Bharatsatta LIVE

  • Home
  • Bharatsatta LIVE

Bharatsatta LIVE News & Views

17/07/2025

अवैध सावकारीबाबत तक्रारी दाखल करण्याचे आवाहन.

लातूर : जिल्ह्यातील अवैध सावकरीविरुद्ध प्राप्त तक्रारींवर सावकारांचे निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत कार्यवाही केली जात आहे. वर्षभरात जिल्ह्यातील तालुकास्तरीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे ५५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याबाबत तातडीने कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

अवैध सावकारीविरुद्ध कोणत्याही नागरिकाची तक्रार असल्यास त्यांनी संबंधित तालुकास्तरावर सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे किंवा जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर या कार्यालयाकडे तक्रार सादर करावी. तक्रारींच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा उपनिबंधक सहकरी संस्था एस.व्ही. बदनाळे यांनी कळविले आहे.

16/07/2025

लातूरच्या पूर्व भागात अवैद्य सावकारीचा सुळसुळाट. आमदार अमित देशमुख थेट विधानभवनात बोलले.

Amit V. Deshmukh
Babasaheb Patil
Devendra Fadnavis
Latur Police Department
Dr. Shivaji Kalge - डॉ. शिवाजी काळगे

एकूर्का येथील विद्यार्थ्यांच्या लढ्याला अखेर यश जिल्हा परिषदेच्या वतीने रात्री 10 वाजता इयत्ता आठवी वर्ग मंजुरीचे दिले प...
15/07/2025

एकूर्का येथील विद्यार्थ्यांच्या लढ्याला अखेर यश जिल्हा परिषदेच्या वतीने रात्री 10 वाजता इयत्ता आठवी वर्ग मंजुरीचे दिले पत्र.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी सुरू; लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून झोन प्रमुखांच्या नियुक्त्या.लातूर ...
15/07/2025

महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी सुरू;
लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून झोन प्रमुखांच्या नियुक्त्या.
लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर पक्ष संघटन वाढिसाठी शहरातील वेगवेगळ्या झोनकरिता पक्षातील झोनप्रमुखांची नियुक्ती करीत निवडणुकीची तयारी सुरू केलीय.आगामी काळात महाराष्ट्रातील महानगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजण्याची चिन्हे असून प्रशासन प्रभाग रचना व अन्य निवडणूक पूर्व कामात व्यस्त झाले असून लातुरात काँग्रेस पक्षाकडून देखील लातूर महापालिका निवडणुकीसह जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन वाढीच्या दृष्टीने तयारी सुरू कली आहे. याचाच एक भाग म्हणून काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख,राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख तसेच लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माजी आमदार धिरज देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.किरण जाधव यांनी लातूर शहरातील काँग्रेस पक्षाचे झोन प्रमुखांची नियुक्ती केली आहे. यामध्ये लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष ॲड.फारुक शेख यांची झोन "अ" च्या प्रमुख पदी नियुक्ती केली गेली आहे या झोनमध्ये प्रभाग १,२,७,८,९ या प्रभागांचा समावेश आहे, माजी उपमहापौर कैलास कांबळे यांना झोन "ब" च्या प्रमुख पदी जबाबदारी दिली असून या झोन मध्ये प्रभाग ३,४,५,६ समाविष्ट आहेत,तर पश्चिम भागातील सामाजिक कार्यकर्ते,उद्योजक सूर्यकांत कातळे यांची झोन "क" च्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे या झोन मध्ये प्रभाग १०,११,१२,१३,१४ या प्रभागांचा समावेश असून
प्रभाग १५,१६,१७,१८ चा समावेश असलेल्या
झोन "ड" करिता झोन प्रमुख निवड लवकरच करण्यात येणार आहे अशीही माहिती देण्यात आली आहे.

15/07/2025

लातूर : एकूरगा येथील जिल्हा परिषद शाळेला आठवीची मान्यता द्या,मुख्य कार्यकारी अधिकारीच्या दालनात भरली शाळा.

Dadaji Bhuse - दादाजी भुसे
Shivendrasinh Bhonsle
Dr. Shivaji Kalge - डॉ. शिवाजी काळगे

14/07/2025

रात्री अकरानंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेवरून पोलीस रस्त्यावर.
शहरातील महत्त्वाच्याव इतर संवेदनशील भागात आत्ता विशेष गस्त मोहीम हाती घेण्यात आली आहे. रात्री अकरानंतर विनाकारण फिरत असलेले टोळके, टवाळकी करत फिरणारे तरुण, दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना पोलीस ठाण्यात नेऊन कारवाई करण्यात येत आहे.पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी पदभार घेताच लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हेगारी संदर्भात विविध उपायोजना राबवीत आहेत. त्या अनुषंगाने दिनांक 13 जुलै रोजी रात्री पोलीस अधीक्षक अमोल तांबे ,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे सूचना व मार्गदर्शनात रात्री अकरानंतर विनाकारण रस्त्यावर रेंगाळणाऱ्या टवाळखोरावर कार्यवाही करण्यात आली आहे. त्यांना सूचना घेऊन रस्त्यावरून हाकलून देण्यात आले आहे. यामध्ये शहरातील सर्व पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांचेमार्फत ही संयुक्त मोहीम यापुढे राबविण्यात येणार आहे.रात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असून,दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. या शिवाय चारचाकी वाहनांत रात्री बेकायेदशीर वाहतूक होते का? याचाही तपास सुरू करण्यात येत आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी शांतता असावी विनाकारण फिरणाऱ्यावर नियंत्रण ठेवता यावे. गुन्हेगारांची धरपकड करून वेळीच गुन्ह्यांना पायबंध घालने, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी, या उद्देशाने ही कारवाई सुरू करण्यात आली रात्री अकरा नंतर रस्त्यावर रेंगळणाऱ्यांची कसून तपासणी करण्यात येणार असून ट्रिपल सीट फिरणाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी होत आहे. लातूर पोलिसाकडून सर्व आस्थापनाधारकांना आवाहन करण्यात येत की, गैरसोय टाळण्यासाठी आपण निर्धारित वेळेतच आस्थापना चालू व बंद करावे.विनाकारण रात्री उशिरापर्यंत आस्थापना चालू ठेवू नये.पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.

14/07/2025

लातूरसह राज्यातील अनेक औद्योगिक वसाहती आता महानगरपालिकेच्या हद्दीत आल्या आहेत, त्याठिकाणी कर कोणी गोळा करायचा आणि भौतिक सुविधा कोणी उभारायच्या याबाबतचे प्रश्न निर्माण झाले आहेत. सदरील बाब लक्षात घेऊन एमआयडीसी आणि महापालिका यांच्यात एक वाक्यता आणण्यासाठी मानक कार्यप्रणाली अस्तित्वात आणावी आमदार अमित देशमुख यांची विधानसभेत मागणी

प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध :महाराष्ट्र अंनिसपुरोगामी चळवळीचे अभ्यासू कार्यकर्ते आणि संभाजी ब्रिगेड...
14/07/2025

प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध :महाराष्ट्र अंनिस
पुरोगामी चळवळीचे अभ्यासू कार्यकर्ते आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड
यांना अक्कलकोट येथे शिवधर्म फाऊंडेशन या सनातनी प्रवृत्तीच्या संघटनेच्या लोकांकडून शाई
फासत धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तीव्र निषेध करीत
आहे आणि या प्रकरणी तत्काळ चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शासन करण्याची मागणी करीत
आहे.
सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्य वेचणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे
यांच्या हत्येमागचे सूत्रधार पकडण्यात यंत्रणांना अजूनही यश आलेले नसल्याने या प्रवृत्तींना
कायद्याचे भय वाटेनासे झाले आहे. म्हणूनच पुरोगामी चळवळीतील कार्यकत्यावर ते असे उघडपणे
हल्ले करण्यास धजावत आहेत है गायकवाड यांच्यावर झालेल्या हललयावरून दिसून येते. या
हल्लूयासाठी हल्लेखोरांनी दिलेले कारण अत्यंत तकलादू असून कायद्याच्या राज्यात कोणत्याही
कारणाने असा हुल्ला करणे हे निषेधाहच ठरते.
अत्यंत खेदाची बाब म्हणजे जनसुरक्षा विधेयक विधिमंडळात मंजूर होऊन तीन दिवसही
उलटले नाहीत तोच गायकवाड यांच्यावर हुल्ला झालेला आहे. या हल्लरयामार्फत सनातनी प्रवृत्तीने
पुन्हा एकदा हा संदेश दिला आहे की, ते या नवीन कायद्याला देखील जुमानत नाहीत. हे संत,
सुधारकांचा वारसा सांगणार्या महाराष्टराला भूषणावह नाही. तरी, प्रवीण गायकवाड याच्यावर हल्ला
करणा्या हुहल्लेखोरांना तत्काळ अटक करून हुल्ल्यामागील सूत्रधारांचा शोध घेउऊन यांच्या विरुद्ध
कसलाही पक्षपात न करता कठोर कायदेशीर कारवाई करून कायद्यासमोर सर्व समान आहेत है
त्यांना आणि जगाला दाखबून द्यावे असे आवाहन महाराष्ट्र अंनिस करीत आहे.
अशी माहिती अंनिस कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी दिली आहे

14/07/2025

सहकारी मंत्री बाबासाहेब पाटील,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांच्या उपस्थितीत लातूर महोत्सवाचे उद्घाटन
लातूर - लातूर शहरातील राजीव गांधी चौक बिडवे मैदान येथे उभारण्यात आलेल्या लातूर महोत्सवाचे उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांच्या उपस्थितीमध्ये फीत कापून करण्यात आले.
लहान मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या महोत्सवामध्ये राहत पाळणे,टोरा-टोरा ,ब्रेक डान्स,जहाज ट्रेन, तसेच मनोरंजनाची साधने उपलब्ध करण्यात आली आहेत. या उद्घाटन प्रसंगी प्रशांत पाटील,नवनाथ अल्टे,लाला सुरवसे, मयूर जाधव,प्रवीण सिंह थोरात, कैलास कांबळे, सुरज सुरवसे, अमन सुरवसे ,राजकिरण सूर्यवंशी, सोहम गायकवाड, रवी राऊत, रवी पाटील, मगर विक्की ,विजय कांबळे, अब्दुल शेख, तुषार मांदळे, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

14/07/2025

आमचा विरोध विकासाला नाही तर स्टंटबाजीला आहे. अजित पाटील कव्हेकर.

14/07/2025

काँग्रेसचा आवाज दाबण्याची हिंमत कुणात नाही, आजही आम्हीच सत्तेत आहोत असं वाटतय. भाजपच्या निषेध आंदोलनावर अमित देशमुख यांची प्रतिक्रिया.
Amit V. Deshmukh

13/07/2025

लातूर : काँग्रेसकडून विकास कामांचे भुमिपुजन भाजपकडून विरोध.भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने- सामने.
Amit V. Deshmukh
Chh.ShivendraRaje Bhonsle
Ajeet Patil Kavhekar

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharatsatta LIVE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bharatsatta LIVE:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share