
30/07/2024
काही दिवसांपूर्वी शिळफाटा येथे नवी मुंबईच्या लेकीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली नंतर उरणमध्ये एका मुलीची दुर्दैवी हत्या झाली. राज्यात अशा घटना वारंवार घडतायत...
महिला, लेकी सुरक्षित नाहीत...
आरोपी नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा देऊन या लेकींना न्याय द्यावा, यासाठी सौ. शर्मिला वहिनी राजसाहेब ठाकरे यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारांबे यांची आज भेट घेतली.
अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी या नराधमांना वेळीच चाप लावला तर इतर नराधम असे कृत्य करण्यास धजावणार नाहीत, अशी मागणी देखील शर्मिला वहिनी यांनी यावेळी केली. यावेळी मनसे सरचिटणीस शालिनी ताई ठाकरे, रिटा ताई गुप्ता, उपाध्यक्ष स्नेहल ताई जाधव या देखील उपस्थित होत्या.....
#बदलापूर