NavNath Kute Page

NavNath Kute Page Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from NavNath Kute Page, Digital creator, Lonar Sarovar, Lonar.

10/12/2025

महाविस्तार Ai ॲप बद्दल

10/12/2025

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानभवनात आवाज उठविला..

10/12/2025

📍लोकसभा, नवी दिल्ली

आज संसदेच्या हिवाळी #अधिवेशन दरम्यान #लोकसभा येथे महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान #विश्वविद्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयामध्ये जवळपास 60% पेक्षा अधिक #प्राध्यापक, #कर्मचारी यांचे पदे खाली असल्याची गंभीर बाब #केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली.

या महाविद्यालयातील खाली पदे व सातत्याने होत असलेल्या निवृत्तीचा परिणाम #पशु #वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या #कुशल #मनुष्यबळ निर्मितीवर पडत असल्याचे #उदगीर येथील पशु वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाहिल्यावर लक्षात येत असून हिच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. हा विषय फक्त #शैक्षणिक नसून याचा दूरगामी विपरीत परिणाम ग्रामीण अर्थ व्यवस्थेवर होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडू शकते. त्यामुळे या प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देऊन महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विश्वविद्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील 100% #पद #भरती प्रक्रिया सुरु करावी. अशी #मागणी केंद्रीय पशुपालन व दुग्धविकासमंत्री यांच्याकडे केली.

10/12/2025

#संसदीय_हिवाळी अधिवेशनात मराठवाड्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची #मागणी लोकसभेत केली.

आज संसदीय हिवाळी अधिवेशनात मराठवाड्यातील विशेषतः #लातूर, #नांदेड, #हिंगोली, #धाराशिव, #बीड, #जालना, #छत्रपती_संभाजीनगर, #परभणी या जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने तात्काळ विशेष #पॅकेज च्या माध्यमातून मदत करावी अशी मागणी #लोकसभा येथे बोलताना केली.

मराठवाड्यात मागील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात झाले असून #महाराष्ट्र शासन नियमावर बोट ठेवत आहे. #नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी #केंद्र_सरकार ने तात्काळ विशेष पॅकेज देऊन महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून पुराच्या पाण्यात वाहून गेलेली शेतीतील उपयुक्त माती टाकण्यासाठी #विशेष_मोहीम राबविणे अत्यंत गरजेचे असल्याचे केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले.

10/12/2025

शिक्षकांना निवडणूकीचे कामकाज कशाला देता? असे विचारणाऱ्या शिक्षकांसाठी निवडणूकीत सहभागी असलेल्या सरकारी नोकरांची यादी विभागनिहाय देतोय.

भारतात निवडणुकीचे कामकाज (Election Duty) हे विविध स्तरांवरील सरकारी कर्मचारी मिळून पार पाडतात. भारताची निवडणूक प्रक्रिया अत्यंत मोठी असल्यामुळे केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनातील जवळपास सर्व प्रकारचे सरकारी कर्मचारी यात सामील होतात.

खाली निवडणुकीच्या कामकाजात सामील होणाऱ्या सरकारी नोकरांची सविस्तर यादी दिली आहे:

🏛 १. प्रशासकीय सेवांचे अधिकारी

जिल्हाधिकारी / कलेक्टर (District Election Officer म्हणून)

उपजिल्हाधिकारी / SDM (Returning Officer/Assistant Returning Officer)

तहसीलदार / नायब तहसीलदार

IAS, State Civil Service Officers (Election Management)

---

👮 २. कायदा व सुव्यवस्था राखणारे अधिकारी

पोलीस अधीक्षक (SP) / DySP / ACP

पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल

राज्य राखीव पोलिस (SRPF)

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) – CRPF, BSF, ITBP, CISF, SSB

Home Guards, ग्रॅम सुरक्षा दल

---

🏫 ३. शिक्षण विभागातील कर्मचारी

शासकीय शिक्षक (Polling Officer,BLO, Presiding Officer)

महाविद्यालयीन प्राध्यापक

शिक्षण विभागातील लिपिक व इतर कर्मचारी

---

🗂 ४. महसूल / सामान्य प्रशासन विभाग

तलाठी, मंडळ अधिकारी

लिपिक, वरिष्ठ लिपिक

कार्यालयीन कर्मचारी (clerks, assistants)

---

🚑 ५. आरोग्य विभाग

वैद्यकीय अधिकारी

नर्सिंग स्टाफ

आपत्कालीन वैद्यकीय तुकड्या / ऍम्बुलन्स स्टाफ

---

🚌 ६. वाहतूक विभाग व इतर सहायक कर्मचारी

बस चालक (MSRTC, राज्य परिवहन)

वाहक (conductors)

वाहन दुरुस्ती तांत्रिक कर्मचारी

---

🧾 ७. न्याय विभागातील कर्मचारी (मर्यादित स्वरूपात)

दंडाधिकारी (Magistrates on election duty — सेक्शन 144 अंमलबजावणी)

Law officers (coordination for MCC/complaints)

---

🧑‍💻 ८. आयटी आणि तांत्रिक कर्मचारी

NIC अधिकारी

EVM/VVPAT तांत्रिक सहाय्यक

डेटा एन्ट्री ऑपरेटर्स (DEO)

---

🧹 ९. नगरपालिका / ग्रामपंचायत कर्मचारी

सफाई कर्मचारी (Polling station setup)

ग्रामसेवक / पंचायत सचिव

स्थानिक स्वराज्य संस्थांचे अभियांत्रिकी/कार्यालयीन कर्मचारी

---

📦 १०. इतर विभाग

पोस्ट ऑफिस कर्मचारी (Postal ballots)

सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) — बूथची यंत्रसामग्री, रॅम्प्स, लायटिंग

वीज विभाग — सतत वीजपुरवठा

पाणीपुरवठा विभाग

आपत्ती व्यवस्थापन दल

---

✅ सारांश

भारतामध्ये निवडणुकीचे कामकाज हे "All hands on deck" मॉडेलप्रमाणे चालते.

10/12/2025

#विधानसभाप्रश्नोत्तर
इतर मागास प्रवर्गाच्या ( #ओबीसी) विद्यार्थ्यांसाठी राज्यात ६५ नवी #वसतिगृहे सुरू करण्याचे काम इतर मागास बहुजन कल्याण विभागाने पूर्ण केले असून या उपक्रमाचे श्रेय मंत्री अतुल सावे यांना दिले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य मनिषा चौधरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या वसतीगृहासंदर्भात आपण दहा-बारा वर्षे चर्चा करत होतो, परंतु प्रश्न काही पुढे जात नव्हता. मंत्री अतुल सावे यांना हा विभाग मिळाल्यानंतर मी त्यांना विनंती केली की प्रत्येक वसतिगृहासाठी जागा शोधा आणि त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या केल्याचा आनंद असून आज ६५ वसतीगृह सुरू झाली आहेत. भाड्याच्या इमारतीत वसतीगृहे न चालवता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जागा असावी, या उद्दिष्टाने जागा शोधण्याचे काम सुरू ठेवण्यात आले असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जागा निश्चित झाल्या आहेत.

इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री. सावे म्हणाले की, सर्व आयुक्त व जिल्हाधिकारी यांना सहा महिन्यांत संपूर्ण अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. डेअरी विभागाकडे पडून असलेल्या जागाही वापरात आणून जवळपास १० ठिकाणी अतिरिक्त जमीन उपलब्ध करण्यात आली आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ‘आधार’ व ‘स्वंयम’ या दोन योजनांद्वारे प्रत्येक जिल्ह्यात ६०० + ६०० असे १२०० विद्यार्थी लाभार्थी आहेत. विद्यार्थ्यांना ३८,००० ते ६०,००० रुपये पर्यंत आर्थिक साहाय्य थेट डीबीटीद्वारे दिले जात आहे. आरे डेअरी परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील झोन असल्याने तिथे वसतिगृह उभारण्यास सध्या परवानगी मिळू शकत नाही. परंतु विशेष प्रकरणातून परवानगी मिळाली तर पर्याय पुन्हा तपासण्यात येईल. सर्व मुलींच्या वसतिगृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून तपासणी यंत्रणा कार्यरत आहे. फ्लाईंग स्क्वॉड नियुक्त करण्याच्या निर्णयाची प्रक्रियाही सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
#हिवाळीअधिवेशन


#हिवाळी_अधिवेशन_नागपूर

10/12/2025

#विधानसभाप्रश्नोत्तर
गुटखा विक्री करणाऱ्यांवर #मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधि व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता;कायद्यातील तरतुदींनुसार “हार्म आणि हर्ट” या दोन्ही घटकांअभावी तो लागू होत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल करण्यात येऊन गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही मकोका लागू करता येईल, अशा आवश्यक दुरुस्त्या कायद्यात करण्यात येऊन हा कायदा अधिक कठोर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

राज्यात #गुटखाबंदी आहे. गुटखा विक्री व वहन संदर्भात राज्यभरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असून विविध जिल्ह्यांमध्ये एकूण शेकडो गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शाळा किंवा महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात गुटखा विक्रीचे प्रकार आढळल्यास त्या परिसरातील टपऱ्या किंवा दुकानांवर संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. त्याचबरोबर ही कारवाई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयाने केली जाणार आहे. तसेच ड्रग्जच्या आहारी गेलेल्या व्यक्तींसाठी पुनर्वसन केंद्रांची आवश्यकता आहे. मुंबई महानगरमध्ये दर्जेदार पुनर्वसन केंद्रांची कमतरता असून शासन यासंदर्भात आवश्यक पुढाकार घेणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
#हिवाळीअधिवेशन


#हिवाळी_अधिवेशन_नागपूर

10/12/2025

#विधानसभाप्रश्नोत्तर
#सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणी चौकशीसाठी निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

10/12/2025

#विधानसभाप्रश्नोत्तर
राज्यात संजय गांधी निराधार योजनेचा निधी रोखला नाही. या योजनेचा निधी डीबीटीद्वारे देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
#हिवाळीअधिवेशन


#हिवाळी_अधिवेशन_नागपूर

10/12/2025

#विधानसभाप्रश्नोत्तर
केंद्र सरकारच्या नवीन तीन कायद्यामध्ये #शक्ती कायद्यातील अनेक तरतुदींचा समावेश आहे. काही तरतुदी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करतात. या सर्व गोष्टीचा अभ्यास करून ज्या तरतुदी करावयाच्या आहेत या विषयी काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
#हिवाळीअधिवेशन


#हिवाळी_अधिवेशन_नागपूर

10/12/2025

#विधानसभाप्रश्नोत्तर
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( #सीएसएमटी) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. लोकसभेतील एका लेखी उत्तरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या प्रस्तावाला नकार दर्शविल्याचा उल्लेख काही सदस्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे उत्तर जुना आराखडा लक्षात घेऊन लोकसभेत देण्यात आल्याचे स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक हे आपले अभिमानाचे स्थान आहे. याठिकाणी पुतळा उभारण्याची मागणी पूर्वीही करण्यात आली होती. त्यावेळी या संदर्भातील आराखडा तयार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र अलीकडे लोकसभेत आलेले उत्तर हे जुन्या आराखड्याशी संबंधित असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

नवीन आराखड्यात #छत्रपती_शिवाजी_महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव असून त्याच्या अंतिम मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. नवीन आराखडा मंजूर झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर अत्यंत भव्य असा पुतळा उभारला जाणार आहे. लोकसभेत आलेले उत्तर हे केवळ जुन्या आराखड्यावर आधारित असल्याने गैरसमज निर्माण झाला असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
#हिवाळीअधिवेशन


#हिवाळी_अधिवेशन_नागपूर

 #विधानपरिषदलक्षवेधीमुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मंडई (मासळी मंडई) इमारतीचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले आहे. ही इमा...
10/12/2025

#विधानपरिषदलक्षवेधी
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मंडई (मासळी मंडई) इमारतीचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले आहे. ही इमारत धोकादायक ठरविण्यात आल्याने रिक्त करुन निष्कासित करण्यात आली. सध्या महात्मा ज्योतिबा फुले मंडईच्या पूर्ण झालेल्या इमारतीमध्ये मासळी परवानाधारकांचे पुनर्वसन करण्यात येत असून तेथे त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

#हिवाळीअधिवेशन

#हिवाळी_अधिवेशन_नागपूर

Address

Lonar Sarovar
Lonar
443302

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NavNath Kute Page posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share