
17/09/2025
*17 सप्टेंबर- मराठवाडा मुक्ती दिन*
हैदराबाद मुक्ती संग्राम
हैदराबाद मुक्ती संग्राम हा भारताच्या स्वातंत्र्यानंतर झालेला एक महत्त्वाचा लढा होता.
हैदराबाद संस्थानावर निजामाचे राज्य होते आणि तो भारतात विलीन होण्यास तयार नव्हता. भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले पण मराठवाडा म्हणजेच हैदराबाद संस्थान मात्र निजामाच्या ताब्यातच होते.
रझाकार नावाची मुस्लिम संघटना यांनी प्रचंड त्रास दिला. निजामाने स्वतःला स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला आणि भारत सरकारशी तणाव वाढला.
भारत सरकारने “पोलीस अॅक्शन” नावाने लष्करी मोहिम सुरू केली. या मोहिमेचे नेतृत्व भारतीय सैन्याने केले आणि काही दिवसांत हैदराबाद जिंकले.
या मुक्ती संग्रामामुळे हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. सामान्य नागरिकांनी या संघर्षात मोठ्या धैर्याने भाग घेतला.
अनेक ठिकाणी निजामच्या सैन्याविरुद्ध लोकांनी प्रतिकार केला. मुक्ती संग्रामामुळे लोकशाही व्यवस्था आणि विकासाचा मार्ग मोकळा झाला. आजही हैदराबाद मुक्ती संग्रामाला भारताच्या एकात्मतेसाठी लढलेल्या लोकांचे योगदान म्हणून स्मरण केले जाते.
1) हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम
लेखक - श्री वसंत पोतदार
किंमत- 150=00
2) मराठवाडा मुक्ती संग्राम आणि हैदराबाद संस्थान
लेखक - प्रा. डाॅ. चंद्रशेखर लोखंडे
किंमत- 250=00
संपर्क- 9284292473