13/08/2025
💠 *दोडामार्गमध्ये मानवाधिकार सुरक्षा आणि संरक्षण ऑर्गनायझेशनचे समस्या निवारण केंद्र सुरू*
📡 *DSN /DIGITAL NEWS PAPER*
🎯 *महिलांच्या समस्या, सामाजिक अन्याय आणि मानवाधिकार उल्लंघनाविरुद्ध तातडीने कार्यवाहीचा निर्धार*
✒️ *प्रतिनिधी : प्रमोद गवस*
*दोडामार्ग, १३:* नागरिकांच्या हक्कांचे रक्षण आणि न्याय मिळवून देण्यासाठी मानवाधिकार सुरक्षा आणि संरक्षण ऑर्गनायझेशनच्या वतीने दोडामार्ग येथे “समस्या निवारण केंद्र” सुरू करण्यात आले आहे. सदरचे केंद्र *ज्ञानगंगा बिल्डिंग, तिराळी रोड, बँक ऑफ महाराष्ट्र च्या बाजूला* सुरु करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत महिलांच्या समस्या, विविध यंत्रणेकडून होणारे त्रास, सामाजिक अन्याय, कुटुंबातील वाद, सरकारी योजनांचा लाभ मिळण्यात होणारा अडथळा तसेच मानवाधिकार उल्लंघनाशी संबंधित इतर प्रकरणांवर चर्चा करून योग्य तो मार्ग काढला जाणार आहे.
मानवाधिकार सुरक्षा आणि संरक्षण ऑर्गनायझेशन जिल्हाध्यक्ष प्रविण गवस यांनी सांगितले की, “आजच्या काळात अनेक नागरिक विविध प्रकारच्या अन्यायाला सामोरे जात असले तरी त्यांना योग्य व्यासपीठ किंवा मार्गदर्शन मिळत नाही. या पार्श्वभूमीवर समस्या निवारण केंद्र हे केवळ तक्रार ऐकण्याचेच नव्हे तर त्यावर तातडीने कार्यवाही करून न्याय मिळवून देण्याचे ठिकाण ठरेल.”
गवस यांनी पुढे स्पष्ट केले की, या केंद्रात महिलांच्या समस्या विशेष प्राधान्याने घेतल्या जातील. घरगुती हिंसा, छेडछाड, लैंगिक अत्याचार, पती-पत्नीतील वाद, कार्यस्थळी होणारे भेदभाव यांसारख्या प्रकरणांवर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि कायदेशीर मार्गाने उपाय केले जातील. तसेच, सरकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अडथळे येत असल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधून नागरिकांना मदत केली जाईल.
हे केंद्र सर्वसामान्य नागरिकांसाठी सदैव खुले राहील. कोणीही आपल्या तक्रारी प्रत्यक्ष येऊन, फोनद्वारे किंवा लेखी अर्जाद्वारे नोंदवू शकतो. “मानवाधिकाराचे रक्षण करणे ही केवळ कायद्याची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. म्हणूनच आपण सगळ्यांनी मिळून या कार्यात हातभार लावावा,” असे आवाहन प्रविण गवस यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हाध्यक्ष प्रविण गवस, ९४०४७७९०४ तसेच महिला प्रतिनिधी तनुजा कोरगावकर, ७२१८३३११०४, नमिता सावंत, ८३७८००७६०६ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येतं आहे.
*========================*
*पहा अधिक बातमी 👉👉*
https://kutumbapp.page.link/FNHAte1dfMyepGPG9
*========================*
🍮 *चहा नाष्ट्यासाठी उत्तम व चविष्ट ठिकाण.....एकदा खालं तर नक्कीच पुन्हा यालं....*
🍮☕ *श्री महादेव भुमिका हॉटेल*🍮☕
🍮 *चहा व नाष्ट्याची उत्तम सोय...*
🛤️ *आमचा पत्ता : शिवाजी राजे हायस्कुल जवळ, खोलपेवाडी, साळ*
📱 *मोबाईल. 7798899497,9370458202*
🎯 *जाहिरात व बातम्यासाठी संपर्क, संपादक - प्रमोद गवस : 9021494368*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 _*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ताज्या घडामोडी आणि थेट बातम्यासाठी Follow the DSN channel on WhatsApp: Follow the DSN channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaCkdEd3wtbAo2Yl130I
डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग न्यूज