26/05/2023
*नेता आणि कार्यकर्ता*..!
मित्रांनो नेता आणि कार्यकर्ता हे समीकरण अलीकडील काळात खूप जोमाने जोर धरू लागलं आहे.. यात पक्ष, राजकारण, संघटना, समाजकारण तसेच गट तट यात सक्रिय राहून तत्वनिष्ठा, कट्टरता, विश्वास आणि सहनशीलता याचा अभाव दिसून येणं म्हणजे कार्यकर्त्यांची भरमसाठ वाढत चाललेली फळी..! तसेच खुर्चीसाठी पक्षातून उड्या मारून पळणारे दलबदलू नेते.. मग काय आपला नेता पळाला का कार्यकर्ता पळाला.. मग त्याचा नाईलाज असो किंवा नेत्यावर होत असलेला अन्याय त्याला सहन होत नसतो.. हे होत असताना काही कार्यकर्ते रडताना पण दिसतात.. नेत्यांचा शंभर टक्के फायदा होतो पण कार्यकर्त्यांचं काय..?
अलीकडच्या काळात दिल्ली ते गल्लीचं राजकारण बघितलं तर खूप भयानक परिस्थिती आहे.. फक्त सत्ता प्रस्थापित करण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी कोणत्याही लेव्हला जाऊन कृती केली जाते.. याचे पडसाद गावखेड्यात दिसून येतात.. मग गट तट आणि बंडाच्या भूमिका गाव विकासात शंभर टक्के अडसर ठरतात..!
नेतृत्वाला आकार घ्यायला वेळ लागतो पण कार्यकर्ता एका रात्रीतून तयार होतांना दिसतोय..
मग नेते मंडळींना काय हा नाही तर तो.. कार्यकत्यांनी फक्त नेत्यांची चमचेगिरी करायची म्हणजे काम फत्ते.. मग सकाळी पारावर बसून माझा नेता असा.. त्यानें समाजासाठी हे केलं ते केलं हे गोडवे गाऊन फुशारक्या गाजवल्या जातात.. अन् पध्दतशीर पणे निवडणूकांच्या काळात अर्थार्जन प्राप्त केलं जातं..!
हे लक्षात घ्या आपण आगोदर आपल्या कुटुंबाचे कर्तेधर्ते आहोत मग आपलं गाव आणि समाज.. नेते आपल्या सोयीनुसार बद्दल करत असतात.. राजकीय लोकांची जात फक्त स्वार्थ साधण्यासाठी तुम्हा आम्हाला जवळ घेते.. मग पध्दतशीर पणे कार्यकर्त्यांची आवड निवड ओळखून तशी उपचार पद्धती त्यांनी निर्माण केली आहे.. आपण अनेक निष्ठावंत कार्यकर्ते बघितले जेंव्हा त्यांच्यावर वाईट वेळ आली तेंव्हा त्यांचा नेता घराकडे पण फिरकला नाही..! म्हणून राजकीय हेतूने आपला मित्र परिवार किंवा गावाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे..!
राजकारणात नेते एकमेकांना चे गुप्त मित्र असतात..!
अन् कार्यकर्ते उघड शत्रू होऊन एकमेकांचे संबंध खराब करतात..! 👏👏