
14/09/2025
जत पंचायत समितीतील तरुण अभियंता अवधूत वडार यांच्या मृत्यूची घटना हादरवून सोडणारी आणि अत्यंत संशयास्पद आहे. काही महिन्यांपासून त्यांच्यावर सतत शासकीय कामकाजात राजकीय दबाव टाकला जात असल्याची माहिती पुढे येत आहे. या दबावामध्ये काही राजकीय व्यक्ती, आमदाराचा निकटवर्तीय तसेच पंचायत समितीतील काही कर्मचारी सहभागी असल्याचे कुटुंबीयांचे आरोप आहेत. असह्य परिस्थितीमुळे त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला की त्यामागे घातपात आहे, याबाबत सखोल तपास होणे गरजेचे आहे. या प्रकरणात सत्य बाहेर आले पाहिजे, दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि अवधूत वडार यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळणे आवश्यक आहे. दिवंगत अवधूत वडार यास #भावपूर्ण_श्रद्धांजली !
Devendra Fadnavis