News ContiNews

News ContiNews News Conti News is an Indian Marathi-language free-to-social media news Portal owned by Prachiti Grou

अतुलनीय कामगिरीबद्दल सर्वोच्च सन्मान,सर्वांना आपल्या शौर्याचा सदैव अभिमान... ============================वंजारी समाजातील...
30/07/2025

अतुलनीय कामगिरीबद्दल सर्वोच्च सन्मान,
सर्वांना आपल्या शौर्याचा सदैव अभिमान...
============================
वंजारी समाजातील वाकडीचे सुपुत्र श्री. संभाजी देशमुख दुसऱ्यांदा सर्वोच्च राष्ट्रपती पदकाने सन्मानित
============================

श्री संभाजी देशमूख ,सहाय्यक पोलीस निरिक्षक ,सीआयडी कल्याण हे वाकडी, ता.जामनेर ,जि.जळगावचे असून कै. नारायण देशमूख मा.तेलबिया स.सो. चेअरमन,कै.शिवाजी देशमूख मा.सरपंच वाकडी,व कल्याण येथील यशस्वी ऊद्दोजक श्री रमेश देशमूख यांचे बंधू, असून त्यांना पो.दलात केलेल्या अतूलनिय कामगीरीबाबत यापूर्वी मा.पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह ,सन २०१६मा.राष्ट्रपतीचे पो.मेडल व दि. २८जूलै २०२५ रोजी मा,डीजी श्रीमती रश्मी शूक्ला मँडमकडून स्मृतीचिन्ह देऊन सहकूटूंम्बाचा सन्मान केलागेला,तसेच सन २६जानेवारी २०२३ चे प्रजासत्ताक दिनी मा.राष्टपती महोदयाकडून जाहीर झालेले मा.राष्टपती मैडल दि.२९जूलै २०२५ रोजी मा.राज्यपाल श्री सी.पी. राधाकृष्णनजी चे हस्ते ,मा.श्री एकनाथ शिंदे ऊपमूख्यमंत्री, मा.श्री योगेश कदम, गृहराज्यमंत्री व ईतर मान्यवर ,वरिष्ट पो.अधिकारी यांचे ऊपस्थीतीत राजभवन मूम्बई येथे देण्यात आलेले आहै.
यामूळे देशमूख कूटूंम्बीयांचे तालूक्यातून विद्यमान मंत्री मा.श्री गीरीश महाजन व ईतराकडूनही कौतूक केलै आहे.
श्री संभाजी देशमूख यांचे शिक्षण वाकडी येथील गरूड शाळेतून झालेले असून त्यांनी पो.दलात वरिष्ट अधिकारी श्री वाय,सी,पवार,श्री फत्तेसिह पाटील,श्री छेरींग दोरजे,श्री अनूपकूमार सिह, श्रीमती अर्चना त्यागी, श्री आशूतोष डूंबरे, श्री संदिप जाधव, श्रीमती रश्मी शूक्ला मँडम अशा अनेक ऊच्चपदस्थ पो.अधिकारीं याचे मार्गदर्शनात काम केलेले आहे.त्यांची मूलगा अमेरिकेत पीएचडी पर्यत शिक्षण घेऊन ऊच्चपदी नोकरी करीत आहेत. श्री रमेश वश्री संभाजी देशमूख यांनी गावासाठी, गावातील शाळेसाठी व ईतर अनेक गरजूंना सढळ हाताने मदत केलेली आहे.अनेकांना नोकरीसाठी मार्गदर्शन व आपले घरी काहीकाळ आसरा देऊन मोलाचे सहकार्य केलेले आहै.
अशा या देशमूख कूटूंम्बातील संभाजी नारायण देशमूख यांचा दोनवेळैस मा.राष्ट्रपतीचे पोलीस पदकाने सन्मान यथोचित,व ऊचित सन्मानच म्हणावा लागेल.

UPSC - MPSC - पोलीस भरती स्पर्धा परीक्षा तयारी करण्यासाठी पोलीस वाचनालय उद्घाटन सोहळा निमित्त जळगाव पोलीस अधीक्षक मा. डॉ...
24/07/2025

UPSC - MPSC - पोलीस भरती
स्पर्धा परीक्षा तयारी करण्यासाठी पोलीस वाचनालय उद्घाटन सोहळा निमित्त जळगाव पोलीस अधीक्षक मा. डॉ. महेश्वर रेड्डी (भापोसे) सर यांच्या हस्ते सत्कार सोबत उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. संदीप गावित सर

जळगाव एमआयडीसी विस्तारीकरणात गरीब शेतकऱ्यांचा बळी तर जाणार नाही ना ?**********************भूसंपादन प्रक्रिया तात्काळ थां...
07/07/2025

जळगाव एमआयडीसी विस्तारीकरणात गरीब शेतकऱ्यांचा बळी तर जाणार नाही ना ?
**********************

भूसंपादन प्रक्रिया तात्काळ थांबविणेसाठी शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
==============================================

महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या धोरणानुसार जळगाव येथील एमआयडीसीचे विकासात्मक विस्तारीकरण नियोजित असून त्यासाठी जळगाव तालुक्यातील मौजे चिंचोली ,कुसुंबा खुर्द , पिंपळे या परिसरातील भूभाग संपादित केला जाणार आहे. त्यात ज्या भागातील ज्या शेतजमीन महाराष्ट्र विकास महामंडळातर्फे संपादित करण्यात येणार आहे त्या शेतकऱ्यांचे गट नंबर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने दि. २ जुलै रोजी एका वर्तमानपत्रात देण्यात आलेले आहेत. जानेवारी २०२५ मध्ये जमिनी का संपादित केल्या जाऊ नये या आशयाची नोटीस देखील विभागाच्या वतीने संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आली होती. पण त्याही अगोदर ०४ ऑक्टोबर २०२३ रोजी या प्रक्रियेला विरोध म्हणून संबंधित शेतकऱ्यांतर्फे शासनाला निवेदन देण्यात आले होते. आता मात्र प्रत्यक्षात भूसंपादनाची प्रक्रिया शासनाने गतिमान केली असून दि. २ जुलै रोजीच्या वर्तमानपत्रातील वृत्तानुसार सदरील कारवाईची तीव्रता लक्षात येते.शेतजमीन संपादनाची हि प्रक्रिया तात्काळ थांबवावी यासाठी मौजे चिंचोली ,कुसुंबा खुर्द , पिंपळे येथील संबंधित शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच एक निवेदन देण्यात आले.
निवेदनानुसार या प्रकल्पाला चिंचोली गावातील संबंधित शेतकऱ्यांचा
पूर्णपणे विरोध आहे. त्याचे कारण मौजे चिंचोली ,कुसुंबा खुर्द , पिंपळे या शिवारातील बहुतेक शेतजमिनी या चिंचोली गावातील लोकांच्याच आहेत. अगोदरच ,विमानतळ , डाएट कॉलेज , मेडिकल कॉलेज ,मेडिकल हब, महावितरणचे सबस्टेशन, भारत फोर्स ,जळगाव जालना रेल्वे मार्ग ,पिंपळे शिवारात उभारलेले धरण अशा विविध शासकीय नियोजनासाठी बहुतांश शेतजमीन शासनाने संपादित केलेली आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आता उर्वरित जमीन जर या प्रकल्पात संपादित केली गेली तर खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना उपजीविका करण्यासाठी कोणतेही साधन राहणार नाही आणि उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे हि भूसंपादनाची प्रक्रिया रद्द करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून प्रक्रिया रद्द न केल्यास तीव्र आंदोलन व आत्मदहन केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.

शाळेच्या प्रथम दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना वृक्षप्रेमाचे धडे          *****************************************...
16/06/2025

शाळेच्या प्रथम दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना वृक्षप्रेमाचे धडे
**************************************************
श्रीसंत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयात इको क्लबच्या सहकार्याने वृक्षारोपण

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरुण येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक पेड माॅं के नाम अभियानांतर्गत शाळेच्या परिसरात पहिल्याच दिवशी 20 झाडांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. शाळेच्या लोकसहभागातून वृक्षारोपण आवाहनाला जळगाव शहर महानगरपालिकेचे सहाय्यक उपायुक्त गणेशजी चाटे यांनी शाळेला 20 प्लास्टिक टाकी दिल्या. व जळगाव शहरातील नामांकित प्रचिती मीडिया चे संचालक सचिन भाऊ घुगे यांनी 20 वृक्ष देत या अभियानाला भरभरून साथ दिली.

मनपाच्या सहाय्यक आयुक्त गणेशजी चाटे , गणेश फड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रचिती मीडियाचे संचालक सचिन भाऊ घुगे व संस्थेचे अध्यक्ष तथा मा.नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक इंजि हेमंत नाईक यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून 'एक पेड माँ के नाम अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. तर शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वृक्षारोपण करीत अभियानात सक्रीय सहभाग नोंदविला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी मागील वर्षाची इको क्लब ची कार्य सांगितले .आपल्या मुलाच्या वाढदिवसा निमित्त एक तरी झाड दान करा असे आव्हान शाळेतील पालकांना व परिसरातील नागरिकांना केले.

सोयो एनर्जीचे संचालक श्री.किशोर ढाके यांच्या विवाह वृद्धिदिनाच्या च्या   निमीत्ताने एमआयडीसीत वृक्षारोपण================...
09/06/2025

सोयो एनर्जीचे संचालक श्री.किशोर ढाके यांच्या विवाह वृद्धिदिनाच्या च्या निमीत्ताने एमआयडीसीत वृक्षारोपण
===========================================
प्रत्येक विशेष प्रसंगी श्री. ढाके अनेक वर्षांपासून राबवित आहेत उपक्रम
-----------------------------------------------------------------------------------------

ग्लोबल वार्मिंगच्या वैश्विक समस्येने संपूर्ण जग होरपळून निघत आहे . त्याचे भयंकर दुष्परिणाम दर्शविणाऱ्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत . त्यादृष्टीने वृक्षारोपण हि काळाची गरज झाली आहे . शासन जनजागृतीसाठी ''माझी वसुंधरा अभियान '' यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेच , पण प्रत्येकाची हि आता जबाबदारी व कर्तव्यही आहे . याच भावनेतून आणि विचारातून जळगावातील सोयो ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संचालक श्री.किशोर ढाके यांच्या वतीने आपल्या लग्नाच्या ३० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने १३० रोपांचे वृक्षारोपण करण्यात.याप्रसंगी श्री. किशोर ढाके यांच्या धर्मपत्नी तथा सोयो ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या संचालिका सौ. स्मिता ढाके, सुप्रसिद्ध गूढविद्या जाणकार श्री. कुंदन तायडे ,मुख्य व्यवस्थापक प्रशांत वाघुळदे ,प्रचिती मीडियाचे संचालक श्री. सचिन घुगे इ. मान्यवर तसेच सोयो तथा प्रचिती मीडियाचे कर्मचारी वृंद उपस्थित होते . " आपले शहर सुंदर शहर होण्यासाठी तसेच आपली प्रत्येकाची आरोग्यसंपदा निरोगी राहण्याच्या दृष्टीने व भविष्यातील येणाऱ्या पिढींच्या व जीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाने आपल्याला शक्य तेवढ्या प्रमाणात वृक्षारोपण करून उत्स्फूर्तपणे आपले योगदान द्यावे . "असे आवाहनात्मक विचारही श्री. किशोर ढाके यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

गाडेगाव घाट परिसरात श्री तक्षकेश्वर महादेव मंदिराचे भूमिपूजन संपन्न: निसर्गरम्य परिसरात लवकरच साकार होणार आकर्षक मंदिर==...
23/05/2025

गाडेगाव घाट परिसरात श्री तक्षकेश्वर महादेव मंदिराचे भूमिपूजन संपन्न: निसर्गरम्य परिसरात लवकरच साकार होणार आकर्षक मंदिर
=======================================

जळगाव पासून अवघ्या १५/१६ कि.मी. अंतरावर असलेल्या जळगाव छ. संभाजी नगर हायवेलगत , गाडेगाव घाट परिसरात लवकरच आकर्षक असे पवित्र श्री श्री तक्षकेश्वर महादेव मंदिर साकारले जाणार असून , गुरुवार दि. २२ मे रोजी या मंदिराचे विधिवत भूमिपूजन संपन्न झाले. जळगाव येथील प्रसिद्ध जाहिरात संस्था असलेल्या प्रचिती मीडियाचे संचालक श्री.सचिन अशोक घुगे यांच्या आंतरिक प्रेरणा आणि संकल्पनेतून उभारले जात असलेल्या या मंदिरांच्या भूमिपूजन प्रसंगी जळगावचे प्रसिद्ध उद्योगपती व सोयो ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संचालक श्री.किशोर ढाके व सौ. स्मिता ढाके यांच्या शुभहस्ते मंदिर भूस्थळी सर्वप्रथम कुदळ मारण्यात आली. प्रसिद्ध गूढविद्या जाणते श्री. कुंदन धर्मा तायडे तसेच संहिता वेदपाठी, ज्योतिष भूषण वेदमूर्ती श्री.सागर सुभाष जोशी (गुरुजी) यांचे पौरोहित्य या मंदिर भूमिपूजन व अघोर हवन प्रक्रियेत लाभले. याप्रसंगी जळगाव पोलीस दलातील श्री. दत्तात्रय पोटे, श्री.प्रमोद कठोरे, श्री. किरण पाटील, श्री. अतुल वंजारी, श्री. संघपाल तायडे, नवलखा ज्वेलर्सचे संचालक श्री.आदित्य नवलखा, श्री. विनोद घुगे श्री. सतीश वाघ, श्री. विजय वाघ, श्री. प्रशांत नाईक, श्री. रुपेश वाघ, श्री. प्रदीप वाघ, श्री. मुकेश वाघ, श्री. संजय घुगे, श्री. बबलू घुगे, श्री. विष्णु घुगे श्री. किरण घुगे, श्री. धनराज पालवे, श्री. निवृत्ती वाघ अमोल घुगे
इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदरचे श्री.तक्षकेश्वर महादेव मंदिर हे सचिन घुगे यांच्या गाडेगाव परिसरातील कृषी क्षेत्रात अतिशय रम्य अशा नैसर्गिक जागेत व वातावरणात बांधले जाणार असून, या ठिकाणी येणाऱ्यांना एक अनोखी अनामिक शांतता लाभते.या मंदिर निर्माणाचा विचार मनात येण्याचे कारण या संदर्भात अनेक चमत्कारी घटनांची अनुभूती आपण घेतली असून पवित्र मंदिराची निर्मिती आपल्या हातून व्हावी हि ईश्वरी इच्छाच असल्याची भावना सचिन घुगे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.सौ.नयना सचिन अशोक घुगे या दाम्पत्याद्वारा अगदी सकाळपासून सुरु झालेला भूमिपूजन व होमहवन विधी दीर्घकाळपर्यंत चालला. पूजेनंतर प्रसादभोजनाचेही नियोजन करण्यात आले होते.याप्रसंगी अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पवित्र कार्यासाठी श्री. अविनाश दहाड - संचालक - गायत्री मल्टिटेक प्रा.ली यांचे सहकार्य लाभले.

चिंचोली ग्रा.पं.उपसरपंचपदी आनंद दत्तू घुगे यांची बिनविरोध निवड ================================================         ...
13/05/2025

चिंचोली ग्रा.पं.उपसरपंचपदी आनंद दत्तू घुगे यांची बिनविरोध निवड
================================================

जळगाव तालुक्यातील एक महत्वाची ग्रामपंचायत अशी ओळख असलेली ग्रामपंचायत म्हणजे चिंचोली होय.चिंचोली ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या
उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली.या निवडणुकीत ग्रा.पं सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.आनंद दत्तू घुगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी चिंचोली ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य,असंख्य ग्रामस्थ ,तसेच ग्रामपंचायतीचे ग्राम अधिकारी श्री.सुनील चावदस भोई ,शिपाई श्री.विशाल दिलीप पाटील इत्यादी उपस्थित होते.नवनिर्वाचित उपसरपंच श्री.आनंद घुगे हे सामाजिक कार्यातही सक्रिय असून रक्तदान तसेच रक्तदानविषयक शिबिरे इत्यादी संदर्भात ते नेहमीच अग्रेसर असतात. याशिवाय ते टायगर गृपचेहीसदस्य असून ग्रुपचे श्री.सोपान सोनार यांच्या सहकार्याने विविध सामाजिक समस्या सोडविण्यातही त्यांचा नेहमीच पुढाकार असतो.श्री. आनंद घुगे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रा.पं. कर्मचारी, अनेक मान्यवर तसेच चिंचोली ग्रामस्थांनी घुगे यांचे अभिनंदन केले.

वाहनचोरांवर जळगाव पोलिसांचे सर्जिकल स्ट्राईक - राजस्थानात आवळल्या आरोपींच्या मुसक्या : चोरी केलेली इनोव्हा  गाडीही केली ...
08/05/2025

वाहनचोरांवर जळगाव पोलिसांचे सर्जिकल स्ट्राईक - राजस्थानात आवळल्या आरोपींच्या मुसक्या : चोरी केलेली इनोव्हा गाडीही केली हस्तगत
============================================

राजस्थानच्या रणरणत्या वालुकामय प्रदेशातील सांचोरचे जंगल ..... १०० ते १५० सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि गोपनीय माहितीच्या माध्यमातून मागोवा काढत , वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार मोजक्या सहकाऱ्यांसोबत तेथे पोहचलेले जळगाव एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल.... रात्रंदिवस आरोपी तसेच वाहनाचा शोध अखंड सुरु ....अपरिचित प्रदेश , प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि शोध शातीर गुन्हेगारांचा......अशा आव्हानात्मक स्थितीत वरिष्ठांचे निरंतर मार्गदर्शन , राजस्थानातील स्थानिक पोलिसांशी समन्वय,प्राप्त गोपनीय माहिती , तांत्रिक माहितीचे अचूक विश्लेषण आणि स्वतःच्या प्रासंगिक बुद्धिकौशल्याने शरद बागल यांनी सुमारे एक महिन्याच्या अथक परिश्रमानंतर दोन आरोपींच्या मुसक्या आवळून ,सालोरच्या जंगलात बेवारस स्थितीत असलेली चोरीतील इनोव्हा गाडी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतली व स्वतः चालवीत आज रोजी जळगावात आणून संबंधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिली .सदरील वाहन हे जळगावातील सुप्रसिद्ध उद्योजक सोयो सिस्टीम्सचे संचालक किशोर ढाके यांच्या मालकीचे असून कायदेशीर प्रक्रियेनंतर ते त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
७ एप्रिल २०२५ च्या मध्यरात्री जळगाव शहरातुन एकाच रात्रीत प्रतिष्ठित नागरिकांची तीन चारचाकी वाहने चोरीस गेली होती.या धक्कादायक घटनेची सर्वत्र चर्चा होती . याबाबत तीन पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना आदेशित केले होते. या दाखल गुन्ह्याचा समांतर तपास सुरु होता.
सदरची यशस्वी कारवाई हि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी ,अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते ,उपविभागीय पोलीस अधिकारी ,जळगाव विभाग संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड --स्थानिक गुन्हे शाखा जळगाव ,पोलीस उपनिरीक्षक शरद बागल,सहा.फौजदार अतुल वंजारी , पोलीस हवालदार /०२हिरालाल पाटील ,पोलीस हवालदार /९८२ विजय पाटील,चालक पोलीस शिपाई महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली. उर्वरित वाहने व आरोपींचा शोध व तपास याच कुशलतेने सुरु असल्याचे पोलीस दलाच्या वतीने सांगण्यात आले.

*दक्ष कर्तव्याचा सन्मान,आम्हा सदैव आपला अभिमान !*गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. नीलोत्पल सर यांना राष्ट्रीय स्त...
04/03/2025

*दक्ष कर्तव्याचा सन्मान,
आम्हा सदैव आपला अभिमान !*

गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. नीलोत्पल सर यांना राष्ट्रीय स्तरावरील '' फिक्की स्मार्ट पोलिसिंग अवार्ड (FICCI )-2024 '' प्राप्त झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !

सचिन घुगे
संचालक - प्रचिती मीडिया जळगाव

व्यवसायाची वाढ आणि ब्रँडिंग हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत, जे व्यवसायाच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. ब्रँडिंग ...
01/03/2025

व्यवसायाची वाढ आणि ब्रँडिंग हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत, जे व्यवसायाच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. ब्रँडिंग केवळ एक लोगो किंवा नाव नसून, ते ग्राहकांशी आपल्या व्यवसायाच्या मूल्यांचा, उद्दिष्टांचा आणि इमेजचा संबंध असतो. व्यवसायाची वाढ साध्य करण्यासाठी ब्रँडिंगची आवश्यकता खालीलप्रमाणे आहे:

विश्वास निर्माण करणे: चांगली ब्रँडिंग ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करते. एक दृढ आणि स्पष्ट ब्रँड ग्राहकांना आपला व्यवसाय विश्वासाने स्वीकारण्यास मदत करतो.

स्पर्धेतील वेगळेपण: ब्रँडिंग आपल्या व्यवसायाला स्पर्धेपासून वेगळं करते. जर तुमचं ब्रँड स्पष्टरित्या ओळखलं जात असेल, तर ग्राहक तुमच्या उत्पादन किंवा सेवेसाठी तुमच्याकडे येतील.

ग्राहकांची निष्ठा: चांगली ब्रँडिंग ग्राहकांमध्ये निष्ठा निर्माण करण्यास मदत करते. जेव्हा ग्राहकांना तुमच्या ब्रँडची गुणवत्ता आणि अनुभव पसंतीची असतो, तेव्हा ते तुमच्याशी दीर्घकाळ जोडले राहतात.

संवेदनशीलता आणि सामर्थ्य: ब्रँडिंग तुमच्या व्यवसायाच्या मूल्यांचा आणि कार्यपद्धतीचा एक प्रतिबिंब असते. ग्राहकांच्या डोळ्यात तुमच्या ब्रँडची महत्त्वपूर्ण ओळख असणे, तुम्हाला बाजारपेठेत प्रबळ स्थान देऊ शकते.

वाढीच्या संधी: एक चांगली ब्रँडिंग आणि ओळख व्यवसायाच्या वाढीला चालना देते. त्यामुळे तुम्ही नवीन उत्पादन किंवा सेवा सादर करताना त्याला ग्राहकांचा अधिक विश्वास मिळवू शकता.

निष्कर्षतः, एक मजबूत ब्रँड व्यवसायाच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. आपल्या व्यवसायाच्या ब्रँडला एक मजबूत आणि सकारात्मक ओळख देऊन, तुम्ही व्यवसायाच्या यशाची दिशा ठरवू शकता.
*सचिन अशोक घुगे - संचालक - प्रचिती मीडिया*

*कौन कहते है, भगवान मिलते नहीं…*महा मॅरेथॉन प्रभावी नियोजनाचे प्रमुख शिल्पकार / टीमलीडर *श्री.नीलोत्पल (भा.पो.से.)* पोली...
25/02/2025

*कौन कहते है, भगवान मिलते नहीं…*
महा मॅरेथॉन प्रभावी नियोजनाचे प्रमुख शिल्पकार / टीमलीडर
*श्री.नीलोत्पल (भा.पो.से.)* पोलीस अधीक्षक गडचिरोली यांची प्रचिती मीडियाला भेट 💐

*चिंचोलीच्या भूमीत संगीतमय श्रीराम कथा व संकीर्तन महोत्सवास दि.२६रोजी   प्रारंभ - पहिल्याच दिवशी असंख्य भाविकांची प्रचंड...
27/01/2025

*चिंचोलीच्या भूमीत संगीतमय श्रीराम कथा व संकीर्तन महोत्सवास दि.२६रोजी प्रारंभ - पहिल्याच दिवशी असंख्य भाविकांची प्रचंड उपस्थिती*

भगवंताच्या कृपेने , साधू संतांच्या आशीर्वादाने , व श्री.विठ्ठल रुखमाई मंदिर संस्थान चिंचोली यांच्या वतीने आणि समस्त ग्रामस्थ चिंचोली यांच्या सहकार्याने सहकार्याने , दि. २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत प्रभू श्रीरामचंद्रांची संगीतमय श्रीरामकथा व संकीर्तन महोत्सव चिंचोली ता. जळगाव येथे संपन्न होत आहे. या पवित्र भक्तिमहोत्सवास रविवार दि.२६ रोजी सुरुवात झाली . जळगावातील सुप्रसिद्ध नवलखा ज्वेलर्सचे संचालक श्री.प्रदीपजी नवलखा यांच्या शुभहस्ते प्रारंभीचे ग्रंथपूजन व महाआरती होऊन या भक्ती महोत्सवाचा प्रारंभ झाला. दुपारी २ ते ५ या वेळेत आळंदी देवाची येथील प्रख्यात कथावाचक रामायणाचार्य , ह.भ.प.गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक यांच्या सुमधुर रसाळ वाणीतून स्रवलेल्या संगीतमय श्रीरामकथा श्रवणाने असंख्य भाविकभक्त अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. तर रात्रीच्या सत्रात गेवराई , बीड येथील कीर्तनकेशरी ह.भ.प.आक्रुर महाराज साखरे यांच्या प्रभावशाली कीर्तनाने उपस्थितांना भारावून टाकले. या महोत्सव काळात चिंचोलीतील वातावरण प्रचंड भक्तिमय झाले असून , पहाटे ५ ते ६ काकडा भजन , ८ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण , दुपारी २ ते ५ श्रीराम कथा ,सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ , रात्री ८--३० ते १०--३० कीर्तन अशा भरगच्च भक्तिमय कार्यक्रमांची महापर्वणी भाविक अनुभवत आहेत. संगीतमय श्रीरामकथेसोबतच विविध ठिकाणच्या विविध ख्यातनाम कीर्तनकारांच्या कीर्तन श्रवणाचीही भाविकभक्तांना या निमित्ताने संधी आहे. आज दि. २७ रोजी समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज (इंदोरीकर महाराज ), दि. २८ रोजी कीर्तनकोविद विशाल महाराज खोले (कुऱ्हाकाकोडा ), विनोदसम्राट ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज तांबे (नेवासा ), रामायणाचार्य ह.भ.प.बाळू महाराज गिरगावकर (बीड ), वैराग्यमूर्ती ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले(देहू ,जुन्नर ), ह.भ.प.नामदेव महाराज शास्त्री सानप ( भगवानगड ), ज्ञानसिंधु गुरुवर्य केशव महाराज उखळीकर (परळी ,बीड )इ. चा कीर्तनकारांत समावेश आहे. दिंडी सोहळा शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत गावातून निघणार असून रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी दु. १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे (गावभोजनाचे ) आयोजन करण्यात आले आहे. सदर संगीतमय श्रीराम कथा व महाभक्तिमहोत्सवाच्या यशस्वीतेसाठी श्री.विठ्ठल रुखमाई मंदिर संस्थान चिंचोली आणि समस्त ग्रामस्थ चिंचोली हे अहोरात्र प्रचंड मेहनत घेत आहेत. तरी भाविकांनी या संगीतमय श्रीराम कथा व संकीर्तन महोत्सवास मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहून या पुण्यसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.विठ्ठल रुखमाई मंदिर संस्थान चिंचोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Address

Jalgaon
425001

Alerts

Be the first to know and let us send you an email when News ContiNews posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to News ContiNews:

Share