
31/08/2025
#आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांना बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचा ठाम पाठींबा
मुंबई │ आझाद मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनावेळी बार्शीचे आमदार दिलीप सोपल, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व आमदार कैलास पाटील यांनी मनोज यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. आंदोलनकर्त्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर या तिघा मान्यवरांनी मनोज जरांगे पाटील यांना ठाम पाठिंबा दर्शवला.
या वेळी नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या धैर्याचे कौतुक करत आंदोलनामागील मागण्यांना न्याय मिळावा यासाठी आपला सकारात्मक पाठिंबा राहील, असे स्पष्ट केले. तसेच आंदोलनकर्त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
आझाद मैदानावरील या भेटीमुळे आंदोलनकर्त्यांचा उत्साह वाढला असून पुढील काळात शासनाने मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.