Barshi Samachar

Barshi Samachar बार्शीकरांच्या हक्काचं चॅनल

अपघातग्रस्तांसाठी मोफत ॲम्बुलन्स सेवा – वर्षभर अविरत सेवा बार्शी बायपास रोडवर .बार्शी | प्रतिनिधीवारंवार होणाऱ्या अपघाता...
08/07/2025

अपघातग्रस्तांसाठी मोफत ॲम्बुलन्स सेवा – वर्षभर अविरत सेवा बार्शी बायपास रोडवर .

बार्शी | प्रतिनिधी
वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे अनेक निरपराधांचे जीव जात असून, वेळेवर मदत न मिळाल्याने गंभीर जखमींना उपचार मिळण्यात अडथळा येत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्री क्षेत्र नाणीजधाम तर्फे विनामूल्य ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे.

ही सेवा बार्शी बायपास रोडवर वर्षभर अविरत उपलब्ध असून, रस्त्यावरील अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

संस्थानच्या सेवाभावी दृष्टिकोनातून आणि समाजातील रुग्णसेवेसाठीची बांधिलकी लक्षात घेता ही सुविधा राबवली जात आहे.

आपत्कालीन स्थितीत संपर्कासाठी:

(संपर्क क्रमांक / 8888263030 , 8788676696 )

भीषण अपघात: बार्शी-कुर्डुवाडी रोडवर बसखाली आली दुचाकी; १३ वर्षीय मुलीचा मृत्यूबार्शी | प्रतिनिधीबार्शी-कुर्डुवाडी रोडवरी...
06/07/2025

भीषण अपघात: बार्शी-कुर्डुवाडी रोडवर बसखाली आली दुचाकी; १३ वर्षीय मुलीचा मृत्यू

बार्शी | प्रतिनिधी
बार्शी-कुर्डुवाडी रोडवरील बायपास चौकात आज सकाळीं एक भीषण अपघात झाला. एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीवरील १३ वर्षीय लहान मुलगी (श्रावणी उबाळे ) जागीच ठार झाली, व गाडीवरील दोन तरुण रणजित उबाळे, संदीप उबाळे जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी जगदाळे मामा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे

दुचाकीचा क्रमांक MH45A P1891 असून ती थेट बसखाली गेली.मुलीचे आडनाव उबाळे असून ती चिचगाव गावची रहिवासी होती.या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली

घटनेनंतर लोकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.
जखमी अवस्थेत मुलीला रुग्णालयात नेले गेले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

25/06/2025

#बार्शी शहरातील पद्म कृष्ण मंगल कार्यालय जवळ #भाड्याने देणे आहे..!
सर्व सोयी-सुविधांसह सुसज्ज घर भाड्याने मिळणार..!
• CCTV
• पाण्याची सोय
• मोठी पार्किंग

संपर्क : ९८५०८५२५०८

वैराग पोलिसांची धडक कारवाई: कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या सहा गोवंशीय जनावरांची सुटकाबार्शी | १८ जून २०२५वैराग पोलिसांनी बुधव...
19/06/2025

वैराग पोलिसांची धडक कारवाई: कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या सहा गोवंशीय जनावरांची सुटका

बार्शी | १८ जून २०२५
वैराग पोलिसांनी बुधवारी दुपारी एका गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या जनावरे घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाला अडवले. या कारवाईत सहा गोवंशीय जनावरांची निर्दय वाहतूक उघडकीस आली असून, दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
दुपारी साडेतीनच्या सुमारास वैरागच्या दिशेने जाणाऱ्या MH 12 PQ 7573 क्रमांकाच्या अशोक लेलँड पिकअपबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीवरून सापळा रचून पोलिसांनी वाहन अडवले. चौकशीदरम्यान पिकअपमधील दोघांनी आपली नावे सोफियान बाबू कुरेशी (वय २५) आणि निहाल रमजान तांबोळी (वय २१), दोघेही रा. श्रीराम चौक, इंदापूर, पुणे अशी दिली.

निर्दयतेचे चित्र
पिकअपची तपासणी केली असता त्यात सहा गोवंशीय जनावरे अत्यंत अमानुषपणे कोंबून ठेवलेली आढळली. जनावरांसाठी ना पाण्याची, ना चाऱ्याची, ना औषधोपचाराची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. विशेषतः एका गाईचा पाय मोडलेला असल्याचे निदर्शनास आले.

कायदेशीर कारवाई
या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांचे छळ प्रतिबंधक कायदा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन व जनावरे पोलिसांनी जप्त केली असून, पुढील तपास वैराग पोलिस स्टेशनद्वारे सुरू आहे.

बार्शी–परंडा  #ड्रग्स रॅकेट प्रकरणात बार्शी  #पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून  #गौरवपत्र प्रदा...
18/06/2025

बार्शी–परंडा #ड्रग्स रॅकेट प्रकरणात बार्शी #पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून #गौरवपत्र प्रदान

बार्शी (दि. १७ जून २०२५):
बार्शी शहर पोलिसांनी अमली पदार्थ विक्रीच्या रॅकेटवर केलेल्या कारवाईचा मोठा गवगवा आता पोलीस खात्याच्या वरिष्ठ पातळीवरही पोहोचला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बार्शी शहर पोलिसांना ‘गौरवपत्र’ देऊन सन्मानित केलं आहे.

१७ एप्रिल रोजी एका गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीलायक माहितीनंतर पोलीस निरीक्षक श्री. बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं. या पथकाने परांडा रोडवरील पेट्रोलपंपाजवळ कुशल नियोजनातून सापळा रचत तिघांना अटक केली. या आरोपींकडून २०.०४ ग्रॅम एम.डी. (मॅफेड्रॉन), १ गावठी पिस्तूल, ३ जिवंत काडतुसे, मोबाईल्स, वजन काटा, रोख रक्कम व टोयोटा कार असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तपासाचा पुढचा टप्पा हा अधिक गुंतागुंतीचा होता. अटक आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाद्वारे या रॅकेटमधील एकूण १३ आरोपींचा शोध घेण्यात आला असून त्यापैकी १० जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. आतापर्यंत एकूण १८ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

या प्रकरणात NDPS Act कलम 8(क), 22(b), 29, भा.दं.वि. कलम 120(B) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अंतर्गत आरोप सिध्द करत बार्शी पोलिसांनी दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले आहे.

या कठोर तपासकार्यात पुरावे संकलन, फॉरेन्सिक साक्ष्य, आर्थिक व्यवहारांचे विश्लेषण आणि संपूर्ण पथकातील समन्वय यांचा मोलाचा वाटा होता. ही कारवाई केवळ एक रॅकेट उघडकीस आणणारी नसून, ती पोलीस दलातील दक्षता, तांत्रिक कौशल्य आणि संघटित कार्यक्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे.

कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या तपासाची दखल घेत बार्शी शहर पोलीस ठाण्यास ‘प्रशस्ती पत्रक’ बहाल करून त्यांच्या कामगिरीचं विशेष कौतुक केलं आहे.

 #गुदमरलेल्या न्यायव्यवस्थेला मिळाला  #मोकळा श्वास! #बार्शी समाचार बातमीचा जबरदस्त  #इम्पॅक्ट!बार्शी समाचार ने ही काल दि...
17/06/2025

#गुदमरलेल्या न्यायव्यवस्थेला मिळाला #मोकळा श्वास!
#बार्शी समाचार बातमीचा जबरदस्त #इम्पॅक्ट!
बार्शी समाचार ने ही काल दिलेल्या बातमीचा इम्पॅक्ट
शासन व प्रशासन यांनी वेळेत आपली जबाबदारी ओळखून वेळेत कचऱ्याचे वर्गीकरण (ओला, सुका, प्लास्टिक) करून शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे काम असून बार्शी नगर पालिका यांनी केले आहे तरी या ठिकाणी कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी एक कचराकुंडी बसवावी अशी मागणीही केली जात आहे .

16/06/2025

बार्शी न्यायालय व तहसील कार्यालय परिसरात कचऱ्याचे साम्राज्य — वकिलांचे आरोग्य धोक्यात

बार्शी समाचार (प्रतिनिधी) – बार्शी न्यायालय व तहसील कार्यालय परिसरात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी स्वच्छतेच्या बाबतीत बार्शी नगरपरिषदेचे अपयश पुन्हा एकदा समोर आले आहे. न्यायमंदिर व तहसीलदार निवासजवळील जागेत दिवसेंदिवस कचऱ्याचे ढीग वाढत असून, त्यातून दुर्गंधी आणि रोगजंतूंचा प्रसार होत आहे.

अशा परिस्थितीत रोज ये-जा करणाऱ्या वकिलांचे, कर्मचाऱ्यांचे आणि पक्षकारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. न्यायसंस्थेसारख्या पवित्र ठिकाणी अस्वच्छतेचे हे दृश्य दुर्दैवी आहे.

स्वच्छता नियम हवेतच
शहरात कचरा तीन प्रकारात (ओला, सुका, प्लास्टिक) विभागून शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावण्याचे नियम असूनही, प्रत्यक्षात बार्शी नगरपरिषदेचे यंत्रणा अपयशी ठरत आहे. नियमांचे पालन तर दूरच, कचरा उचलण्याची नियमित व्यवस्था देखील येथे नाही.

प्रशासनाचे दुर्लक्ष
शहरातील सर्वसामान्य नागरीकांसह न्यायालयीन कामकाज करणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. तरीही बार्शी नगरपालिका यंत्रणा मौन बाळगून आहे. अशा अपयशी कारभारामुळे प्रशासनावर जनतेचा विश्वास डळमळीत होतोय.

वकिलांची तक्रार:
"दररोज कोर्टात येणाऱ्या नागरिकांसह आम्हालाही या घाणीकडे दुर्लक्ष करता येत नाही. आम्ही कायद्यासाठी लढतो, पण इथे आमचं स्वतःचं आरोग्य धोक्यात आहे," असे मत एका ज्येष्ठ वकिलाने व्यक्त केले.

वकिलांचा संताप
"दररोज दुर्गंधी सहन करत काम करावं लागतं. आमचं आरोग्य धोक्यात आहे, आणि प्रशासन काहीच करत नाही," अशी प्रतिक्रिया बार्शीतील अनेक वकिलांनी दिली.

शासन व प्रशासन यांची जबाबदारी:
कचऱ्याचे वर्गीकरण (ओला, सुका, प्लास्टिक) करून शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे नियम असूनही, ते नियम केवळ कागदावरच राहिले आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

नागरिकांचा सवाल — "कधी सुधारणार प्रशासन?"
या पार्श्वभूमीवर नागरिक आणि वकिलांकडून एकच सवाल उपस्थित केला जातोय — "बार्शी नगरपरिषद केव्हा जागे होणार?"
#बार्शी #बार्शी नगरपरिषद

कुसळंब जवळ दुचाकी आणि टिप्परच्या भीषण अपघातामध्ये एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी बार्शी लातूर रोड वरील कुसळंब जवळील...
16/06/2025

कुसळंब जवळ दुचाकी आणि टिप्परच्या भीषण अपघातामध्ये एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी

बार्शी लातूर रोड वरील कुसळंब जवळील टोलनाक्यावर दुचाकी आणि टिप्पर चा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दुचाकी वरील एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीरित्या जखमी झाला आहे. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.

सदरील अपघाताची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे राहुल बोंदर, रुपेश शेलार यांच्यासह सर्व टीम घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास करत आहेत.

 #महेश यादव यांच्या मोबाईल  #चोरीचा गुन्हा उघडकीस, बार्शी शहर  #पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी – दोन आरोपी 1.48 लाखांच्या म...
13/06/2025

#महेश यादव यांच्या मोबाईल #चोरीचा गुन्हा उघडकीस, बार्शी शहर #पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी – दोन आरोपी 1.48 लाखांच्या मुददेमालासह अटकेत

जना बैंकेकडून वैयक्तिक मालमत्ता जप्तीची कारवाई.बार्शी : जना स्मॉल फायनान्स बँक मार्फत देण्यात येणाऱ्या मोर्गज लोन थकीत क...
09/06/2025

जना बैंकेकडून वैयक्तिक मालमत्ता जप्तीची कारवाई.

बार्शी : जना स्मॉल फायनान्स बँक मार्फत देण्यात येणाऱ्या मोर्गज लोन थकीत कर्जदारावर बैंकने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यात अधिक माहिती अशी
की, जना स्मॉल फायनान्स बैंक एक शेड्युल कमर्शियल बैंक असून या बैंकमार्फत अनेक वर्षा पासून ग्रुप लोन, गोल्ड लोन, प्रॉपर्टी तारण लोन, होम लोन दिले जाते. जना Bank च्या भारतात अनेक शाखाही आहेत.

जना स्मॉल फायनान्स बँकेच्या MHL डी अंतर्गत कोर्टाकडून आलेल्या नोटिसानुसार बँकेने जे कस्टमर लोन फेडण्यात अकार्यक्ष म थकीत कर्जदार आहेत त्यावर बँकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे

अधिक माहिती अशी की या महिन्यात एकूण पाच थकीत कर्जदार आहोत कारवाई करण्यात येणार असून त्यातील सद्यस्थितीत परंडा तालुक्यातील दोन ठिकाणी थकीत कर्जदारांच्या घरावर जप्ती आणण्यात आली आहे.

कारवाईदरम्यान बँकेकडून कोर्ट कमिशनर अॅड. स्मिता सीताफळे हेड कॉन्स्टेबल शेख, हेड कॉन्स्टेबल शेळके जना बैंक कलेक्शन हेड गंगाधर मोरे बार्शी शाखेचे उपशाखा अधिकारी वैभव वळसंगे व इतर टीम उपस्थित होते.

याबाबत जना बँकेचे उपशाखा अधिकारी वैभव वळसंगे बोलताना म्हणाले, थकीत (ड्यूज) कर्जाच्या वसुलीप्रकरणी ही कारवाई होती. त्या अनुषंगाने ही कारवाई केलेली आहे. वेळेत हप्ता भरून बँकेस सहकार्य करावे. अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल.

बार्शीतील 13 वर्षीय मुलगा बेपत्ता, आढळल्यास तात्काळ संपर्क साधावा!हर्ष योगेश शर्मा वय 13 वर्षे, राहणार मल्लिकार्जुन मंदि...
09/06/2025

बार्शीतील 13 वर्षीय मुलगा बेपत्ता, आढळल्यास तात्काळ संपर्क साधावा!

हर्ष योगेश शर्मा वय 13 वर्षे, राहणार मल्लिकार्जुन मंदिराजवळ, देशमुख प्लॉट, बार्शी येथून सदरचा मुलगा सकाळी 06.30 वाजता सायकल घेऊन घराच्या बाहेर खेळतो असे म्हणून गेलेला आहे. तो अद्याप पर्यंत घरी आला नाही.

तरी मिळून आल्यास बार्शी शहर पोलीस ठाणे 02184 - 223333 किंवा त्याचे पालक योगेश शर्मा यांच्याशी खालील मोबाईल नंबर वर 9970017400 संपर्क साधण्याचे आवाहन बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

📌 बार्शीत व्हाईस ऑफ मीडियाचा उपक्रम...👇राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांची माहितीपत्रकार पाल्यांचा सन्मान, शालेय साहित्य...
03/06/2025

📌 बार्शीत व्हाईस ऑफ मीडियाचा उपक्रम...👇
राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांची माहिती

पत्रकार पाल्यांचा सन्मान, शालेय साहित्यवाटप अन स्नेहमेळावा

बार्शी, प्रतिनिधी : बार्शी शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि पत्रकारांच्या परिवाराचा स्नेहमेळावा शनिवारी (दि. ७) होणार असल्याची माहिती व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांनी दिली. राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राज्याध्यक्ष अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्यउपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांच्या पुढाकाराने सुमारे १०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले जाणार आहे.

रेल्वे स्टेशन रोडवरील माऊली लॉन्स येथे शनिवारी (ता. ७) जून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी सुयश विद्यालयाचे संस्थापक शिवदास नलावडे, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अरुण बारबोले, बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका वर्षा ठोंबरे, श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे पी. टी. पाटील, व्हाईस ऑफ मीडियाचे शिक्षण विंग प्रमुख चेतन कात्रे आदी उपस्थित राहणार आहेत.

दहावी व बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेले पत्रकार पाल्य हर्षद आनंद शेटे (दहावी ९२ टक्के), कु. तन्वी उमेश काळे (दहावी ९० टक्के) कु. सुरभी चंद्रकांत करडे,(दहावी ८४ टक्के), कु. साक्षी प्रदीप माळी (बारावी ७८ टक्के) यांचा आणि कु. साक्षी प्रशांत काळे (फिजिओथेरपिस्ट) हिने वैद्यकीय परीक्षेत उज्ज्वल यश मिळविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार केला जाणार आहे.

व्हाईस ऑफ मीडिया संघटनेतील सदस्यांच्या पाल्यांनाच नव्हे तर शहर व तालुक्यातील इतर पत्रकारांच्या मुलांना देखील सुमारे एक लाख रुपयाचे शालेय साहित्य वाटप केले जाणार आहे. पत्रकार नेहमीच धावपळीच्या वातावरणात वावरत असतात. त्यामुळे पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबियांचाही स्नेहभोजनासह मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अजित कुंकूलोळ यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हर्षद लोहार, शाम थोरात, अस्लम काजी, अमोल आसबे प्रयत्न करीत आहेत.

Address

Barsi

Telephone

+919545152888

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Barshi Samachar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share