
06/09/2025
नवनीत कॉवत यांची पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करतानाच खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांना सर्वाधिकार दिले होते.तुमच्या कोणत्याच कारवाईत,कृतीत कोणी हस्तक्षेप करणार नाही असे सांगितले होते.त्यानुसार कॉवत यांनी जिल्हा पोलीस दलात फेरबदलासह अनेक निर्णय घेतले,आजघडीला त्यांना कोणीही शिफारस किंवा हस्तक्षेप करण्याच्या भानगडीत पडत नाही.मग असे सारे अधिकार असतानाही पोलिसांचा वचक निर्माण का होत नाही? खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी भलेही सापडत असतील,मात्र किरकोळ कारणावरून सुरु असलेल्या मारामारी करण्याच्या विकृतीला अजूनही चाप का लागत नाही? यापूर्वी एका बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलीस अधीक्षकांना 'कायदा सुव्यस्थेच्या बाबतीत परिस्थिती का सुधारत नाही?' असे विचारले होते.आता मग अजूनही कायद्याची भीती गुन्हेगारांना वाटत नाही का? याचाही विचार पोलीस अधीक्षकांनी करायला हवा.
https://epaper.prajapatra.com/