13/09/2024
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग अंतर्गत प्रौढ बीसीजी लसीकरण, आयुक्तांनी लस घेऊन केला शुभारंभ
आज दिनांक १३.९.२०२४ रोजी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग अंतर्गत शांतीनगर येथे नवीन आपला दवाखानेचा उद्घाटन कार्यक्रम भिवंडी मनपा चे प्रशासक तथा आयुक्त मा. श्री. अजय वैद्य सो. यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. दिनांक ०३.०९.२०२४ रोजी पासून प्रौढ बीसीजी लसीकरण सुरु हे प्रौढ बीसीजी लसीकरण हे १८ वय वरील मागील पाच वर्षात TB झालेली व्यक्ती, १ जानेवारी २०२१ पासून TB रुग्णांच्या संपर्कात असणारे व्यक्ती, ६० वर्ष वरील व्यक्ती, बॉडी मास इंडेक्स (BMI) १८ किलोग्रम/ मीटर स्क्वेअर पेक्षा कमी असलेली व्यक्ती, सिगारेट किंवा बिडी घेणारे व्यक्ती, तसेच मधुमेह असणारे व्यक्ती यांना सदर लस देण्यात येत आहे. हे लस तीच लस आहे जी
लहानपणी जन्मता मुलाला दिली जाते तरी ह्या लस पासून घाबरण्याची काही आवश्कता नाही.
भिवंडी मनपाच्या सर्व ना. आरोग्य केंद्रातर्गत जागोजागी कॅम्प (शिबीर) आयोजित करण्यात येत आहे, तरी सर्व नागरिकांनी लासिकरण मोहिमेत सहभाग होऊन पालिकेस सहकार्य करावे. असे आवाहन पालिका आयुक्त यांनी केले. आयुक्तांनी स्वतः लस घेऊन एक छान संदेश भिवंडी मनपाच्या नागरिकांना दिले.
सदर कार्यकामास डॉ. बुशरा सय्यद शहर क्षयरोग अधिकारी, डॉ. जयवंत धुळे, डॉ. प्रिया फडके- मेडीकल ऑफिसर तथा एनटीईपी चे श्री. अनिल गुप्ता डीस्ट्रीक्ट कोर्डीनेटर, श्री. मोबीन शेख - एसटीएलएस आणि नागरी आरोग्य केंद्रातील मेडीकल ऑफिसर तथा कर्मचारी उपस्थित होते.
जनसंपर्क अधिकारी
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका