
30/11/2024
साहित्य विहार संस्था, नागपुर तर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट कथासंग्रह वाङंमय पुरस्कार माझ्या’रंग त्या नभाचे’ ह्या माझ्या दुसऱ्या कथासंग्रहाला आज दिनांक ३०/११/२०२४ ला देण्यात आला.
साहित्य क्षेत्राने मला थोडीफार का होईना वाचकांच्या मनात ओळख निर्माण करून दिली. राज्यभरातून पुरस्कारासाठी येणाऱ्या पुस्तकांतून सर्वोत्कृष्ट कथासंग्रहासाठी माझ्या पुस्तकाची निवड केल्या बद्दल आशाताईंचे आणि साहित्य विहार संस्थेचे मनापासून आभार. ह्या पुरस्काराच्या निमित्ताने पुनः एकदा माझ्या साहित्याला गौरव,आत्मविश्वास मिळाला.
पुरस्कार जाहीर होता क्षणी आनंद तर होतोच पण स्वीकारताना मात्र हबकलेला असतो. पुरस्कार अधिकाधिक डोळसपणे, सर्वकष साहित्य निर्मितीची जबाबदारी अंगावर टाकून जातात.
‘हरवलेलं मन’आणि ‘अधुऱ्या रेषा’ ह्या दोन्ही कथा वाचकांनी उचलुन धरल्या. दर दिवशी कॉल्स emails वर येणाऱ्या प्रतिक्रिया भारावून टाकतात. नवीन काहीतरी सुचवून जातात.पण कुठेतरी कथाशय वाचकांपर्यंत पोहोचत आहे ह्याच समाधान मला आहे .
पुनःश्च साहित्य विहार संस्था, आशाताई पांडे , प्रदीप दाते सर ह्यांना मनापासून धन्यवाद देत हा पुरस्कार वाचकांना अपर्ण करतो…. धन्यवाद!
डॉ. नितीन पंढरीनाथ करमरकर