09/08/2025
प्रत्येक गोष्टीचा 'इव्हेंट' करण्यालाही महत्त्व आले, तेही ठीक. पण मला सांगा, प्रत्येक छोट्या-मोठ्या समारंभात मैद्याचा साखर आणि क्रीमने ठासून भरलेल्या (आणि आपले हात चिकट करणाऱ्या) कोणतेही पोषण न देणाऱ्या केकची खरेच गरज असते का हो? बरं... समजा, केक हवाच तर आपण तुलनेने पौष्टिक पदार्थांची निवड करायला काय हरकत आहे? रव्याचा केक, ढोकळ्याचा केक (आमच्या ओळखीतील एका डॉक्टर दाम्पत्याकडे नेहमी असे वैविध्य असलेले पौष्टिक पदार्थ केले जातात.) किंवा तत्सम अनेक छान पर्याय असू शकतात. मैदा, मीठ, तेल आणि साखर या चौकडीला थोडे जपून वापरूनसुद्धा चविष्ट पदार्थ होऊ शकतातच. पालकांनी लहान मुलांच्या आहाराबाबत, आपण त्यांना काय खाऊ घालतो, त्यांच्यासमोर आपण काय खातो, याबाबत जागरूक राहिले पाहिजे.
आंधळे प्रेम, नको ते लाड, आधुनिकतेचे फॅड यामुळे मुलांचे भविष्य आपण बिघडवत नाही ना हे डोळसपणे पाहायला हवे. 'चाइल्ड ओबेसिटी' अर्थात मुलांचा लठ्ठपणा शहरातच नव्हे, तर अगदी महाराष्ट्रातल्या दुर्गम खेड्यातही दिसून येतोय हे धोक्याचा इशारा देणारे आहे.
सणासुदीच्या दिवसांत गोड खाण्याला पूर येतो. आपले पारंपरिक पदार्थ छानच आहेत.
अलीकडे उत्सव फारच उत्साहात साजरे केले जातात. सेलिब्रेशन, पार्टी या गोष्टींना सर्व
दिवसांत एकेक दिवशी १०-१५ गणपतींच्या दर्शनाला जाऊन कुठे पेढ़ा, बर्फी तसेच विकतचे पेढे, मोदक, लाडू असे काही खाल्ले तर किती साखर, किती स्निग्ध पदार्थ एकाच दिवसात पोटात जातील? आता मात्र बऱ्याच ठिकाणी सुका मेवा, सुंठवडा, फळे असा प्रसाद आवर्जून दिला जातो. हे स्वागतार्ह आहे.
अलीकडे मी एका अत्यंत नामवंत उच्चभ्रु संस्थेच्या बैठकीला गेले होते. मात्र नेहमीपेक्षा या वेळच्या नाश्ता आणि जेवणाच्या मेनुमध्ये लक्षणीय फरक जाणवला. सर्व पदार्थ कमी चरबीयुक्त होते. नाश्ता, जेवताना एकही तळलेला पदार्थ नव्हता. तरी सगळे जेवण रुचकर होते, गोड पदार्थ म्हणून चक्क केळे होते. मी आयोजकांकडे याबाबत आश्चर्य व्यक्त करून त्यांचे कौतुकही केले. त्यांनी हे सर्व बदल जाणीवपूर्वक ठेवले होते. सांगायचा मुद्दा हा की, आपण मनावर घेतले तर बदल घडवून आणू शकतो.
आपल्या पारंपरिक आहारावर भर दिला, थोडा 'आउट ऑफ बॉक्स' विचार केला, लोक काय म्हणतील वगैरे कल्पना दूर ठेवल्या आणि असे छोटे छोटे बदल करत राहिलो तर कणभर प्रयत्न आणि मणभर यश नक्की मिळेल. समाजाच्या एकंदर आरोग्याविषयीच्या दृष्टिकोनात बदल होऊ शकतो. समोसे काय, वडे किंवा वडा-पाव काय, पिझ्झा काय किंवा अन्य पदार्थ काय, वाईट कुणीच नाही, पण तारतम्याने केलेली निवड महत्त्वाची !
ऋतुमानानुसार अनुरूप आहेत पण तेही प्रमाणातच खाल्ले पाहिजेत.