29/11/2025
समृद्धी गुणवंत पाटीलचे तेजस्वी यश,K-SET परीक्षेत गोगटे कॉलेजची गुणवत्ता पुन्हा सिद्ध| Belgaum Live - बेळगाव लाईव्ह
बेळगाव लाईव्ह : गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सची विद्यार्थिनी समृद्धी गुणवंत पाटील हिने K-SET(कर्नाटक राज्य पात्रता परीक्षेत) वाणिज्य शाखेतून उल्लेखनीय यश मिळवत कॉलेजचे आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे.
समृद्धी ही गोगटे कॉलेजमधून एम.कॉम पदवी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी... तिच्या शैक्षणिक वाटचालीत सातत्याने चमकदार कामगिरी हा तिचा ठसा राहिला आहे. दहावी, बारावी, बी.कॉम आणि एम.कॉम— या सर्व परीक्षांत 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवत तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
समृद्धी ही मराठी ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील यांची कन्या आहे. अभ्यासाची आवड, सातत्य आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या जोरावर तिने के-SET सारखी स्पर्धापरीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे.
तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयीन वर्तुळात, साहित्यिक क्षेत्रात तसेच सामाजिक स्तरावरून भरभरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गोगटे कॉलेजच्या प्राध्यापकांनीही तिच्या परिश्रमांचे कौतुक करत भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.