Hiwara Ashram Upadate

Hiwara Ashram Upadate हिवरा आश्रम् अपडेट हे अल्पावधीत लोकप्रिय पावलेले मराठी चॅनल आहे. संतोष थोरहाते संपादक आहे.

हिवरा आश्रम् अपडेट हे अल्पावधीत लोकप्रिय पावलेले मराठी चॅनल आहे. संतोष थोरहाते हे हिवरा आश्रम अपडेट या चॅनलचे मुख्य संपादक म्हणून काम पाहत आहे. त्‍यांना गेल्या अनेक वर्षांचा पत्रकारीता क्षेत्राचा गाढा अनुभव आहे. आपल्या पत्रकारीतेची सुरूवात त्‍यांनी हिवरा आश्रम सारख्या छोटयाशा खेडयातून करून अल्पावधीतच आपल्या विधायक पत्रकारीतेच्या माध्यमातून जिल्हयातील पत्रकारीतेच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. संतोष थोरहाते यांच्या विधायक पत्रकारीतेची दखल घेत त्‍यांना संजिवनी परिवाराने दर्पण पुरस्काराने सन्मानित केले आहे. पत्रकारीते सोबत सुप्रसिध्द ग्राफिक्स डिझायनर,योगप्रचारक सुध्दा आहेत. चॅनलच्या माध्यमातून समाजातील प्रतिभावंत आरोग्य, कृषी, शिक्षण, साहित्‍यिक, लेखक, कवी, कला क्षेत्रातील व्यक्ती, खेळाडू, उद्योगक्षेत्रात गगनभरारी घेतलेले कर्तृत्ववान व्यक्तीमत्‍वांचा जीवन प्रवास मुलाखतीच्या माध्यमातून प्रकट करण्याचे प्रभावी व्यासपीठ आहे.

संतोष थोरहाते
मुख्य संपादक
हिवरा आश्रम अपडेट
मो.9923209658

01/08/2026
लेखणीचा लोकशाहीर... जनतेच्या अस्मितेचा आवाज!लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज हिवरा आश्रम येथे उत्साहपूर्ण ...
01/08/2026

लेखणीचा लोकशाहीर... जनतेच्या अस्मितेचा आवाज!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज हिवरा आश्रम येथे उत्साहपूर्ण मिरवणूक काढून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि संघर्षातून वंचित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाला आवाज दिला. त्यांच्या विचारांचा वारसा केवळ स्मरणात नव्हे, तर कृतीत जपण्याची प्रेरणा हीच अशा उपक्रमांची खरी ताकद आहे.
ज्ञान, समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचा संदेश प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचत राहो, हीच त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अमर राहो!
#अण्णाभाऊसाठे #जयंती #हिवराआश्रम #समता #सामाजिकन्याय #संतोषथोरहाते

जीवनात यशस्वी होण्यासाठी मनाचा भक्कम निर्धार हवा असतो. शिक्षण घेताना तरूण वयात अनेक मोहाचे क्षण येतात. त्‍यात अडकले तर ज...
01/08/2026

जीवनात यशस्वी होण्यासाठी मनाचा भक्कम निर्धार हवा असतो. शिक्षण घेताना तरूण वयात अनेक मोहाचे क्षण येतात. त्‍यात अडकले तर जीवनाला प्रतिकूल कलाटणी मिळते. नैराश्य, व्यसनाधीनता, भाईगिरी हे जीवनाला उध्वस्त करतात. शिक्षण घेत असतांनाचे काही वर्ष जर मनोरंजन, मोबाईल, प्रेमप्रकरण, मौजमजा यापासून दूर राहिलो तर उर्वरीत जीवन आनंदाने व पाहिजे तसे जगता येते. मुलेमुली जर अभ्यासाचे कष्ट घेण्यास तयार असतील तर भविष्यात गोरेगरीब, खेडयातील शेतकरी, कष्टकऱ्यांच्या घरातील विद्यार्थी निश्चित अधिकारी होतील असे विचार मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी विवेकानंद कृषि महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात शनिवारी ता. १ रोजी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्‍त बोलतांना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, प. पू. शुकदास महाराज यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहूण्याच्या हस्ते पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले. संस्थेच्या वतीने उपाध्यक्ष अशोक थोरहाते यांनी त्‍यांचे महाविद्यालयात आगमन प्रसंगी स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे सचिव संतोष गोरे यांनी विद्यार्थ्यांना वेळावेळी प्रेरणा मिळावी व यशस्वी व्यक्तीमत्‍वाशी संवाद साधता यावा यासाठी महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्‍त व्याख्यान आयोजित केल्या जाते असे सांगितले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांकडून व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमात नशामुक्त युवक याविषयावर उत्‍कृष्ट लघुचित्रपट बनविण्याऱ्या जान्हवी वानखेडे, पल्लवी वरपे, पूजा सुरडकर यांची राज्यपातळीवर निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला महसूल सहाय्यक बाजीराव सानप, कर सहाय्यक वैभव बडे व सुरेश खाडे तसेच कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य मंगेश जकाते,महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. समाधान जाधव यांनी केले.

31/07/2026

पेनटाकळी प्रकल्पात ६५ टक्के, तर कोराडी धरणात ७० टक्के पाणीसाठा

यंदाच्या मान्सूनने परिसरातील जलसाठ्यांना नवसंजीवनी दिली आहे. पेनटाकळी मध्यम प्रकल्पात सुमारे ६५ टक्के, तर कोराडी धरणात ७० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिक आणि सिंचनावर अवलंबून असलेल्या भागासाठी हा नक्कीच दिलासादायक संकेत मानला जात आहे.

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून पेनटाकळी प्रकल्...
31/07/2026

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून पेनटाकळी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातही संततधार पाऊस सुरू आहे. परिणामी प्रकल्पाच्या जलाशयात पाण्याची आवक झपाट्याने वाढत असून जलपातळी सातत्याने उंचावत आहे. या पार्श्वभूमीवर धरणाचे वक्रद्वार कोणत्याही क्षणी उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येऊ शकतो, असा सतर्कतेचा इशारा पेनटाकळी प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षाने दिला आहे.
प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जलाशयातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. दुपारी चार वाजेपर्यंत पेनटाकळी प्रकल्प ५९.८५ टक्के भरला होता.

*श्री पांडुरंग संस्थान देऊळगाव माळी उत्सव 2026*
31/07/2026

*श्री पांडुरंग संस्थान देऊळगाव माळी उत्सव 2026*

Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

30/07/2026

भव्य दहीहंडी सोहळा देऊळगाव माळी जिल्हा बुलढाणा

Address

Vivekanand Nagar, Hiwara Ashram Tq. Mehkar Dist. Buldana
Buldana
443301

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hiwara Ashram Upadate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share