ANTI Berkya Narad

ANTI Berkya Narad भांडवलदारांचा नाही खऱ्या पत्रकारांच?

आपल्याला उध्दव साहेबांनी जे जे सांगितलं आहे ते नीट लक्षात ठेवा , आणि तसच करा - एकनाथ शिंदे
24/06/2022

आपल्याला उध्दव साहेबांनी जे जे सांगितलं आहे ते नीट लक्षात ठेवा , आणि तसच करा - एकनाथ शिंदे

 #पत्रकारांची_रद्दी_करणारा_कोरोनाकोरोनाच्या या अजस्त्र लाटेचा फटका सर्वच संस्था, व्यवसायांना बसला पण या कोरोनाच्या लाटेत...
21/07/2020

#पत्रकारांची_रद्दी_करणारा_कोरोना

कोरोनाच्या या अजस्त्र लाटेचा फटका सर्वच संस्था, व्यवसायांना बसला पण या कोरोनाच्या लाटेत सर्वाधिक वाहून गेली ती पत्रकार मंडळी. सातत्याने समाजाच्या अन्याय, अत्याचारावर आसूड ओढणाऱ्या लेखनीला म्यान करत, पोटासाठी चहा विक, सॅनिटायझर विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. काही पत्रकारांनी तर डबे बनव, सिक्युरिटी गार्डची नोकरी हे पर्याय पण स्वीकारले आहेत. पत्रकारांच्या जीवावर गब्बर झालेल्या मालकांना मात्र पत्रकारांना 3 महिने पोसणे जीवावर आले. ज्यांच्या जीवावर ही संपत्ती कामावलीये त्यांच्यासाठी आपल्या संपत्तीवर गदा येता कामा नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. म्हणून महाराष्ट्रातील नावाजलेल्या संपादक, वृत्त संपादक, बातमीदार, पेजमेकर, जाहिरात विभागातील तसेच अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला. परंतु आपल्यावर झालेल्या अन्यायाची साधी बातमीसुद्धा या पत्रकारांना करण्याची मुभा नाही. महाराष्ट्रात हजारो पत्रकार बेकार झालेत. पत्रकार आहे म्हणून अन्य संस्था त्यांना नोकरी देतांना हात आखडता घेतात. त्यामुळे सर्वाधिक घुसमट या क्षेत्राची होत आहे. एका मोठ्या संकटातून हा वर्ग जातोय. पण कुणालाही ना सोयर ना सुतक. पत्रकारांची एक पिढीच या कोरोनाने उध्वस्त केली आहे. त्यामुळे या पत्रकारांना मोलाचा हात देण्याची गरज आहे. कारण अजूनही हजारो पत्रकार बेकार होणार आहे.
#प्रवीण_खरे_पत्रकार

20/07/2020

तक्रारी ह्या ई-मेलवर [email protected] पाठवू शकता
#अँटी_बेरक्या_नारद

बेरक्या उर्फ नारद सवाल
20/07/2020

बेरक्या उर्फ नारद सवाल

19/07/2020

#अँटी_बेरक्या_नारद

माध्यमात मोठ्या प्रमाणात कामगार, पत्रकार कपात सुरू आहे.. गेल्या चार महिन्यात हजारो पत्रकार रस्त्यावर आले आहेत.. याचे दुष्परिणाम आता दिसायला लागले आहेत.. या संदर्भातली दिल्लीहून आलेली बातमी सर्वच माध्यमकर्मींना धक्का देणारी आहे.. दिल्लीतील एका हिंदी दैनिकातील पत्रकार तरूण शिसोदिया यांची काही दिवसांपूर्वीच नोकरी खंडीत करण्यात आली होती.. त्यामुळे आर्थिक परिस्थितीशी सामना करणारया शिसोदिया यांना कोरोनाची लागण झाली.. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.. मात्र या दुहेरी आघाताने त्रस्त शिसोदिया यांनी आज रूग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.. अत्यंत दुःखद अशी ही घटना आहे..
महाराष्ट्रातील मोठ्या दैनिकांनी देखील मोठ्या प्रमाणात पत्रकार कपात केलेली आहे.. अकाली बेकारी बदरी आल्यानं अनेक पत्रकार हवालदिल झालेले आहेत.. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी कामगारांबददल उद्योगांनी सहानुभूतीचे धोरण ठवावे अशी सूचना केली आहे.. त्याचा माध्यम समुह कितपत विचार करतील माहिती नाही पण आमची मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे, सरकारने पुढाकार घेत, सरकार, माध्यमांचे मालक आणि पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी अशी त्रीपक्षीय बैठक बोलावून सामंजसयातून मार्ग काढावा...हे सारं तातडीनं होण्याची गरज आहे..

Address

Delhi

Alerts

Be the first to know and let us send you an email when ANTI Berkya Narad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ANTI Berkya Narad:

Share

Category