RB Highschool & Jr. College, Latur.

RB Highschool & Jr. College, Latur. About Education.

आज दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी, रुकय्या बेगम प्राथमिक, मा व उच्च मा विद्यालय, लातूर येथे असाक्षर यांची *उल्हास ( ULLAS ...
21/09/2025

आज दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी, रुकय्या बेगम प्राथमिक, मा व उच्च मा विद्यालय, लातूर येथे असाक्षर यांची *उल्हास ( ULLAS ) नव भारत साक्षरता अभियान अंतर्गत, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी* घेण्यात आली. या वेळी ७ असाक्षर उपस्थित होते.

चाचणी चालू असताना *नोडल अधिकारी मा.श्री. जाफरी एस. एन.सर* यांनी सदिच्छा भेट दिली व परीक्षेची पाहणी केली. या वेळी माध्यमिक शाळेचे प्राचार्य श्री कसेरी वाय एम सर, प्राथमिक चे मुख्याध्यापक श्री शेख वाय एम सर, आज च्या परीक्षेचे केंद्रसंचालक श्री शेख एस एम सर, पर्यवेक्षिका श्रीमती शेख एन ए, श्रीमती बागवान आर ओ, श्रीमती सय्यद एन ए, व श्रीमती गांजुरे आर एन मॅडम उपस्थित होते.

 #स्वामीविवेकानंद #युवाप्रेरणा #जगाचा_प्रेरणास्त्रोत #आत्मशक्ती #उठा_जागे_व्हा
21/09/2025

#स्वामीविवेकानंद #युवाप्रेरणा
#जगाचा_प्रेरणास्त्रोत #आत्मशक्ती
#उठा_जागे_व्हा

19/09/2025

✨ मनोगत ✨

रुकय्या बेगम प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लातूर या विद्यालयाची माजी विद्यार्थिनी तसेच माजी नगरसेविका सौ. तांबोळी इर्शाद बेगम यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

त्यांनी सांगितले की –
"या शाळेने मला शिक्षणाबरोबरच मूल्ये, संस्कार आणि समाजसेवेची जाणीव दिली. आज मी ज्या ठिकाणी आहे, त्यामध्ये या शाळेचा आणि इथल्या आदरणीय शिक्षकवर्गाचा सिंहाचा वाटा आहे. विद्यार्थीदशेत मिळालेले शिक्षण व मार्गदर्शन यामुळेच मला समाजकारणात उतरून लोकांची सेवा करण्याची प्रेरणा मिळाली. या शाळेने नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षण देत समाजातील असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन उज्ज्वल केले आहे. आजही या शाळेत आल्यावर जुने दिवस आठवतात आणि हृदय भरून येते."

त्यांच्या या मनोगतामुळे उपस्थित सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी भारावून गेले.


🇮🇳✨ मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस ✨🇮🇳नॅशनल एज्युकेशन सोसायटी अंतर्गतरुकय्या बेगम प्रा. मा. व उ. मा. विद्यालय, लातूर येथे आ...
17/09/2025

🇮🇳✨ मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस ✨🇮🇳
नॅशनल एज्युकेशन सोसायटी अंतर्गत
रुकय्या बेगम प्रा. मा. व उ. मा. विद्यालय, लातूर येथे आज, 17 सप्टेंबर 2025 रोजी अभिमानाने साजरा करण्यात आला ! 🇮🇳

ध्वजारोहणाचा मान मुख्याध्यापक *श्री. शेख वाय. एम.* यांच्या शुभहस्ते पार पडला.

या प्रसंगी सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी देशभक्तीच्या उत्साहात सहभागी झाले. ❤️
#मराठवाडा_मुक्तीसंग्राम_दिवस
#मराठवाड्याचा_अभिमान #स्वातंत्र्याचा_संघर्ष
#वीरांना_वंदन #देशभक्तीचा_उत्सव

  👁️      #  🤔
16/09/2025

👁️


# 🤔



🌟🇮🇳 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन २०२५ 🇮🇳🌟मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या हुतात्म्यांच्या शौर्यगाथेचा अभिमानाचा द...
15/09/2025

🌟🇮🇳 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन २०२५ 🇮🇳🌟

मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या हुतात्म्यांच्या शौर्यगाथेचा अभिमानाचा दिवस म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिन! ✨

या पावन दिनानिमित्ताने
📍 रुकय्या बेगम प्रा., मा. व ज्युनिअर कॉलेज, लेबर कॉलनी, लातूर
येथे दिनांक १७ सप्टेंबर २०२५, सकाळी ७:५५ वा.

🎉 राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभ
🌺 प्रा. शेख वाय. एम. (मुख्याध्यापक) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

या ऐतिहासिक प्रसंगी आपल्या उपस्थितीने सोहळ्याला अधिक उजाळा द्या आणि हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करा 🙏

#मराठवाडा_मुक्तीसंघर्ष #स्वातंत्र्याची_गाथा #ध्वजारोहण२०२५ #रुकय्या_बेगम_शाळा #लातूर

✨📚 अभिमानाचा क्षण :- निष्ठा, कष्ट व उल्लेखनीय कार्याची खरी पावती असणारा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान✨नॅशनल एजुकेशन सोसाय...
15/09/2025

✨📚 अभिमानाचा क्षण :- निष्ठा, कष्ट व उल्लेखनीय कार्याची खरी पावती असणारा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान✨

नॅशनल एजुकेशन सोसायटी अंतर्गत, रुकय्या बेगम प्राथमिक शाळा, लातूर येथील ज्येष्ठ शिक्षिका सौ. सय्यद नाहिद अमिनोद्दीन यांना "आदर्श शिक्षिका" हा मानाचा पुरस्कार महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेकडून मराठवाडा शिक्षक विभाग मतदारसंघाचे आमदार मा. श्री. विक्रम काळे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 🙏🎉

या गौरवशाली क्षणी संस्था सचिव मा. डॉ. अफसर शेख साहेब, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ग्रामिणचे जिल्हाध्यक्ष्य मा श्री सुलेमान अफसर शेख साहेब, तसेच मुख्याध्यापक शेख युसूफ सर, उच्च माध्यमिकचे प्राचार्य श्री. केसरी वाय.एम. सर यांनीही हार्दिक अभिनंदन करून आनंद द्विगुणित केला. 🌹👏
#आदर्शशिक्षिका #अभिमानाचाक्षण

“रूकय्या बेगम हायस्कूल, लातूर की ओर से हिन्दी दिवस की हार्दिक शुभकामनाएँ।हिन्दी हमारी आत्मा है, हमारी पहचान है। आओ मिलकर...
14/09/2025

“रूकय्या बेगम हायस्कूल, लातूर की ओर से हिन्दी दिवस की हार्दिक शुभकामनाएँ।
हिन्दी हमारी आत्मा है, हमारी पहचान है। आओ मिलकर इसे और गौरवशाली बनाएँ और आने वाली पीढ़ियों को इसका महत्व सिखाएँ। हिन्दी बोले, हिन्दी जिएँ – यही हमारी सच्ची संस्कृति है।”

रुकया बेगम प्राथमिक शाळा, लातूर येथील ज्येष्ठ शिक्षिका सौ. सय्यद नाहिद अमिनोद्दीन यांना "आदर्श शिक्षिका" (महाराष्ट्र राज...
10/09/2025

रुकया बेगम प्राथमिक शाळा, लातूर येथील ज्येष्ठ शिक्षिका सौ. सय्यद नाहिद अमिनोद्दीन यांना "आदर्श शिक्षिका" (महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना) हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या गौरवशाली प्रसंगी त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
#आदर्शशिक्षिका 🏅 #शिक्षकगौरव ✨
#शिक्षणप्रेरणा 📚 #लातूरगौरव 🌸

आज रुकय्या बेगम मा व उच्च मा विद्यालय, लातूर येथे नागरी आरोग्य केंद्र अंतर्गत शाळेच्या ७ वी ते १२ वी वर्गाच्या मुलींसाठी...
09/09/2025

आज रुकय्या बेगम मा व उच्च मा विद्यालय, लातूर येथे नागरी आरोग्य केंद्र अंतर्गत शाळेच्या ७ वी ते १२ वी वर्गाच्या मुलींसाठी *Menstrul Hygiene Camp (“मासिक पाळी स्वच्छता शिबिर”)* आयोजित करण्यात आले होते.
आजच्या या शिबिरामध्ये योग्य माहिती, मार्गदर्शन आणि आरोग्यविषयक सल्ला देताना डॉ म्हणाले, *“लाज नाही, जागरूकता हवी”* हा संदेश आपण सगळीकडे पोहोचवू या.
कारण स्वस्थ स्त्री म्हणजे स्वस्थ समाज आणि स्वस्थ समाज म्हणजे स्वस्थ राष्ट्र.
मासिक पाळी ही स्त्रीच्या जीवनातील एक नैसर्गिक व जैविक प्रक्रिया आहे. परंतु समाजात अजूनही या विषयाबाबत अनेक गैरसमज, भीती आणि लाज असल्यामुळे यावर उघडपणे बोलले जात नाही. पण खरी गरज आहे ती या विषयावर जाणीव व जागरूकता निर्माण करण्याची.

या प्रसंगी माहिती देण्यासाठी मेडिकल ऑफिसर डॉ. शाम शितोळे सर, PNM चिकाटे मॅडम, MPW जाधव सर, साळुंके मॅडम, lab technician धानूरकर सर, व आशा वर्कर्स् ई. अधिकारी वर्ग शाळेचे मुख्याध्यापक श्री कसेरी वाय एम सर, महिला शिक्षिका श्रीमती नाझेमा मॅडम, श्रीमती सादिया मॅडम, श्रीमती सलमा मॅडम, श्रीमती सफिया मॅडम उपस्थित होते.

कैंप च्या शेवटी विद्यार्थिनींनी डॉ. व त्यांच्या टीमशी मोकळ्या मनाने संवाद साधून चर्चा केली व हा कैंप यशस्वी ठरला.

#स्वच्छता_शिबिर #स्वच्छतेने_आरोग्य

Address

Anjali Nagar
Latur
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when RB Highschool & Jr. College, Latur. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share