बारा गावच्या बारा भानगडी

  • Home
  • India
  • Kolhapur
  • बारा गावच्या बारा भानगडी

बारा गावच्या बारा भानगडी बारा गावच्या बारा भानगडी यामध्ये गावकऱ्यांचे स्वागत आहे...!

झुणका भाकरी...!
10/07/2025

झुणका भाकरी...!

🍲 Welcome to The Monali's Kitchen!स्वयंपाक म्हणजे केवळ जेवण बनवणं नव्हे – तो एक अनुभव आहे, एक भावना आहे.या चॅनलवर तुम्हाला मिळतील – पार...

आमचाही एक जमाना होता बालवाडी हा प्रकार नव्हता, पुढे 6 वर्षा नंतर स्वतःच शाळेत जावे लागत असे ,  सायकलने/ बसने  पाठवायची प...
29/09/2024

आमचाही एक जमाना होता
बालवाडी हा प्रकार नव्हता, पुढे 6 वर्षा नंतर स्वतःच शाळेत जावे लागत असे , सायकलने/ बसने पाठवायची पद्धत नव्हती,
मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी
भीती आमच्या आई वडिलांना कधी वाटलीच नाही.
🤪
पास / नापास हेच
आम्हाला कळत होतं...
टक्केचा आणि आमचा
संबंध कधीच नव्हता.
😛

शिकवणी लावली,
हे सांगायला लाज वाटायची....
कारण "ढ" असं
हीणवलं जायचं...

🤣🤣🤣

पुस्तकामध्ये झाडाची
पानं आणि मोरपिस ठेवून
आम्ही हुशार होऊ शकतो,
असा आमचा दृढ विश्वास
होता...

☺️☺️
कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मिती कौशल्य होतं.

😁

दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे, हा आमच्या जीवनातला
एक वार्षिक उत्सव असायचा...

🤗

वर्ष संपल्यानंतर पुस्तके विकणे आणि विकत घेण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नसे.

🤪
आई वडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजाही नव्हते.

😞

कोण्या मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याला मागच्या carrier वर बसवून,आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो
हे आता आठवतही नाही...

🥸😎

सरांचा शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरुन
उभं राहताना,कान लाल होऊन पिरगळला जाताना आमचा
'ईगो' कधीही आडवा येत नव्हता, खरं तर आम्हाला 'ईगो' काय असतो हेच माहीत नव्हतं...

🧐😝

मार खाणं, ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती. मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुष असायचे. मार खाणारा यासाठी की, 'चला, कालच्यापेक्षा तरी
आज कमी धोपटला गेलो म्हणून आणि मारणारा आज पुन्हा हात धुवून घ्यायला मिळाले म्हणून......

😜

बिनचपला ,बुटांचे कोणत्याही चेंडू आणी लाकडी बॅट ने वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर क्रिकेट खेळण्यातले काय सुख होते ते आम्हालाच माहीत होते.

😁

आम्ही पॉकेट मनी कधीच मागितला नाही, आणि वडिलांनी कधी दिला नाही. आमच्या म्हणून काही गरजाच नसायच्या. छोट्याशा असल्याच तर घरातले कोणीतरी पुर्ण करून टाकायचे. सहा महिन्यातून कुरमुरे फरसाण खायला मिळालाच तरी आम्ही बेहद खुश होतो.
दिवाळीत लवंगी फटाक्यांची लड सुटी करून एकेक फटका उडवत बसणे यात काही अपमानास्पद आम्हाला वाटायचं नाही.

😁

आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूच शकलो नाही की, आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, कारण आम्हाला ू' म्हणणं माहीतच नव्हतं...

😌

आज आम्ही असंख्य टक्के टोमणे खात, संघर्ष करत दुनियेचा एक हिस्सा झालोय. काहींना जे हवं होतं, ते त्यांनी मिळवलंय
तर काही 'काय माहीत....?'
शाळेतील ते डबल/ ट्रिपल सीट वर फिरवलेले ते मित्र,
कुठे हरवलेत ते...!

😇

आम्ही जगात कुठेही असू पण हे सत्य आहे की,
आम्ही वास्तव दुनियेत जगलो, आणि वास्तवात वाढलो........

🙃

भाकरी आणि कालवनाशिवाय मधल्या सुटीतला काही डबा असतो हे आम्हाला माहीतच नव्हतं.

आपल्या नशिबाला चुकूनही दोष न देता आम्ही आनंदाने आजही स्वप्नं पहातोय. कदाचित ते स्वप्नच आम्हाला जगायला मदत करतायत.

जे जीवन आम्ही जगलो त्याची वर्तमानाशी काहीच तुलना होणार नाही.,,,,,,,,

😌

आम्ही चांगले असू किंवा वाईट,
पण आमचाही एक #जमाना' होता.....👍🏻

#ग्रामीण

Shraddha Kamble Nagpure
Devika Cosmetic

 #पंगत ,पूर्वीच्या काळी गावामध्ये जे लग्न व्हायचे ? त्यात कुठे केटर्स वगैरे काही लावायची गरज पडत नव्हती. गावातील लोकं,बु...
04/09/2024

#पंगत ,
पूर्वीच्या काळी गावामध्ये जे लग्न व्हायचे ? त्यात कुठे केटर्स वगैरे काही लावायची गरज पडत नव्हती. गावातील लोकं,
बुंदी (नुक्ती)रात्रीच बनवून बाजावर थंड केली जायची ; पुऱ्याची पहाटे तयारी केली जायची .
मग लग्न लागलं ? की पानाच्या पत्रावळीवर पंगती बसायच्या. द्रोण पण पळसाच्याच पानाचा .
अन्न तर चला कुठलंही चांगलंच पण या पंगतीच्या जेवणात तृप्तता वेगळीच.

कोणाला कोणाला आठवते हे ?

#लग्न #ग्रामीण #जेवण #वऱ्हाड #गावकरी #सोयरे #गाव #हुंडा #ग्रामपंचात #महाराष्ट्र

'मविआ सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात घोळ घातला' असं फडणवीस सर म्हणतात त्यावेळी एकनाथ शिंदे सर आणि अजित पवार सर शेजारीच बस...
04/09/2023

'मविआ सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात घोळ घातला' असं फडणवीस सर म्हणतात त्यावेळी एकनाथ शिंदे सर आणि अजित पवार सर शेजारीच बसलेले असतात.

मावळ शेतकऱ्यांवरील हल्ल्यावरून फडणवीस सर विरोधकांवर (राष्ट्रवादीवर) सडकून टीका करतात तेव्हा अजित पवार सर शेजारीच बसलेले असतात.

नंतर अजित पवार सर म्हणतात, 'या प्रकरणात काही जण राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करताहेत.'

शेवटी शिंदे सरांना बोलायला काहीच ठेवलं नाही, जे वाक्य अनेकदा उद्धव ठाकरे सर, अजित पवार सर आणि देवेंद्र फडणवीस सर आधी अनेकदा बोलले होते त्यातलं एक वाक्य त्यांनी म्हटलं 'सरकार मराठा आरक्षणावर गंभीर आहे, प्रामाणिकपणे काम करतंय, विश्वास ठेवा'

तिकडे मनोज जरांगे पाटील मोबाईलवर या तिघांची भाषणं ऐकताहेत, त्यांच्या शेजारी इम्तियाज जलील सर भगवा गमजा गळ्यात घालून बसलेत.

अवघडय एकंदरीत...

अंतरवाली सराटी लाईव्ह...

#मराठा
#आरक्षण

भारताचं चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लॅंड. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत पहिला देश ठरला आहे...
23/08/2023

भारताचं चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लॅंड. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत पहिला देश ठरला आहे.


पहिलं प्रेम म्हणजे शाळेतलच प्रेम ❤️ #12गावच्या12भानगडी  #शाळा  #पहिलंप्रेम
13/08/2023

पहिलं प्रेम म्हणजे शाळेतलच प्रेम ❤️

#12गावच्या12भानगडी #शाळा #पहिलंप्रेम

11/08/2023

#12गावच्या12भानगडी

11/08/2023

देशात सध्या स्मार्टफोनचा वापर मनोरंजनासाठी अधिक होत आहे विद्यार्थी ही स्मार्टफोनवर अभ्यास करण्यापेक्षा टाइमप.....

 #स्त्रीशक्ती  पतीच्या पगारासाठी लढता लढता या महिलेने बेस्टच्या ९००० हजार कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व केलं आहे... 👏🔥ब...
11/08/2023

#स्त्रीशक्ती
पतीच्या पगारासाठी लढता लढता या महिलेने बेस्टच्या ९००० हजार कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व केलं आहे... 👏🔥

बेस्टचा संप म्हटलं की सर्वात पाहिलं नाव डोळ्यसमोर यायचं राव पिता पुत्रांच. आधी शरद राव आणि नंतर शशांक राव यांच्या एका हाकेवर बेस्टचे कर्मचारी संपावर जायचे...
आणि लोकलनंतर मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट बसेस ठप्प व्हायच्या. मात्र या वेळच्या बस कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व केलंय प्रज्ञा खजूरकर यांनी त्यांचे पती रघुनाथ खजूरकर हे वेट-लीज ऑपरेटर्स या कंपनी मधून बेस्ट बसचे कंत्राटी चालक आहेत. आपल्या नवऱ्याला कमी पगार मिळत तर आहेच पण इतर बेस्ट बसच्या कायम स्वरूपी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधासुद्धा मिळत नाहीयेत..
त्यामुळे वेट-लीज ऑपरेटर्स आणि बेस्टमध्ये नक्की काय करार झाला आहे हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. तेव्हा प्रज्ञा यांनी ४ जुलैला बेस्ट आणि इतर सरकारी विभागांना आरटीआय म्हणजे राईट टू इंफोर्मेशेनचा अर्ज पाठवला..
त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा प्रज्ञा खजुरकर यांनी पुन्हा बेस्टला आरटीआय चा अर्ज पाठवला पण दोन्ही वेळेला कोणाकडूनच फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर आमरण उपोषण हाच मार्ग प्रज्ञा खजुरकर आणि रघुनाथ खजुरकर या जोडप्याकडे राहिला.
हे जोडपं ३१ जुलैला थेट आझाद मैदानावर आपल्या मुलाबाळांसह पोहोचलं आणि ‘समान काम, समान वेतन’ म्हणत आमरण उपोषणाला बसलं. पहिल्या दिवशी तर ते एकटेच होते...
पण दुसऱ्या दिवशी १ ऑगस्टला घाटकोपर आगारातल्या २८० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपात भाग घेत आझाद मैदान गाठलं. त्यादिवशी या उपोषणाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर आणि इतर कर्मचाऱ्यांसोबत शेअर करण्यात आला...
त्यानंतर मात्र हा संप वाऱ्यासारखा पसरला आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच संपाच्या नवव्या दिवशी तब्बल ९००० कर्मचारी या संपात सहभागी झाले, संपाचा पुढाकार आमच्याच पैकी एका कर्मचाऱ्याच्या बायकोने घेतला होता. कोणतीही युनियन किंवा राजकीय पक्ष बाजूला नव्हता. त्यामुळे आम्हाला आमच्या हक्कासाठी लढण्यासाठी अजून बळ मिळत होतं असं आंदोलक सांगत होते.
महत्वाचं म्हणजे तब्ब्ल ७ दिवसांनी का होईना कंत्राटी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. पगारवाढ आणि बेस्टच्या बसमधून मोफत प्रवास या आणि इतर कंत्राटी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत.
जॉर्ज फर्नांडिस, शरद राव, दत्ता सामंत अशा कामगार नेत्यांमुळे मुंबई ठप्प झाल्याचा अनुभव मुंबईकरांना घेतला आहे. मात्र एका कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या नेतृत्वाखाली झालेला हा पहिलाच संप मुंबईकरांनी अनुभवला आहे.

स्त्रोत - (TW)

Address

Chatrapati Sambhajinagar
Kolhapur
431111

Alerts

Be the first to know and let us send you an email when बारा गावच्या बारा भानगडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share