15/08/2025
बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी, खेळाडू आणि अवयवदानकर्त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरव
बीड, 15 ऑगस्ट – भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बीड जिल्ह्यातील विविध विभागांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी, खेळाडू आणि अवयवदानकर्त्यांचा भव्य सन्मान सोहळा सामाजिक न्याय भवन येथे पार पडला. राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित मान्यवरांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास आमदार संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
सन्मानित अधिकारी-कर्मचारी:
पोलीस विभाग: श्रीमती पल्लवी भाऊसाहेब जाधव, अशोक बापुराव शिंदे, प्रदिप निवृत्ती येवले, श्रीराम रामदास खटावकर, शेख आसेफ शेख शमीम
महसूल विभाग: शिवकुमार स्वामी, सचिन सुरेशराव देशपांडे, सलीम शेख, संघर्षकुमार ओवे, जितेंद्र साहेबराव जाधव, राहुल रामनाथ बलाढ्ये, श्रीमती शितल लक्ष्मणराव चाटे, परमेश्वर त्रिंबक काळे, श्रीमती शेख मन्नाबी मुजफर पटेल
सन्मानित खेळाडू:
क्रिकेट – श्रावणी अजिनाथ दळवी, तायक्वांदो – नयन अविनाश बारगजे, व्हॉलीबॉल – अफताब कुरेशी नौशाद, कबड्डी – महारुद्र मधुकर गर्जे, खो-खो – प्रताप शहादेव तुपे, योगा – सभाषिणी विनायकराव वझे, बेसबॉल/सॉफ्टबॉल – आदित्य अरविंद विद्यागर
तसेच, अवयवदान करून इतरांना नवा श्वास देणाऱ्या श्रीमती कोटुळे कोमल गोकुळदास, प्रविण निनाले, सुखदेव गायके आणि इतरांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणांनी रंगत आणली. सूत्रसंचालन अनिल शेळके, ज्ञानेश्वर कोटुळे आणि अथर्व शेळके यांनी केले. या वेळी लोकप्रतिनिधी, नागरिक, विद्यार्थी, पत्रकार आणि अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.