27/06/2025
आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा, ओठांतुनी ओघळावा
झिजूनी स्वतः चंदनाने, दुसऱ्यास मधुगंध द्यावा
हे जाणता, जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा
आनंद या जीवनाचा...
आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा, ओठातूनी ओघळावा
काही आठवतंय का?
साधारण ९४ - ९५ च्या आसपास (किंवा त्याच्या थोडं आधी किंवा नंतर) डॉ. श्रीराम लागूंची "संघर्ष" नावाची एक मालिका लागत असे, त्या मालिकेचं हे शिर्षकगीत. एक नितांत सुंदर आणि अर्थपुर्ण गीत. .वारी मध्ये एका साधक भगिनीने हे भावगीत गायलं ,अतिशय सुरेख भाव तिच्या शब्दातून व्यक्त होत होते ,कारण या गीतातील शब्द हि तितकेच भावपूर्ण आहेत ,ती गाताना सारखं वाटे कि गाणं नसून एक जीवन गीत आहे ,ते आपल्याला काही तरी सांकेतिक मार्गदर्शन करतंय, मग शोध सुरु झाला या गीताचा आणि पूर्ण गाणं शोधण्याचा .गुगलने दिलेल्या प्रत्येक दुव्यावर जाऊन पाहीलं. आणि एका दुव्यावर ही युटयूबवरील एका मराठी वादयवृंदामध्ये गायलंय. अगदी मुळ गीताच्या तोडीचं नसलं तरीही खुप छान झालंय गाणं., धन्यवाद मित्रा. गाणं मिळत नाही म्हणून मनात असलेली हुरहूर आज संपली...
*____"आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा.....
पाव्यातला सुर जैसा, ओठातुनी ओघळावा.....!!१!!
आनंद या जीवनाचा,
सुगंधापरी दरवळावा.....
झिजुनी स्वतः चंदनाने,
दुसरयास मधुगंध द्यावा.....
हे जाणता जीवनाचा, प्रारंभ ओळखावा.....!!२!!
आनंद या जीवनाचा,
सुगंधापरी दरवळावा.....
माझेच माझे म्हणूनी,
स्वता:चे काहीच नाही.....
परतीचे आपण प्रवासी,
नियतीचा हां खेळ सारा.....!!३!!
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा.....
अधुरेच हे शब्द आमुचे,
अधुरीच् ही शब्दमाला.....
पूजीत तव चरणाने,
मम अंगणी बहर यावा.....!!४!!
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा....