28/02/2022
लातूर - आज रोजी दि 28 फेब्रुवारी रोजी मराठा समाजाच्या आरक्षण, न्याय मागणीसाठी उपोषणास बसलेले छत्रपती संभाजी महाराज यांच्या उपोषनाला लातूर शहर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षण, न्याय मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणास बसलेले छत्रपती संभाजी महाराज यांच्या उपोषणाला बसले आहेत. शासनाने यांच्या मागण्या, आरक्षणाचा तातडीने निर्णय घ्यावा. अशी मागणी लातूर शहर जिल्हा भाजपाच्या वतीने आज सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी लातूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने तात्काळ मान्य कराव्यात आणि गोर गरीब मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी लातूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे या निवेदनावर भारतीय जनता पक्षाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, संघटन सरचिटणीस मनीष बंडेवार, प्रदेश कार्यकारणी सदस्य शैलेश लाहोटी, सरचिटणीस प्रवीण सावंत,शिरीष कुलकर्णी, दिग्विजय काथवटे, अॅडवोकेट विजयकुमार अवजारे, एम एस हाश्मी ज्योतीराम चिवडे, संतोष तिवारी,गणेश गोमचाळे, गजेंद्र बोकान, काका चौगुले, देवा गडदे, गणेश गवारे यांच्या सह्या आहेत. यावेळी लातूर शहर जिल्हा कार्यकारणीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.