20/07/2025
निसर्गाची किमया...
पेरणी १५ जुन ला केली त्यानंतर काल पर्यंत म्हणजे ३५ दिवस पर्यंत पावसाचा थेंब ही नव्हता, (मध्यंतरी पान भिजवण्यापुर्ता एक दोन वेळा येऊन गेला) ओलावा कमी असल्यामुळे पेरलेले बियाणे खुपच पातळ (विरळ) उगवण झाली होती. हे सोयाबीन, तूर येईल की नाही याची शाश्वती नव्हती. परंतु काल पहाटेच्या (१९ जुलै) २०-२५ मिनीट च्या पावसाने सर्व चित्रच पालटले. बघु शकता ११ जुलै ला पिकाची काय अवस्था होती व आज २० जुलै रोजी कशी आहे, पिक हिरवगार, टवटवीत दिसत आहेत. जर निसर्गाने साथ दिली तर शेतकरयांना कुठल्याही तकलादू (तीन चाकी) सरकारकडून मदतीची (विमा) अपेक्षा नाही. सरकार कडून तर काय अपेक्षा ठेवणार जर कृषीमंत्रीच विधानभवनात जुगार खेळत असेल तर...
मराठवाड्यातील बहुतेक जिल्हात १ महिन्यापेक्षा जास्त पावसाचा खंड पडला काही कोरडवाहू शेतकऱ्यांचे पिकं वाळून गेली पण चालू अधिवेशनात या कडे संबंधित जिल्ह्यातील आमदार, मंत्री व सरकार यापैकी कुणालाही यांच्या वयक्तीक भांडणासाठी व रम्मी मधून बाहेर पडून यासाठी लक्ष वेधून प्रश्न मांडायण्यासाठी वेळच मिळाला नाही, यामुळे दिसतय की शेती व शेतकर्याबद्द्ल सरकार व विरोधक सर्वच किती उदासीन आहेत....
कोरडवाहू शेतकरी...🌱🌾🌱🌾🌱