
11/10/2025
#विद्यार्थीनीला घेऊन #प्राध्यापक झाला #सैराट
ती अल्पवयीन 17 वर्षाची तरूणी.
अजिंठा येथील महाविद्यालयात 12 वीच्या वर्गात शिकत हाेती.
त्याच महाविद्यालयात अध्यापनाचे काम करणारा 40 वर्षे वयाचा प्राध्यापक किशाेर तायडे.
छत्रपती #संभाजीनगर जिल्ह्यातील #सिल्लाेड तालुक्यातील एका गावातील ही तरूणी.
महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच या प्राध्यापकाच्या संपर्कात आली.
किशाेर तायडे याने तिला लग्नाचे आमिष दाखविले, तिला नाेकरी लावून देताे, असे सांगितले.
यानंतर मग या दाेघांमध्ये सुरू झाले प्रेमाचे चाळे.
याची कुणकुण अर्थातच महाविद्यालयातील काही प्राध्यापकांना लागली.
पण तरीही याचे प्रेमप्रकरण सुरूच राहिले.
चार दिवसापूर्वीच ही #तरूणी आपल्या घरातून 12 वीचा फॉर्म भरण्यासाठी म्हणून महाविद्यालयात आली. पण रात्री उशीरापर्यंत ती पुन्हा घरी पाेहाेचलीच नाही.
आई-वडीलांनी सगळीकडे शाेध घेतला. नातेवाईकांना फोन लावले,
तिच्या मैत्रिणींना फोन केले, पण कुठेच तिचा पत्ता नव्हता.
शेवटी तिच्या एका मैत्रिणीकडूनच तायडे आणि तिच्यातील सुरू
असलेल्या प्रेमप्रकरणाची माहिती पालकांना मिळाली.
पालकांनी तायडेकडे संपर्क करण्यासाठी त्याचे घर गाठले.
पण ताेही सकाळपासून घरी आलेलाच नव्हता.
त्यामुळे शेवटी त्या तरूणीच्या पालकांनी थेट सिल्लाेड पाेलीस स्टेशन गाठले.
पाेलीसांनी तपास केल्यानंतर ताे प्राध्यापक आणि ती तरूणी दाेघेही पळून गेले
असल्याची माहिती मिळाली.
तायडेला संपर्क करण्याचा प्रयत्न पाेलीसांनी केला, त्याच्या माेबाईलवर त्यांनी त्याला काॅल केला.
यावेळी तायडे याच्याशी त्या तरूणीची आईही बाेलली. यानंतर पाेलीसांनीही त्याला धमकावले.
तायडेने चाैथ्या दिवशी #जळगावरून त्या तरूणीला बसमध्ये बसवून गावी परत पाठविले. पण ताे मात्र फरारच आहे.
गुरू शिष्याच्या नात्यालाच काळीमा ासणाèया या घटनेची संभाजीनगर जिल्ह्यात सध्या जाेरदार चर्चा सुरू आहे.
महाविद्यालय आता त्या शिक्षकावर काय कारवाई करणार, याकडेही सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही या निमित्ताने निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे या किशाेर तायडेने यापूर्वी आणखी तीन मुलींना असेच जाळ्यात ओढले हाेते.
त्यांना घेऊन ताे पळूनही गेला हाेता. पण भीतीपाेटी काेणीच पालक समाेर आले नाहीत, तायडेच्याच हातापायापडून त्यांनी
त्याच्या तावडीतून मुलींची सुटका केली हाेती. यामुळेच त्याचे धाडस वाढत गेले हाेते.