22/07/2022
#निब्बाण_न्युज_मिडिया
आवाहन
जयभीम!
निब्बाण न्युज मिडिया प्रा. लि. ही कंपनी माध्यम क्षेत्रात पदार्पण करीत आहे. लवकरच मराठी दैनिक प्रकाशित करण्यासाठी नियोजन सुरु आहे.
आंबेडकरी चळवळ ही एक अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे. बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकिय अशा अनेक अंगांनी प्रवाही असणारी अशी ही चळवळ आहे.
डाॅ बाबासाहेब आ़बेडकर यांनी या देशाच्या व्यवस्थेची चिरफाड करुन तीचे निदान केले आहे. हा देश आणि देशातील व्यक्ती व समाज ब्राम्हणी धर्म संस्कृतीने गांजलेला आहे. ही एक शोषण व्यवस्था आहे. जाती व्यवस्था हे इथल्या समाज रचनेचे व्यवच्छेदक लक्षण आहे. अस्पृश्यता हा या ब्राम्हणी धर्म संस्कृतीचा अमानुष असा परिपाक आहे. या व्यवस्थेने इथल्या कोट्यवधी लोकांना न्याय, स्वातत्र्य, समता व बंधुता नाकारली आहे; मुलभूत हक्क नाकारले आहेत. धर्म, जात, वंश, पंथ, प्रांत, भाषा, लिंग अशा अनेक मुद्दयांवरुन माणसामाणसात भेदाभेद निर्मिले आहेत. त्यामुळे या देशाच्या एकता व एकात्मतेला नेहमीच धोका निर्माण झालेला आहे!
या सर्व समस्यांची सर्वांगाने चिकित्सा करुन त्या समस्यांचा बिमोड करुन एका नव राष्ट्राच्या निर्मिती साठीचे परिपूर्ण असे क्रांती रसायन बाबासाहेबांनी दिलेले आहे. या क्रांती रसायनाचे शिक्षण, प्रशिक्षण व उपयोजन करणे आज अत्यावश्यक झाले आहे. हे एक मिशन आहे. त्यासाठी समर्पित नेतृत्व, कार्यकर्ते व अनुयायांची फौज उभी करणे व या देशाला डाॅ बाबासाहेब आंबेडकर प्रणित न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या पायावर नव राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी या देशातील कोट्यवधी लोकांचे संचलन करणे हा मध्मम मार्ग आहे.
राष्ट्र निर्माणासाठी बाबासाहेबांनी स्टेट ॲण्ड मायनाॅरिटिज, भारतीय संविधान, सांसदिय लोकशाही, लोकशाहीच्या यशस्वितेसाठीच्या पुर्व अटी, रिपब्लिकन विचारधारा, बुद्ध आणि त्यांचा धम्म, बावीस प्रतिज्ञा असे परिपूर्ण क्रांती रसायन दिले आहे. या कृती कार्यक्रमांवर उभे राहणारे ते आंबेडकरी राष्ट्र होय. या देशाचे नाव नव्हे तर चारित्र्य बदलण्याची गरज आहे. आज ब्राम्हणी विचारधारेवर हा देश संचलित होत आहे. बाबासाहेबांच्या परिपूर्ण विचार धारेवर चालणा-या *आंबेडकरी राष्ट्राची*
निर्मिती करणे हेच खरे मिशन होय!
या कामी वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची राहणार आहे. वृत्तपत्र हे माणसामाणसाला जोडण्याचे, संवाद साधण्याचे व एकाच वेळी सर्वांना एका विशिष्ट दिशेने नेण्याचे काम करते. मत घडविणे व मत परिवर्तन करणे हे वर्तमानपत्र व एकूणच सर्व माध्यमांचे कार्य आहे. समाजाचे सामुहिक वर्तन उच्च दर्जाचे असावे; प्रज्ञा, शील, करुणा या जीवन मुल्यांना आदर्श मानून चालणारे असावे. धर्म, धर्मग्रंथ, आत्मा, परमात्मा, पुनर्जन्म, पुर्वजन्म, नशीब, उपास तापास, नवस सायास, पुजा अर्चा, अंधश्रद्धा यांत बुडालेल्या समाजाला या दुष्टचक्रातून बाहेर काढून विवेकशील व शीलवान व्यक्ती, समाज व राष्ट्राची निर्मिति करण्याची ऐतिहासिक जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्या खांद्यावर दिली आहे. हे क्रांतीकारी मिशन पूर्ण करण्यासाठी वृत्तपत्रांचे योगदान फार मोठे राहणार आहे.
"ज्या चळवळीला स्वत:चे वृत्तपत्र नसते ती चळवळ पंख तुटलेल्या पक्षासारखी असते," असं बाबासाहेब म्हणतात. वृत्तपत्रांचे महत्व व सामर्थ्य बाबासाहेब जाणून होते. म्हणूनच त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत अशी विविध वृत्तपत्रे चालविली. ज्या काळात बहुतांश अस्पृश्य समाज निरक्षर होता, त्या काळात बाबासाहेबांनी चालविलेल्या या नियतकालिकांनी बाबासाहेबांचे विचार व संघर्ष लोकांपर्यंत नेण्याचे व त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचे बहुमोल कार्य केले.
आधुनिक जगात विकसित झालेल्या डिजिटल मिडिया, ईलेक्ट्राॅनिक मिडिया या क्षेत्रांकडेही आपल्याला वळावे लागेल. निब्बाण न्युज मिडिया प्रा. लि. या सर्व क्षेत्रात नजिकच्या काळात समर्थपणे पर्याय निर्माण करील यात शंका नाही!
आपल्याला आम्ही विनंती करीत आहोत की निब्बाण न्युज मिडियाने सुरु केलेल्या या भव्य अशा माध्यम क्रांतीमध्ये आर्थिक, बौद्धिक आणि शक्य त्या प्रकारे सहाय्य करुन सामिल व्हा! निब्बाण न्युज मिडिया प्रा. लि. मध्ये आर्थिक गु़ंतवणूक करुन आकर्षक परतावा मिळवा!
'आंबेडकरी राष्ट्र' निर्माणाच्या या महत्वाकांक्षी मिशनमध्ये आपले स्वागत आहे!
- प्रेमरत्न चौकेकर
निब्बाण न्यूज मिडिया प्रा. लि.