Barshi Vishesh

Barshi Vishesh संपादक : रमण कारंजकर
9119108800
डिजीटल वृत्तपत्र

जातो माघारी पंढरीनाथा... #बार्शी_विशेष  #बार्शी
26/07/2026

जातो माघारी पंढरीनाथा...
#बार्शी_विशेष #बार्शी

जय हरी विठ्ठल #बार्शी_विशेष  #बार्शी
25/07/2026

जय हरी विठ्ठल
#बार्शी_विशेष #बार्शी

१३.५६ टक्के दरवाढ करुन हंगामी १० टक्के दरवाढ मागे? 🤔तुम्हाला काय वाटते याबद्दल? #बार्शी_विशेष  #बार्शी  #मरापम
17/07/2026

१३.५६ टक्के दरवाढ करुन हंगामी १० टक्के दरवाढ मागे? 🤔
तुम्हाला काय वाटते याबद्दल?

#बार्शी_विशेष #बार्शी #मरापम

श्री विठ्ठलाचे चरणी ५६ लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या पादुका अर्पण बार्शी विशेष (पंढरपूर) : आषाढी यात्रा कालावधीत श्री ...
16/07/2026

श्री विठ्ठलाचे चरणी ५६ लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या पादुका अर्पण

बार्शी विशेष (पंढरपूर) : आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविक दाखल होत असून मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. या कालावधीत मंदिर समितीकडे रोख देणगीबरोबरच सोने, चांदी व इतर मौल्यवान वस्तूंच्या स्वरूपातही मोठ्या प्रमाणात दान प्राप्त होत आहे.

याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथील एका विठ्ठल भक्ताने आपले नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर श्री विठ्ठलाचे चरणी सोन्याच्या पादुका दान स्वरूपात अर्पण केल्या आहेत. या पादुकांचे वजन ४४६ ग्रॅम असून त्यांची अंदाजे किंमत ५६ लाख ५९ हजार रुपये आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सोने, चांदी वस्तू दान करण्यासाठी स्वतंत्र दान कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कक्षामध्ये दानस्वरूपात प्राप्त होणाऱ्या मौल्यवान वस्तूंची तपासणी, शुद्धता पडताळणी, वजन, नोंदणी व सुरक्षित स्वीकार करण्यासाठी दोन सराफ तसेच अनुभवी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ज्या भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे सोने, चांदीच्या मौल्यवान वस्तू दान करावयाच्या आहेत, त्यांनी मंदिर समितीच्या कार्यालयात संपर्क साधून अधिकृत पावतीसह दान करावे, असे आवाहन मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी केले आहे.

यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतलाताई नडगिरे, संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रविणकुमार घम तसेच लेखाधिकारी मुकेश अनेचा उपस्थित होते.

#बार्शी_विशेष #बार्शी #पंढरपूर #विठ्ठल #पांडुरंग

आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन सुरूबार्शी विशेष (पंढरपूर) : दरवर्षी आषाढी यात्रेदरम्यान भा...
16/07/2026

आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन सुरू

बार्शी विशेष (पंढरपूर) : दरवर्षी आषाढी यात्रेदरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन, यात्रा कालावधीत शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

यावर्षी दिनांक १६ जुलै रोजी शुभ मुहूर्तावर विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला आहे. श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड, तर श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२ तास १५ मिनिटे पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

श्रींचा पलंग काढल्यानंतर काकड आरती, पोशाख, धूपारती, शेजारती आदी राजोपचार तात्पुरते बंद राहतील. मात्र नित्यपूजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे नित्योपचार नियमितपणे सुरू राहतील. दिनांक ०३ ऑगस्ट (प्रक्षाळपूजा) पर्यंत भाविकांना २४ तास दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

या प्रसंगी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, अ‍ॅड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, प्रणिता भालके, अनिल अत्रे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रविणकुमार घम, लेखाधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख भिमाशंकर सारवाडकर तसेच पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.

आषाढी यात्रेदरम्यान भाविकांना जलद, सुलभ व सुरक्षित दर्शन मिळावे यासाठी मंदिर समितीने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. दर्शनरांगेत बॅरिकेटिंग व संरक्षक जाळी बसवून घुसखोरी रोखण्यात आली आहे.

व्हीआयपी दर्शन व टोकन दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली असून, भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा देखील बंद करण्यात आल्या आहे. दर्शनरांगेतील रहदारी सुरळीत राहण्यासाठी तात्पुरत्या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे.

तसेच अनुभवी पर्यवेक्षक, कमांडोज व माजी सैनिकांची सुरक्षा व्यवस्थेत नियुक्ती, अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत निगराणी, मंदिराचे व्हीआयपी प्रवेशद्वार बंद ठेवणे, सार्वजनिक सूचना प्रसारण प्रणाली, लाईव्ह दर्शन व्यवस्था आणि दर्शनरांगेत भक्तिगीतांचे प्रसारण अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

याशिवाय, श्रींच्या नित्योपचारापूर्वी दर्शनरांग योग्य पद्धतीने नियंत्रित करून दर्शन बंद राहण्याचा कालावधी कमीतकमी ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना शक्य तितक्या कमी वेळेत दर्शन मिळावे यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेतली जात असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

#बार्शी_विशेष #बार्शी #पंढरपूर #विठ्ठल #पांडुरंग

15/07/2026

आषाढी वारीत बार्शी तालुक्यातील पानगावच्या माऊलीने केले पेंटिंग

भारतीय जाहिरात आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकार झहीर मिर्झा यांच्या संकल्पनेत बार्शी तालुक्यातील पानगावच्या माऊलीने अभंग म्हणत थरथरत्या हाताने ब्रशने पेंटींग केले. सासवड मुक्कामीचे हे दृश्य..

#बार्शी_विशेष #बार्शी

09/07/2026

आगामी आषाढी वारी व सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील ५३ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

#बार्शी_विशेष #बार्शी

हद्दपार तरुण बार्शी तालुका पोलिसांच्या ताब्यात  #बार्शी_विशेष  #बार्शी
08/07/2026

हद्दपार तरुण बार्शी तालुका पोलिसांच्या ताब्यात

#बार्शी_विशेष #बार्शी

हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करुन बार्शी तालुका हद्दीत वावरणाऱ्या एका तरुणास बार्शी तालुका पोलिसांनी ताब्यात घेतल....

Address

Barshi
413401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Barshi Vishesh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Barshi Vishesh:

Shortcuts

Share