17/09/2025
आबा स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून उद्यापासून अशोक नगरचा जलतरण तलाव जनतेसाठी उपलब्ध आमदार राजू शेठ यांच्या हस्ते जलतरणाचे उद्घाटन.
बुधवार दिनांक 17 रोजी दुपारी साडे बारा वाजता आमदार राजू शेठ यांचे अशोक नगर जलतरण तलावा वरती आगमन झाले त्या वेळेला मनपा आयुक्त शुभा बी, आबा क्लबचे अध्यक्ष शितल हुलभते, सेक्रेटरी शुभांगी मंगळूरकर, जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांनी स्वागत केले . यानंतर आमदार राजू शेठ यांच्या हस्ते फीत कापून जलतरण तलावाचे उद्घाटन केले.
यानंतर व्यासपीठावरती उपस्थित आमदार राजू सेठ, बेळगावचे महापौर मंगेश पवार, उपमहापौर सौ वाणी जोशी, मनपा आयुक्त शुभा बी. नगरसेवक रियाज अहमद, अमन सेठ, आबा क्लबचे अध्यक्ष शितल हुलबत्ते, सेक्रेटरी शुभांगी मंगळूरकर नरेंद्र पाटील यांना जलतरण प्रशिक्षक श्री विश्वास पवार, सौ ज्योती पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व जलतरण तलावाची पूजा करण्यात आली यावेळी आमदार राजू शेठ यांनी आपल्याला आज खूप आनंद होत असल्याचे सांगून हा महानगरपालिकेचा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक साईझ जलतरण तलाव आबा क्लबच्या माध्यमातून बेळगावच्या जनतेसाठी उपलब्ध करून दिल्याचे जाहीर केले, तसेच या पूल वरती जलतरणाचे प्रशिक्षण देण्याची सुविधा असल्याचे सांगितले. या जलतरण प्रशिक्षणाचा उपयोग घेऊन येणाऱ्या काळामध्ये आपल्या या ऑलम्पिक साईझच्या जलतरण तलावातून अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय व ऑलम्पिक जलतरणपटू निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला आणि याचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन केले. यानंतर महापौर मंगेश पवार यांनी देखील बेळगावकरांनी यापुलचा सदुपयोग करून घ्यावा त्याचबरोबर आबा क्लब च्या सर्वांचे अभिनंदन केले. उपमहापौर वाणी जोशी तसेच आयुक्त शुभा बी याने देखील सर्वांना शुभेच्छा दिल्या व हा पूल जनतेसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला .
यानंतर बेळगावचे नामवंत जलतरणपटू स्मरण मंगळूरकर, वेदांत पाटील, मयुरेश जाधव, निधी मुचंडी, श्रेष्ठ रोटी, स्वयं कारेकर यांना पाण्यात उडी मारण्यासाठी आमदार राजू शेठ, मनपा आयुक्त शुभा बी तसेच आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कुमारी ऋतुजा पवार यांनी झेंडा दाखविला. या उद्घाटन सोहळ्याला कर्नाटक राज्य अथलेटिक असोसिएशनचे सेक्रेटरी श्री अशोक शिंत्रे, नगरसेवक राजशेखर ढोणी नगरसेवक श्रेयस नाकाडी, विनायक ग्रामोपाध्ये, रामनाथ नायक,प्रसाद कुलकर्णी, नागराज पाटील मोहन कारेकर यांनी देखील सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आबा क्लबचे पदाधिकारी श्री सुनील हनमण्णावर, मारुती घाडी, अमर होणगेकर, विजया शिरसाट, श्री रोटी, रणजीत पाटील, संदीप मोहिते, शिवराज मोहिते, कल्लाप्पा पाटील, विशाल वेसणे, राजश्री पाटील, भरत पाटील,वैभव खानोलकर राहुल काकतकर, हरीश मुचंडी,अभिषेक केस्टीकर, अभेद बर्डे, सुधीर धामणकर ,विजय बोगन, प्रांजल सुलधाड विजय नाईक निखिल भेकणे पुंडलिक कांबळे अमित कुडची उपस्थित होते.