रिक्षावाल्याचा_अनुभव_वाचल्याशिवाय_पुढे_जाणार_नाहीत...!पहाटे पहाटे ४.३० ला स्वारगेट ला उतरलो तर रिक्षा वाल्यांनी माझ्या...
17/01/2025

#रिक्षावाल्याचा_अनुभव_वाचल्याशिवाय_पुढे_जाणार_नाहीत...!

पहाटे पहाटे ४.३० ला स्वारगेट ला उतरलो तर रिक्षा वाल्यांनी माझ्यावर धाडटाकली, मला वाकड हिंजवडी येथे जायचे होते. एकेकाने बोली चालू केली. ७००, ८००, सर्वोच्च बोली १२०० पर्यंत पोहचली. शेवटी मीच काहीतरी कारण काढून बाजूला झालो. जरा एका बाजला येउन, येणाऱ्या मित्राची वाट बघू लागलो तेवढ्यात एकपन्नाशीचा, रिक्षावाला समोर येउन उभा राहिला..

काय साहेब कुठे जाणार त्याचा गोळी मारल्या सारखा प्रश्न. आता मी वैतागलो होतो. कारण हा आता १४०० असा भाव करणार असे वाटले. त्याचा पुन्हा प्रश्न. मी पुटपुटलो हिंजवडी. साहेब बसा सोडतो. पहिले किती घेणार ते सांग तुम्ही किती देणार त्याचा अजबप्रश्न. मी अंदाजे मागील अनुभवावरून माझे उत्तरफेकले. मी नेहमी, २५० ते ३०० देतो. साहेब बसा मी जास्त घेणार नाही. बघा हा नंतर. आयत्या वेळी सहाशे - सातशे सांगाल.
शेवटी काही इलाज नाही म्हणून मी बसलो..

रिक्षात बसल्यावर माझे, निरीक्षण चालू झाले, रिक्षावाला चार पावसाळे बघितलेला वाटत होता रिक्षात देवाचा फोटो लावतात तिथे स्वामी आणि साईबाबांचा फोटो होता. सोबत एका फटीत पाच सहा पोथ्या होत्या. साहेब गाणी लाऊ काय माझ्या कडे, आरत्या, हिंदी जुनी - नवी, कव्वाली, अभंग, मराठी गाणी सगळी आहेत. तुम्ही सांगाल ती लावतो. मी वाकून स्पीकर बघितला तर कुठे दिसला नाही. माझी शंका, बघून त्याने खुलासा केला साहेब माझ्या मोबाइलमध्ये आहेत. मोबाइल जुना नोकिया चा साधा पीस होता. मी म्हणालो राहू दे. सहज म्हणून त्यांना विचारल, काय किती वर्ष रिक्षा चालवताय..

झाली असतील दहा एक वर्ष मग पूर्वी काय करायचात माझा सलग दुसरा प्रश्न मग, मात्रतो बोलायला लागला साहेब पूर्वी माझ्या वडीलांचे ५ ट्रक होते. वडील गेल्यावर मी, व्यवसाय पुढे चालू केला पण पुढे दोन - तीन वर्षात पार्टनर लोकांनी फसवले. मला ३० लाखाचे कर्ज झाले. मग घरात होते नवते ते विकून कसे बसे कर्ज फेडत आणले आहे. सध्या पर्वती येथे भाड्याने राहतो. एकेकाळी खूप श्रीमंती बघितली आहे. इकडे भाड्याने राहायला आल्यावर मुले लहान होती. मग भाड्यावर रिक्षा चालवायला लागलो..

कसे बसे घर चालवले आता मुलगा हाताशी आला आहे. तो शिपाई म्हणून लागला आहे, मुलगी लास्ट इयरला आहे. माझी ३ वर्षापूर्वी मेजर हार्ट सर्जरी झाली परत ४ लाखाचे कर्ज झाले. त्याने हात दाखवला, जिथली नस काढून आता ह्र्य्दयात काम करत होती. कदाचित हाताचे कष्ट करण्याची सवय आता त्याच्या ह्रुदयाने स्वीकारली होत. परत ते फेडायचे आहे. मी मनातल्या मनात त्याच्या कर्जाची बेरीज करत होतो पण मला एक सांगा काका. माझ्या तोंडातून चटकन रिक्षवाला आता काका झाला होता. तुम्ही एवढे कमी पैसे कसे घेताय. बाकी लोक मला 1200 पर्यंत घेऊन गेलो होते..

साहेब, मला फुकटचा लूटलेला पैसा नको.माझे कर्ज सावकाश फेडीन, पण साई वरून बघत आहेत. त्यांना काय उत्तर देऊ कधी कधी लोक बिचारी कामाला आलेली असतात, एक - एक रुपया हिशोबाचा असतो आणि त्यातील पैसे ओरबाडून मला, श्रीमंत नाही व्हायचे. माझी मुलगी पण हाताशी येईल कधी कधी ती पण रिक्षा चालवते. सकाळचे LPG भरायचे काम तिंच करते. कारण महिलांची रांगवेगळी असते. त्याबद्दल मी तिला रोज ५० रुपये देतो. आपले मस्त चालले आहे काही टेन्शन नाही..

कशाला लुटालूट. त्याचा मला उलटा प्रश्न माझे लुटारू मन भानावर आलेले. मनातल्या मनात काकांना लाख वेळा सॉल्यूट केला. कुठे बाराशे पर्यंत बोली लावणारे नवीन पिढीतील, झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न बघणारे व्यावसाईक कुठे, ह्र्य्दय फाटून पण इमानदारी कायम राखणारा फकीर. माझा स्टॉप जवळ आला. काका नाव काय तुमचे अजय पुढचे आडनाव मी ऐकले नाही. कारण आडनावाला जातीचा दर्प येतो. तो मला येऊ द्यायचा नव्हता. मी फाकीराची मूर्ती डोळ्यात साठवली आणि स्वारगेट ते हिंजवडी वाकड २०.२ किमी चे ३०० रुपये देवून निरोप घेतला..

आजही अजय काका स्वारगेट ला पहाटे रिक्षा लावतात. त्यांचा. फोन नंबर. ९८९००९६५२२ पुण्यात स्वारगेट ला वेळी अवेळी उतरणार असाल तर आधी एक तास फोनकरा. फकीर उभा असेल तुमच्या सेवेसाठी. एक विनंती ते भाड्याचा विषय निघाला कि तुम्ही किती देणार असा प्रश्न काकां कडून येतो. त्यावेळी थोडे पैसे जास्त सांगा कारण काका तुम्ही सांगाल त्या भाड्यात तुमच्या इच्छित स्थळी पोहचवतात आणि अजून त्यांचे १ लाखाचे एक अॉपरेशन बाकी आहे.....
-अज्ञात लेखकास सादर समर्पित

आईपासून लेकरू हिरावून नेलं हो..तरी फरक यांना झाट नाही..माणूस सहज मारला जातो इथं..पण साली जात मारली जात नाही..!💔आंतरजातीय...
27/07/2024

आईपासून लेकरू हिरावून नेलं हो..
तरी फरक यांना झाट नाही..
माणूस सहज मारला जातो इथं..
पण साली जात मारली जात नाही..!

💔

आंतरजातीय विवाहामुळे जातीव्यवस्थेचा नाहक बळी , सैराट तर चित्रपट होता बाहेर असे कित्येक सैराट घडत आहेत.

आज दोघांची निर्दोष मुक्तता केली ✍🏻
27/03/2024

आज दोघांची निर्दोष मुक्तता केली ✍🏻

जागतिक अपंग दिनानिमित्त बार्शीच्या मुकबधिर विद्यालयात विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य वाटप.बार्शी:येथील दिलीप सोपल मूकबधि...
03/12/2023

जागतिक अपंग दिनानिमित्त बार्शीच्या मुकबधिर विद्यालयात विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य वाटप.

बार्शी:येथील दिलीप सोपल मूकबधिर निवासी विद्यालय येथे स्वप्नपूर्ती सकल दिव्यांग बहुउद्देशीय संस्था व लॉयन्स इंटरनॅशनल लायन तलकचंद शहा यांच्या विद्यमानाने येथील विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य व थंडीपासून बचावासाठी चादरी वाटप करण्यात आल्या.
यावेळी दिलीप सोपल मूकबधिर निवासी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रिजवाना मुल्ला-शेख यांनी संस्थेचे आभार मानले व अशा संस्था समाजात असल्यामुळे सामाजिक कार्याला गती मिळत असल्याचे मुख्याध्यापिका रिजवाना मुल्ला-शेख यांनी सांगितले.यावेळी स्वप्नपुर्ती संस्थेचे अध्यक्ष नागनाथ उंबरे,सहसचिव कविता करडे,सचिव विठ्ठल आगलावे,यांनी साहित्य वाटप केले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रिजवाना मुल्ला-शेख,विठ्ठल शिंदे,भंडारे सर,घळके सर,गुजरे मॅडम,श्रीमती काझी हे उपस्थित होते.

अ‍ॅड.दिनेश देशमुख यांची जिल्हा सहाय्यक सरकारी वकील या पदावर नियुक्ती.बार्शी:येथील नामवंत वकील अ‍ॅड.दिनेश देशमुख यांची जि...
20/11/2023

अ‍ॅड.दिनेश देशमुख यांची जिल्हा सहाय्यक सरकारी वकील या पदावर नियुक्ती.

बार्शी:येथील नामवंत वकील अ‍ॅड.दिनेश देशमुख यांची जिल्हा सहाय्यक सरकारी वकील या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांनी सहाय्यक सरकारी वकील म्हणून यापूर्वीही काम पाहिले आहे.त्यामुळे त्यांच्याकडे पूर्वीचा अनुभव आहे.त्यांच्या या नियुक्तीचे बार्शी शहरातील सामाजिक,राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनी यावेळी शुभेच्छा देऊन कौतुक केले.

भगवंत सेना दलामुळे मिळाले आणखीन एका युवकाला जीवदान.बार्शी : भगवंत सेना दलाच्या माध्यमातून बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये अ...
17/11/2023

भगवंत सेना दलामुळे मिळाले आणखीन एका युवकाला जीवदान.

बार्शी : भगवंत सेना दलाच्या माध्यमातून बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये अपघात ग्रस्त पिढीताना तात्काळ मदत करण्याचे सेवाकार्य गेल्या तीन महिन्यापासून अविरतपणे केले जात आहे.

आज सायंकाळी 5:30 च्या दरम्यान कुर्डूवाडी लातूर बायपास रोडवर अलीपुर गावाजवळ, एक युवक अपघात होऊन दुचाकीसह रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला होता. अपघात नेमका कसा झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सदरील घटनेची माहिती मिळताच, भगवंत सेना दलाच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेऊन 108 नंबर ला कॉल करून रुग्णवाहिका बोलावून घेऊन, सदरील जखमी युवकाला पुढील उपचारासाठी तात्काळ ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सदरील युवक हा लातूरचा असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याच्या नातेवाईकांना फोनवरती संपर्क करून सदरील घटनेची माहिती सांगण्यात आली आहे. जखमी युवकाची परिस्थिती व्यवस्थित असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालय बार्शी याठिकाणी उपचार चालू आहेत.

बार्शीत आज मनोज जरांगे पाटील.
06/10/2023

बार्शीत आज मनोज जरांगे पाटील.

Address

Barshi

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thalak Batmya ठळक बातम्या posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share