07/10/2025
सागर शैला रघुनाथ यांच्या फेसबुकवरून-
गोव्यात काय सुरु आहे?
रामा कंकोणकर नावाच्या एका युवकाला गोव्यात मारहाण झाली. कारण होतं भूमिपुत्रांच्या लढ्याचं.
गोवा म्हणजे केवळ पर्यटकांचे आवडीचे ठिकाण नाही. माडांची झाडं, समुद्रकिनारे, क्लब्स आणि बार यांच्या आड एक वेगळा गोवा आहे—शेतीवर जगणारा, जमिनीशी नातं ठेवणारा, कोंकणी, आदिवासी, भंडारी, कॅथलिक आणि इतर समाजाने घडवलेला. आज त्या गोव्याच्या मातीवरच भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे.
राजधानी पणजीमध्ये सामाजिक कार्यकर्ता रामा कंकोणकरला बेदम मारहाण करण्यात आली. हा एक संदेश होता —“भूमिपुत्रांच्या हक्कासाठी बोललात तर तुमचेदेखील हेच हाल होतील.” गोव्याच्या जनतेला हा अपमान सहन झालेला नाही. रामा सध्या हॉस्पिटलमध्ये आहे, पण या निमित्ताने गोवेकरांचा रोष जागा झाला आहे.
गोव्यात उत्तरेकडून आलेले उद्योगपती, बिल्डर, बार-मालक कोट्यवधी पैसे ओतून स्थायिक झालेत. त्यांना बारचे, बांधकामाचे परमिट्स क्षणार्धात मिळतात. पण स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीसाठी न्याय मागायला कोर्टाची पायरी चढावी लागते, पैसे खर्च करावे लागतात. रोजगाराच्या नावे बाहेरचे लोक लाभ घेतात, तर स्थानिक युवक बेरोजगारीत होरपळतायत.
आज गोव्याचं चित्र हेच सांगतंय—पैशाच्या ताकदीसमोर सरकार झुकतंय, आणि आवाज उठवणाऱ्याला गुंडांचा चाबूक बसतोय.
रामा कंकोणकरवरच्या हल्ल्यानंतर सामान्य नागरिक रस्त्यावर उतरली.
“एक दो, एक दो, ... को फेक दो” अशा घोषणांनी गोव्याची राजधानी दणाणून गेली. हे आंदोलन फक्त एका तरुणासाठी नाही, तर प्रत्येक गोवेकरासाठी आहे. लोक सांगत आहेत—“आमच्या जमिनी बिल्डरच्या घशात टाकू नका. आम्हाला आमच्याच गोव्यात गुलाम करू नका.”
गृहमंत्री आज गोव्यात होते. ते गोव्यात असताना आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल होतात, कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवलं जातं. म्हणजे सरकारचं लक्ष गुंडांना रोखण्यात नाही, तर बोलणाऱ्यांना, प्रश्न विचारणाऱ्यांना आणि आपल्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना गप्प करण्यात आहे, अशीच लोकांची धारणा बनली आहे.
मुंबईत जशी मराठी माणसाला उपेक्षा सहन करावी लागते आहे, तशीच वेळ आता गोवेकरांवर ओढवली आहे. आम्ही जसं पोर्तुगीजांना घालवलं तसंच गुंडांनाही घालवणार असा विश्वास आंदोलकांना आहे.
गोवा केवळ पैशांच्या हव्यासासाठी विकला जाऊ नये. गोवा म्हणजे गोवेकरांचं घर, त्यांचा आत्मसन्मान आणि संस्कृती आहे. प्रत्येक आंदोलक हीच भावना व्यक्त करतो आहे. पणजी आणि कोलवा येथील आंदोलनात सहभागी झालो, नागरिकांशी विविध प्रश्नांवर चर्चा केली. गोव्याचे लोक जितके कोमल, मितभाषी आणि पाहुणचार करणारे आहेत तेवढेच आपल्या हक्कांसाठी जागरूकदेखील आहेत.
#लढास्वायत्तमहाराष्ट्राचा #मराठी #महाराष्ट्र #देश #राजकीय #संविधान #राष्ट्र #समाज #पत्रकार
#माझीरत्नागिरी ゚viralシviralシfypシ゚viralシalシ