
15/04/2024
सम्राटकार बबन कांबळे फॉउंडेशन आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर 133व्या जयंती निमित्त भीमजयंती पहाट कार्यक्रमाचे आयोजन कृपाल बबन कांबळे, विशाल वाघ, प्रदीप जाधव, अमित पावसकर यांच्यावतीने प्रथमच ठाण्यात करण्यात आले होते,
समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा ह्या वेळी सत्कार करण्यात आला.
सुप्रसिद्ध गायक श्री नंदेश विठ्ठल उमप,
शिक्षिका श्रीमती उषा मुकुंद केळकर,
डॉ अमोल गिते,संचालक -सिद्धिविनायक हॉस्पिटल
मान्यवराच्या हस्ते सन्मानचिन्ह शाल देऊन गौरवण्यात आले.
प्रमुख पाहुणे आमदार श्री संजयजी केळकर, ऍड निरंजन डावखरे -आमदार कोकण पदवीधर मतदार संघ,
श्री संजयजी वाघुले -अध्यक्ष ठाणे शहर भाजपा.माजी खासदार ड्रा संजीवजी नाईक व समाजातील प्रतिष्ठित मान्यवरानी उपस्थित राहून भीम गीताचा आनंद लुटला.