25/09/2025
आस्मानी संकट कोसळून गेले सर्वकाही वाहून...
#मानवतेचा_परिचय_देत_मदतीचे_महापूर_वाहू_द्या...
दीड लाखाचा आयफोन हप्त्यावर घेता येतो पण शेतकऱ्याला एखादी दीड लाखाची महीस हप्त्यावर घ्यायची म्हटली तर ती मिळत नाही, त्यासाठी रोख रक्कम मोजावी लागते आणि त्याच्यात ती धमकही असते ती केवळ या शेती आणि मातीच्या जोरावर..मात्र आता अतिवृष्टीने शेतातील मातीच वाहून गेली आहे..पीकं धारातीर्थी पडली आहेत..शेकडो जनावरे वाहून गेली..शेतातील शेड आणि घरं वाहून गेली, मोडून पडली..
शेतात साधं एक शेड उभं करायचं म्हटलं तर लाखभर रुपये लागतात..शेतकरी सोडून बाकी सर्वांना त्यांनी केलेल्या कामाचा, दिलेल्या सर्व्हिसेसचा खर्च वजा जाता नफा किती ठेवून घ्यायचा याचा पूर्ण अधिकार असतो...
शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नावर सगळी लोकं जगतात. शेतकऱ्यांच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून मोठ मोठे उद्योगधंदे उभे राहतात..आता आस्मानी संकटामुळे जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा शेतकरी बांधव अडचणीत आहे..
हे सगळे आता शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येतील का?
काही संवेदनशील लोक सोडले तर बाकी गेंड्याच्या कातडीसारखे निगरगट्ट होत चालले आहेत हे आपण आजुबाजूला बघतोय..बघायचं आणि सोडून द्यायचं..आणि थोडं त्याही पुढे जाऊन अरे रे खूप नुकसान झालं, असं व्हायला नको होतं म्हणायचं.. असेही लोक आपल्याकडे काही कमी नाहीत..असो..
काहीजण आणखीही नवीन आयफोन घेण्यासाठी स्टोअर समोर गर्दी करतील, GST कमी झाला आहे म्हणून गाड्या व वस्तू खरेदीच्या तयारीत असतील..तर काही Amazon आणि flipkart वर काहीतरी स्वस्तात मिळेल याची वाट बघत असतील तर काहीजण फॉरीन ट्रिप प्लॅन करण्यात व्यस्त असतील..
माती वाहून गेलेल्या एकरभर रानात माती टाकायला किती पैसे लागतात हे माहितीये का? नसेल तर माहीत करून घ्या त्यासाठी किमान चार पाच लाख रुपये लागतात..एवढी मदत शेतकऱ्याला कोणी करणार का? हा मोठा प्रश्न आहे..
तरी थेंबे थेंबे तळे साचे असे म्हणतात...त्यामुळे #मराठवाड्यासाठी सुरू असलेल्या मदत कार्यात
शक्य त्या सर्व प्रकारे आपण सहभागी होऊया...
साभार - Shivkumar Channagire