Sharp News Malegaon

Sharp News Malegaon SHARP NEWS MALEGAON

15/08/2025

#मालेगाव - स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्यसैनिक उद्यानाचे भूमिपूजन
आज भारत स्वतंत्र दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक उद्यान भायगाव रोड मालेगाव कॅम्प येथे वॉल कंपाऊंड दुरुस्ती व सोयी सुविधा पुरवण्याच्या कामाचे भूमिपूजन मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
मालेगाव महानगरपालिका हद्दीतील कॅम्प गावठाण भागात सव्वा एकर जागेवर भारत स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचा गौरव म्हणून राज्यातील वेगळे असे प्रेरणादायी स्मारक निर्माण व्हावे अशी संकल्पना स्वातंत्र्य सैनिक संघटनेच्या वतीने 2003 साली तत्कालीन मनपा आयुक्त डी जे फिलीप्स यांच्याकडे मांडण्यात आली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत या ठिकाणी बल्ली तारेचं कंपाउंड करून वृक्षारोपण करण्यात आले होते. शासकीय जागा असल्यामुळे मनपा प्रशासन त्यावर खर्च करून शकत नव्हता, त्यावेळी अनेक आंदोलन करून महाराष्ट्र शासनाकडून सदर जागा ही महानगरपालिकेकडे हस्तांतरित करून घेण्यात आली व त्यावर सन 2013-14 मध्ये वॉल व तार कंपाऊंड करून घेण्यात आले होते. अमृत योजनेतून जॉगिंग ट्रॅक व उद्यान विकसित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत तार कंपाऊंड व प्रवेशद्वार मोडकळीस आले असून त्याची दुरुस्ती करून उद्यानात सोयी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी अखिल भारतीय स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे निखिल पवार यांनी वारंवार मनपा प्रशासनाकडे केली होती.
त्याला मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सन 2024-25 च्या अंदाजपत्रकात वीस लाख रुपयांची तरतूद करून कामाचे कार्यादेश दिले आहेत. तार कंपाऊंड जाळीची दुरुस्ती प्रवेशद्वार व भायगाव रस्त्याला लागत फ्लेवर ब्लॉक फिटिंग, ग्रीन जिम, योगा व व्यायामासाठी मैदानाचा विकास, जॉगिंग ट्रॅकची दुरुस्ती, स्वच्छतागृहची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच वृक्ष लागवड, बैठक व्यवस्था बेंच, लहान मुलांच्या खेळण्यासाठीचे साहित्य, विद्युत व्यवस्था करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केल्याची घोषणा आयुक्त जाधव यांनी केली.
यावेळी निखिल पवार यांनी सांगितले की मागील काळात, स्वातंत्र्य सैनिक उद्यानाबाबत राजकीय मंडळींकडून काही अप्रिय बदनामीकारक पोस्ट केल्या जात होत्या. स्वातंत्र्य सैनिक उद्यान हे स्वातंत्र्य सैनिकांचे ते एक पवित्र स्मारक आहे त्याच्या संरक्षण व सन्मान राखणे ही एका व्यक्तीची जबाबदारी नसून स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रत्येक वारसाने व परिसरातील नागरिकांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानाच्या रक्षणासाठी पुढे आलं पाहिजे. या उद्यान रुपी स्मारकाच्या विकासासाठी मनपा प्रशासनाने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी रघुनंदन सावकार, वसंत पाटील, धनंजय वैद्य, कीर्ती पवार, दिलीप सारंगे, उद्यान अधीक्षक निलेश पाटील, अतिक्रमण अधीक्षक भरत सावकार, स्वराज पवार, जतीन पवार, शौर्य पाटील व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

26/07/2025

मालेगावात मोटारसायकल चोरांना दणका! कॅम्प पोलिसांकडून २३ गाड्यांसह सराईत गुन्हेगार जेरबंद.
Sharp News Malegaon SHARP NEWS MALEGAON #मालेगाव #मालेगावकर

16/07/2025

निळगव्हाण येथे बंडू काका यांच्या हस्ते जय बजरंग तालीमचे मोठ्या उत्साहात शुभारंभ

12/07/2025

मालेगाव एका वर्षात शाळांचा काय विकास झाला || SHARP NEWS ||

29/06/2025

कालिदास दिनानिमित्त 'गगराणी' दालनाने केला
मराठी साहित्य संघाच्या सभासदांच्या सन्मान

25/06/2025

अत्यंत गंभीर विषय आंदोलन करता टॉवरवर चढल्याने प्रशासनाची झाली धावपळ SHARP NEWS

16/01/2025

*मनपा अधिकारी किदवाई रोडचा आणखी किती वेळा अतिक्रमण काढणार ?*

1) *अवामी पार्टी आयुक्तांचे व प्रभाग अधिकाराचे करणार तोंड काळे ?*

2) *किडवाई रोडवरील अतिक्रमण मुळे काही स्थानिक नेत्यांना मिळतो राजकारण करायला चान्स?*

3) *या किडवाई रोड वर परत अतिक्रमण झाले तर रिजवान बेट्रीवाला जे बोलत आहे ते खरं असे समजावे लागेल*

24/10/2024

आज अद्वय आबा हिरे उमेदवारी अर्ज दाखल करणार || SHARP NEWS || Dr. Advay Hiray-Patil

15/10/2024

मालेगाव | सटाणा नाका परिसरात सिमेंट रोड कामाचे सुनील आबा गायकवाड यांनी केले शुभारंभ

03/06/2024

मालेगावी पाणी पुरवठा होणार खंडीत
मालेगाव कट्टा Deva Patil RD Malegaon
|| SHARP NEWS ||

10/04/2024

डॉ सुभाष बाबा भामरे व दादाजी भुसे यांच्या उपस्थित मालेगाव कॅम्प येथे हिंदू नवंवर्ष शोभायात्रा संपन्न || Sharp News Malegaon Dr. Subhash Bhamre

10/03/2024

बंडू काका & बारा बलुतेदार मित्रमंडळाने घेतले दत्तक

मालेगाव ।
येथील मालेगाव पावर सप्लाय कंपनीने अपघातग्रस्त कामगाराला अधिक नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी येथील बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या वतीने संबंधित कंपनीच्या कार्यालया वर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व मंडळाचे संस्थापक बंडूकाका बचछाव यांनी केले.

तालुक्यातील खडकी येथील नितीन देवरे या मालेगाव पावर - सपलॉय कंपनी कर्मचारीला मोठा
अपघात होऊन कायमचे अपंगत्व आले आहे. कंपनीने त्याला

कामावरून कमी केले आहे. तसेच औषधोपचार व किरकोळ खर्च देऊन त्याची बोळवण केली होती. नितीन व त्याच्या कुटुंबियांनी अनेक वेळा कंपनीकडे मिनतवारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले होते. हा प्रकार बारा बलुतेदार मित्र मंडळाचे बंडूकाका बचछाव या

यांना समजला. त्यांनी नितिनच्या परिवाराची भेट घेत परिस्थिती समजून घेतली. नितीन

याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्यांनी कंपनी अधिकरी यांचीही भेट घेतली. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नसल्याने आज मंगळवारी येथील राष्ट्रिय एकात्मता चौकापासून बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. कंपनी कार्यालया वर हा मोर्चा नेण्यात आल्या नंतर तेथील वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. कंपनीने येत्या दोन आठवड्यात नितीन याला नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले.
Sharp News Malegaon
Bandukaka Bachhav
Everyone Dr. Advay Hiray-Patil मालेगाव कट्टा Deva Patil RD Malegaon M.S.G.college Malegaon

Address

Malegaon, Nashik
Malegaon
423105

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sharp News Malegaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sharp News Malegaon:

Share