Adarsh Swarajya News

Adarsh Swarajya News Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Adarsh Swarajya News, News & Media Website, Chinchpokli, Mumbai.

२०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे झाली नियमानुकूलमुंबई - राज्यातील लाखो गरीब आणि गरजू कुटुंबांचा निवासस्थानाचा प्रश्न निकाल...
28/03/2026

२०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे झाली नियमानुकूल

मुंबई - राज्यातील लाखो गरीब आणि गरजू कुटुंबांचा निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महत्वाकांक्षी पाऊल उचलले. सन २०११ पर्यंत झालेली व सध्या केवळ निवासासाठी अस्तित्वात असलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.

या निर्णयानुसार, कोणत्याही परिस्थितीत भारताचा नागरिक नसलेल्या व्यक्तीचे अतिक्रमण नियमित होणार नाही. याची दक्षता अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याने घ्यायची आहे. असे अतिक्रमण आढळल्यास पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तथापि, हा निर्णय मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा वगळून संपूर्ण राज्यासाठी लागू आहे.

या आदेशानुसार, ५०० चौरस फुटांपर्यंतचे निवासी अतिक्रमण पूर्णपणे विनामूल्य नियमानुकूल करण्यात येणार आहे. तर उर्वरित क्षेत्रासाठी प्रचलित बाजारमूल्याच्या केवळ दहा टक्के रक्कम कब्जेहक्काची रक्कम म्हणून आकारली जाईल. नदीपात्र, नाले, गायरान, सार्वजनिक रस्ते, वने, स्मशानभूमी, खेळण्याचे मैदान किंवा शाळा/रुग्णालयासाठी आरक्षित असलेल्या जमिनींवरील अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत नियमित केली जाणार नाहीत. अशा बाधित कुटुंबांना ‘प्रधानमंत्री आवास योजने’तून पर्यायी घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

• विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल

‘सर्वांसाठी घरे’ हे धोरण आणि ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे उद्दिष्ट गाठण्यासाठी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यामुळे वेगवेगळ्या शासन मान्यतेची गरज पडणार नाही. या समित्याच निर्णय घेतील. जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १७ सदस्यांची समिती असून, विधानसभा क्षेत्रनिहाय आमदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापण्यात येणार आहेत.

अतिक्रमण नियमित करण्यासाठीची पात्रता, अटी व शर्ती, जागेची मर्यादा व शुल्क आकारणी, अंलबजावणीची कार्यपद्धती, अर्जासाठीची मुदत, पडताळणी, अंमलबजावणी यंत्रणा अशी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात येणार आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्तिगत लक्ष घालून गरीब व गरजूंना घरे मिळावीत यासाठी बैठकी घेतल्या.

रेल टी.टी. उड्डाणपुलावर कडक निर्बंध!दुरुस्तीमुळे उड्डाणपुल३१ मे २०२६ पर्यंत पूर्णपणे बंद.वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची अ...
28/03/2026

रेल टी.टी. उड्डाणपुलावर कडक निर्बंध!

दुरुस्तीमुळे उड्डाणपुल
३१ मे २०२६ पर्यंत पूर्णपणे बंद.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची अंमलबजावणी;
नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन.

गिरणी कामगारांसाठी मोठा निर्णय!मुंबईत १ लाख घरे बांधण्याची घोषणाउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत माहिती.आमद...
28/03/2026

गिरणी कामगारांसाठी मोठा निर्णय!

मुंबईत १ लाख घरे बांधण्याची घोषणा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत माहिती.

आमदार सचिन अहिर यांच्या प्रश्नानंतर
सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय.

एफएसआय व विविध गृहनिर्माण प्रकल्पांतून
कामगारांना घरे उपलब्ध करून देणार.

कामगार वर्गात दिलास्याची भावना!

Address

Chinchpokli
Mumbai
400011

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adarsh Swarajya News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share