Karad Today

Karad Today Daily News Updates with photographs in Karad city... Please fallow like to this page
I entered the field of journalism in 1995.

Raju Sanadi Karad Freelance Journalist-Photojurnalist...
I myself Raju Sanadi Karad have started a Karad Today News page to provide some news about Karad city and its surroundings on page. Started working as a press photographer in a Marathi daily. Currently I am working as a freelance photojournalist for national news agency and some national media. https://www.facebook.com,
htt

ps://instagram.com/ https://www.youtube.com/ karadtodaynews.blogspot.com, Karad Today online News, Karad Today page, Raju Sanadi Karad-9822308552,9823141970

23/08/2026
22/08/2026

महाराष्ट्र विधानसभेतील काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते आ.विजय वडेट्टीवार उद्या कराड दौऱ्यावर

कराडचा सहा पदरी उड्डाणपूल मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी रात्री साडेनऊ वाजले तरी सुरू ठेवला आहे. मात्र दररोज सामान्य वाहनधारका...
22/08/2026

कराडचा सहा पदरी उड्डाणपूल मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी रात्री साडेनऊ वाजले तरी सुरू ठेवला आहे. मात्र दररोज सामान्य वाहनधारकांसाठी सायंकाळी सहा वाजता बंद केला जातो.

कराडच्या एमआयडीसीतील पायाभूत सुविधा आणि उद्योजकांच्या प्रलंबित प्रश्नांवर येत्या आठ दिवसात कार्यवाही करावी - उद्योग मंत्...
22/08/2026

कराडच्या एमआयडीसीतील पायाभूत सुविधा आणि उद्योजकांच्या प्रलंबित प्रश्नांवर येत्या आठ दिवसात कार्यवाही करावी - उद्योग मंत्री उदय सामंत

सातारा दि.22- सातारा जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या औद्योगिक वसाहतींच्या पायाभूत सुविधा आणि उद्योजकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर येत्या आठ दिवसांत निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले.

कराड येथील हॉटेल विट्स येथे आयोजित उद्योजकांसोबतच्या बैठकीत उद्योग मंत्री श्री. सामंत बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मास साताराचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह प्रमुख उद्योजक, विविध विभागांचे अधिकारी आणि उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, भूसंपादन तसेच आरोग्य सुविधांबाबतच्या प्रश्नांचा आढावा घेताना मंत्री सामंत म्हणाले, कराड एमआयडीसी मधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी आठ दिवसांत प्रस्ताव मंजूर करून घेण्याच्या सूचना सामंत यांनी दिल्या. न्यायप्रविष्ट जागेमुळे निर्माण होणारा अडथळा टाळून एमआयडीसीच्या स्वतःच्या जागेतून नवीन प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचा मार्ग उभारण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

उद्योजकांना शासकीय परवानग्या मिळविताना होणारा त्रास कमी करण्यासाठी ‘मैत्री’ पोर्टल आणि एक खिडकी योजना अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे असल्याचे सांगून मंत्री श्री. सामंत म्हणाले, खंडाळा-शिरवळ औद्योगिक वसाहतींचा अतिरिक्त भूसंपादनाचा प्रश्न वेगाने मार्गी लावावा. तसेच फलटण येथील भूसंपादनाचा प्रश्न ग्रामस्थांशी चर्चा करून सोडविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

म्हसवड एमआयडीसीसाठी पुरेसा निधी उपलब्ध असल्याने तेथील भूसंपादन आणि उभारणीची कामे तत्काळ सुरू करावे त्याचबरोबर वाई एमआयडीसीमध्ये वाहनांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच सीएसआर निधीतून सांडपाणी व्यवस्थापनाची कामे करण्यास इच्छुक उद्योजकांना औद्योगिक विकास महामंडळाने तातडीने मंजुरी द्यावी.

लघु व नवउद्योजकांना भांडवलाची अडचण भासू नये यासाठी बँकांनी कर्जवाटपात सकारात्मक निर्णय घेऊन सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने सातारा येथील कामगार रुग्णालयाची उपशाखा कराड एमआयडीसी परिसरात सुरू करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची. या रुग्णालयासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासनही मंत्री श्री. सामंत यांनी दिले.

कराडच्या उड्डाणपुलाखाली पारध्यांचा अड्डा; अपघाताचा धोका...कराड, दि. 22 : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर ना...
22/08/2026

कराडच्या उड्डाणपुलाखाली पारध्यांचा अड्डा; अपघाताचा धोका...

कराड, दि. 22 : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर नाका येथे दिवसेंदिवस उड्डाण पुलाखाली पारध्यांची संख्या वाढू लागली आहे. कराड शहर पोलीस स्टेशन, कराड व मलकापूर नगरपरिषद प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी वाहनधारक, नागरिक करू लागले आहेत.

गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पुलाखालील मोकळ्या जागी पारध्यांनी वास्तव्य केले आहे. या पारध्यांच्या कुटुंबात लहान मुले आहेत. महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असल्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. त्याचबरोबर सदर पारध्यांची मुले मोठमोठ्याने आरडाओरडा करत असतात, त्यामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होत असून यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे.

उड्डाणपूला खालील या पारध्यांना ठेकेदार कंपनीच्या सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हाटकण्याचा प्रयत्न केला असता हे पारधी सदर कर्मचाऱ्यांवर धावून जातात तसेच दगड ही मारण्याचा प्रयत्न करतात.

उड्डाण पुलाखाली सायंकाळी खाजगी वाहने त्याचबरोबर लक्झरी बसेस पार्क करत असताना या पारधी कुटुंबातील लहान मुलांना अपघात होण्याची शक्यता आहे.

या पारध्यांमुळे अनेक पादचाऱ्यांमध्ये रस्ता ओलांडून जाताना भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शहर पोलीस, वाहतूक प्रशासनाने त्याचबरोबर कराड मलकापूर नगरपरिषद प्रशासनाने याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

ग्रामस्थांच्या हृद्य सत्काराने भारावल्या रेठरे बुद्रुकच्या तीन कर्तृत्ववान भगिनी...माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण, मेघा...
22/08/2026

ग्रामस्थांच्या हृद्य सत्काराने भारावल्या रेठरे बुद्रुकच्या तीन कर्तृत्ववान भगिनी...माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण, मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि वीरपत्नी विनिता कामटे यांचा ग्रामस्थांकडून गौरव (बातमी लिंक कमेंट मध्ये)

कराड : माजी खासदार सौ. वंदना चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कृष्णा नदीवरील नवीन घाटाचा लोकार्पण (बातमी लिंक कमेंट ...
22/08/2026

कराड : माजी खासदार सौ. वंदना चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कृष्णा नदीवरील नवीन घाटाचा लोकार्पण (बातमी लिंक कमेंट मध्ये)

'कृष्णा’वर थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते यांना अभिवादनकराड, दि . 22 : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार...
22/08/2026

'कृष्णा’वर थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते यांना अभिवादन

कराड, दि . 22 : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) यांच्या १७ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कारखान्याचे व्हा. चेअरमन जे. डी. मोरे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी संचालक लिंबाजी पाटील, धोंडीराम जाधव, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, बाजीराव थोरात, बाळासो जगताप, अरविंद पाटील, सत्यजित पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, एम. के. कापूरकर, जयवंत शुगरचे संचालक वसंतराव पवार, दिपकनाना जाधव, संजय शेवाळे आदींसह मान्यवरांनी थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मान्यवरांनी स्व. यशवंतराव मोहिते भाऊंच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कराड : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे शहरात शिवतीर्थावर स्वागत करताना नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव व इतर
22/08/2026

कराड : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे शहरात शिवतीर्थावर स्वागत करताना नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव व इतर

कराड  : कृष्णा नदीवरील नवीन घाटाचा माजी खासदार सौ. वंदना चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण (बातमी लिंक कमेंट...
22/08/2026

कराड : कृष्णा नदीवरील नवीन घाटाचा माजी खासदार सौ. वंदना चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण
(बातमी लिंक कमेंट मध्ये)

Address

Raju Sanadi, Shaniwar Peth, Head Post Office
Karad
415110

Alerts

Be the first to know and let us send you an email when Karad Today posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Karad Today:

Shortcuts

Share